सिब्लो निसर्गकेंद्रास भेट

Submitted by अस्मिता. on 12 May, 2020 - 18:53

टेक्सासच्या उल्कापात वाटावा अशा उन्हाळ्यात इथे गार वाटते म्हणून आम्ही नियमितपणे जातो.
सिबलो निसर्गकेंद्र हे अजिबात प्रसिद्ध नाही पण इथे तास दोन तास फिरायला प्रसन्न वाटते. शाळेच्या अधूनमधून येणाऱ्या सहली आणि पाच दहा पक्षीमित्र सोडले तर इथे विशेष कुणी येत नाही. कधी कधी फोटो शूट चाललेली दिसतात. त्यामुळे नेहमीच निवांत , शांत असते. घराजवळ असल्याने मलाही सुटसुटीत वाटते.
याचा आम्ही खूप दिवस विचित्र उच्चार करायचो. Cibolo आहे तर सिबोलो/ किबोलो/चिबोलो / सायबलो पण प्रत्येक वेळेला मुलाने चूक काढली. आमच्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची accents आहेत. तोच फक्त मराठी मराठी उच्चारात आणि इंग्रजी अमेरिकन उच्चारात बोलू शकतो. मुलीचे तर उलट झाले आहे असे चिडवतो Lol , तर त्याने आम्हाला योग्य उच्चार शिकवला तो म्हणजे सिब्लो , हे 'ब' अर्धही नाही आणि पूर्ण पण नाही. तर ह्या नेटीव अमेरिकन / इंडियन 'सिब्लो' शब्दाचा अर्थ आहे टेक्सासची म्हैस अर्थात बायसन.

rocky_mtn_aresenal_nwr_rich_keen_dpra_bison_and_calf.jpg

Though the terms are often used interchangeably, buffalo and bison are distinct animals. Old World “true” buffalo (Capebuffalo and water buffalo) are native to Africa and Asia.  Bison are found in North America and Europe. Both bison and buffalo are in the bovidae family, but the two are not closely related.

आपल्या म्हशीशी यांचा काही संबंध नाही असे विकिपीडिया सांगते.
म्हैस नाव असलेले हे निसर्गकेंद्र रमणीय आहे बरं का. पण खास यावे इतके खास नाही.
तर आम्ही रहातो ते एक जर्मन वसाहतीने वसवलेले छोटे टुमदार गाव आहे. बरीच अमेरिकन कुटुंब मूळची जर्मनीतुन इथे आले आहेत. साधारण१८५० च्या आसपास येण्यास सुरुवात झाली होती. उरलेली सगळी लोक मूळची मेक्सिकन/ स्पॅनिश वंशाची आहेत. इथे आल्यानंतर अजिबात नसलेली वांशिक विविधता जाणवून अस्वस्थ झाले होते. अर्धी गोरी अमेरिकन आणि अर्धी हिस्पॅनिक !! मुलाच्या शाळेत साडेतीन हजार मुलांमध्ये तो एकटाच देशी /brown / south Asian or even asian आहे आता कल्पना करू शकता .
तर या अशा छोट्या गोजिरवाण्या "बर्नी" (स्पेलींग Boerne उच्चार जर्मन असल्याने बर्नी) गावातून एक नदी वहाते तिच्या आसपास हे निसर्गकेंद्र वसवलेले आहे. या नदीचे नाव आहे सॅन अँटोनियो व तिच्या ओढ्याचे ( creek म्हणजेच ओढा) नाव सिब्लो क्रीक. आणि निसर्गकेंद्राचे नाव सिब्लो नेचर सेंटर.
पाऊस पडून गेल्यावर हिरवेगार झालेला हा परिसर टिपला होता फोनच्या कॅमेऱ्यात Happy .

1*

20200315_172743.jpg

2*

20200316_063609.jpg

3*

20200316_063552.jpg

4*
20200316_063541.jpg

5*

20200316_063524.jpg

6*

20200316_063454.jpg

7*
20200316_063441.jpg

8*

20200316_063408.jpg

9*
20200316_063318.jpg

10*

20200316_063306.jpg

11*

20200316_063903_0.jpg

12*
20200316_063223.jpg

13*

20200316_063208.jpg

14*

20200316_063112.jpg

15*
20200315_204616.jpg

16*

20200315_204508.jpg

17*
20200315_204336.jpg

18*
20200315_204136.jpg

19*
20200315_203939.jpg

20*

20200315_200105.jpg

21*

20200315_195607.jpg

22*

20200315_181742.jpg

23*
20200315_181137.jpg

24*
20200315_181137.jpg

25*

20200315_181742.jpg

26*
20200315_195607.jpg

27*

20200315_200105.jpg

28*

20200315_203939.jpg

29*

20200315_204136.jpg

30*

20200315_204336.jpg

31*

20200315_204508.jpg

32*

20200315_204616.jpg

33*

20200316_063942_0.jpg

फोटो कसे वाटले नक्की सांगा.
धन्यवाद Happy !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय...
पाण्यातली प्रतिबिंबं, दूरवर जात राहणारी वाट, फुलांनी डवरलेलं झाड आणि त्या वर्षावात न्हाऊन गेलेला तो एकाकी बाक..सगळेच फोटो अप्रतिम

फोटो सुंदरच. वळणावळणाचा ओढा आणि त्यात ऐसपैस पाय पसरून उभी, ओणवी झाडे. 'औदुंबर'चीच आठवण झाली. मुळांचे फोटो विशेष आवडले. कधी नाजूक कमनीय वेलांट्या, इकार, उकार, तर कधी रौद्रसुंदर सर्वव्यापी. आणि नाजूक सुंदर हिरव्या पार्श्वभूमीवर हे ग्रे रुद्रसौंदर्य अधिकच खुलून दिसते.
आपल्याकडे अशी मुळे कैलासपतीची असतात. कॅनन बॉल झाड. पण त्यात रुद्रता जास्त, सौंदर्य कमी. काळसर, भक्कम, भयावह.
वर्णनही चालले असते थोडेसे सुंदर फोटोंबरोबर.

सुंदर फोटो!
आम्ही सॅन अँटोनिओला भटकायला आलो होतो तेव्हा या ठिकाणाबद्दल माहिती नव्हते.

सुंदर फोटोज.

ओढ्यात पाय बुडवून उभे असलेले वृक्ष खूपच सुंदर दिसताहेत.

सुंदर फोटो.

या उन्हाळयात असे हिरवे फोटो पाहून डोळे निवले

आहाहा, डोळे सुखावले अगदी Happy
झाडं अन त्यांचं प्रतिबिंब तर अहाहा
25 मधे तो रेनवॉटर कलेक्टिंग जार कसला सुरेख आहे
पाण्यातली दगडांची वाट अगदी बोलवतेय उड्या मारत जायला Wink
पहिला म्हैस वासराचा फोटे फार गोड.
छोटच लिहिलयस पण छान लिहिलयस Happy

@ मंजुताई आणि अज्ञातवासी धन्यवाद शोधून लिहीते !
@तेजो एकाकी बाक माझाही मोस्ट फेवरेट आहे. धन्यवाद !
धन्यवाद कुमार सर, पुरंदरे शशांक, हर्पेन , जिद्दू, चंद्रा , बोकलत, साