तुम्हाला कोणाचा ड्यू आयडी व्हायला आवडेल?

Submitted by कटप्पा on 13 May, 2020 - 10:48

तर मंडळी - तुम्हाला कोणाचा ड्यू आयडी व्हायला आवडेल आणि का असा सिम्पल सवाल आहे .
कृपया ओरिजिनल आयडी नेच प्रतिसाद द्यावेत . ड्यू आयडी ने नाही . इथे प्रतिसाद येणारे आयडी मुळ आयडी समजले जातील .

आता माझ्याबद्धल . मला बोकलत यांचा ड्यू आयडी व्हायला आवडेल . अमानवीय धाग्यावर माझीच सत्ता असेल .

ऍडमिन सर धागा विरंगुळा मध्ये आहे . थोडी गम्मत म्हणून .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अभिषेकचा डू आयडी आहे आणि मला प्रत्येक जन्मात त्याचाच डू आयडी व्हायला आवडेल.

हल्ली ऊठसूठ जो तो आपण अभिषेकचे डू आयडी आहेत असे भासवायचा प्रयत्न करतो तेव्हा तर आपण अभिषेकचे एकमेव सक्रिय डूआयडी आहोत याचा जास्तच अभिमान मनात दाटून येतो Happy

आणखी एक . मला अज्ञातवासी यांचा ड्यू आयडी व्हायला देखील आवडेल . कारण त्यांचे भरपूर स्त्री ड्यू आयडी आहेत . तेवढ्याच आभासी मैत्रिणी मिळतील . आम्ही सगळे ड्यू आयडी गेट टुगेदर करू वेगवेगळ्या लॉगिन ने .
मस्त गप्पा रंगतील आमच्यात Lol अर्थातच व्हर्चुअल गप्पा .

खरा भारत खेड्यांत आहे आणि खरी मायबोली विपूत आहे. त्यामुळे कोणाचा ड्यू आयडी व्हावचा असेल तर ते अनेक आयडिंच्या विपू वाचूनच ठरवावे लागेल.

(ता. क. मी कोणाचीही विपू वाचत नाही. मला माझाच एकमेव आयडी प्यारा आहे)

हल्ली ऊठसूठ जो तो आपण अभिषेकचे डू आयडी आहेत असे भासवायचा प्रयत्न करतो
>>> लोल..... गोड गैरसमज...

ज्यांच्या लिखाणाला प्रतिक्रिया देण्यासाठी मी मायबोलीवर रजिस्ट्रेशन केले त्या बेफिकीर यांचा दु आयडि व्हायला मला आवडेल... त्यांच्या सारखे लेखन माझ्या आयडी ने आले तर किती मजा येईल...

अहो च्रप्स लोल आहे पण खरे आहे.
याआधी कोणी नवीन धागा काढणारा डुआयडी आला तर माझ्या ओरिजिनल आयडीकडे हा तुझाच का म्हणून चौकशी व्हायची. मी नम्रपणे नकार द्यायचो.
हल्ली मात्र कुठलाही डु आयडी येतो आणि माझी बाजू घेत माझ्यावर टिका करणारयाशी तावातावाने भांडायला लागतो तर कोणी +७८६ वा शाहरूख असे उल्लेख मुद्दाम करून आपण ऋन्मेषचेच आयडीबंधू आहोत असे भासवायचा प्रयत्न करतो. कोणी माझे जुने धागे वर काढते, तर कोणी गरज नसताना माझे अति कौतुक करते.. अर्धा लॉकडाऊन तर ओरिजिनल आयडीवर होणारया चौकश्यांना ऊत्तर देण्यातच गेलाय...

बाकी मलाही बेफिकीर यांचा डु आयडी व्हायला आवडेल. त्यांनी कथा माझ्यातून लिहाव्यात, गझल तुमच्यातून..

कसली सत्ता आणि कसलं काय, ज्यांना त्या धाग्यावर मी लिहिलेलं आवडत नाही त्यांना बाहेर कुठे भेटलो तर चपलीनेच मारतील मला. डूआयडी म्हणाल तर भरपूर चांगले लेखक मायबोलवर आहेत त्यापैकी कोणाचाही डूआयडी व्हायला आवडेल.

ज्यांना त्या धाग्यावर मी लिहिलेलं आवडत नाही त्यांना बाहेर कुठे भेटलो तर चपलीनेच मारतील मला
>>>>
का आवडत नाही?
मी कधी अमानवीय धागा वाचत नाही कारण मला स्वप्ने पडतात..

ज्यांना त्या धाग्यावर मी लिहिलेलं आवडत नाही त्यांना बाहेर कुठे भेटलो तर चपलीनेच मारतील मला
>>> नाही बोकलत हा तुमचा गैरसमज आहे.....

चपलीने नाही मिळेल त्या साहित्याने मारतील काठी हॉकी स्टिक बॅट वगैरे वगैरे....

कृपया ओरिजिनल आयडी नेच प्रतिसाद द्यावेत . ड्यू आयडी ने नाही >>>> कटप्पांचा धागा (ऋन्मेऽऽष सारखेच यांचे पण बरेचसे धागे प्रश्नार्थक स्वरूपाचे) , आणि पहिले काही प्रतिसाद ऋन्मेऽऽष आणि कटप्पान्चे पाहता (कदाचित परिचित हा आयडी पण यात येईल?) तुझे रुल्स तूच पाळत नाहीस असे वाटते.

कोहम आणि सोहम एकतर तुम्ही दोघांनी मिळून एक आयडी घेतला आहे हाच पहिला फॉल्ट आहे .
बाई दवे तुम्हाला कोणाचा डू आयडी व्हायला आवडेल हे नाही सांगितलेत .

मला किल्ली चा डू आयडी व्हायचंच आहे Proud Wink
Submitted by महाराणी देवसेना on 13 May, 2020 - 23:48 >>>>
हायला ! हे कसं करतात... Lol

भारी!
मला ना माझाच डुआयडी व्हायचंय! का ते विचारु नका.
आणि तुम्ही विचारलं. तरी मी काही सांगणार नाही!
#मी च माझी डुआयडी

हल्ली मात्र कुठलाही डु आयडी येतो आणि माझी बाजू घेत माझ्यावर टिका करणारयाशी तावातावाने भांडायला लागतो तर कोणी +७८६ वा शाहरूख असे उल्लेख मुद्दाम करून आपण ऋन्मेषचेच आयडीबंधू आहोत असे भासवायचा प्रयत्न करतो. कोणी माझे जुने धागे वर काढते, तर कोणी गरज नसताना माझे अति कौतुक करते.. अर्धा लॉकडाऊन तर ओरिजिनल आयडीवर होणारया चौकश्यांना ऊत्तर देण्यातच गेलाय...
>>>> जाम हसलो....

मला किल्ली चा डू आयडी व्हायचंच आहे Proud Wink
Submitted by महाराणी देवसेना on 13 May, 2020 - 23:48
>>>>>>

बाप रे !!
खतरनाक आहे हे
जे काही आहे ते फोडू नका
उगाच कोणी गैरवापर करायला नको

कटप्पा!
मला अंगाई गाता येत नाही.. सांगितलं आता अजुन काय सांगु?

शेवटी मित्रच कामाला आला
दोन बकर्डी ब्लॅक आणि एक कॅप्टन मॉर्गन मिळाली
धुव्वाच आता फुल्ल

>>>> जाम हसलो....
Submitted by च्रप्स on 14 May, 2020 - 01:41
>>>

धन्यवाद च्रप्स. आता झोप येईल.
दिवसभरात प्रत्यक्ष आयुष्यात किमान तीन आणि सोशलसाईटवर किमान एका व्यक्तीला रोज हसवावे तरच आपल्या जगण्याला अर्थ आहे हे गेले चौदा वर्षे पाळत आलोय Happy

एक कॅप्टन मॉर्गन मिळाली
>>>
कॅप्टन मॉर्गन भेटला असे हवे जेवढे माझे मराठीचे ज्ञान आहे

बाई दवे,
ईंग्लंड क्रिकेट टीम कप्तान ईयान मॉर्गन का?

>>मन्या सांगून टाका . आत्ताच एक कडक कॉफी मारली आहे आहे अजून एक तास जागा मी .

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 00:04

हे वरचं आता लिहिलेलं भारताच्या रात्री आणि खालचं नोव्हेंबर २०१९ मध्ये लिहिलेलं आय गेस अमेरिकेतून. ...

>>अमेरिकेत घर खरेदी
Submitted by कटप्पा on 4 November, 2019 - 06:13
सरळ मुद्द्यावर येतो .
एक घर आवडले आहे , ऑफर एक्सेप्ट झाली आहे .

20% डाउनपेमेंट करणे चांगले कि 5/10 टक्के विथ मोटगेज इन्सु हा माझा प्रश्न आहे .

घर तीन वर्षाने विकण्याचे असू शकेल , परत भारतात जाण्याचा प्लॅन आहे .

जाणकारांच्या सल्ल्याचा आणि उत्तरांच्या प्रतीक्षेत . हा सिरीयस धागा आहे .

चान्सेस आहेत तुमची कुठून तरी गच्छंती झाली असेल आणि तुम्,ही योग्य जागी पोहोचलाही असेल पण मग एकच करा सगळंच विरंगूळा मध्ये हलवा. थँकफुली तुमच्या अमकी मदत तमकी मदत मध्ये खास रिप्लाय करण्यासारखं तेव्हाही काही वाटलं नव्ह्तं त्यामुळे आताही वाटायचं काही कारण नाही. पण आज फार वेळ होता म्हणून ही छोटीशी प्रतिक्रिया.

एंजॉय करा तुमचा "विरंगूऊऊऊळा"

वेका - मान गये . मिस मार्पल निघालात . एक गोष्ट मिस केलीत पण .
तो धागा सिरीयस होता हा विरंगुळा मध्ये आहे .
विरंगुळा मध्ये आपण जे लिहितो ते टाईमपास साठी असते हा बेसिक रूल आहे .

कटप्पा विषयाला धरून लिहायला कधी जमणार तुम्हाला
जमत असेल तर कॅप्टन मॉर्गन आणि बकर्डी ब्लॅक वर लिहा नाहीतर वेगळा धागा काढा

दर वेळी काय तेच ते, बोर होत नाही का
तो एक माकड छाप आयडी होता तो गेला का अभिषेक ला मोकळा सोडल्यावर?

वेका नी मला त्रास द्यायचा प्रयत्न केलाय . काय पण आयडी असतात ना एक एक .
आज मी फक्त सिंगल मॉल्ट घेईन थोडेसे पाणी घालून .

Pages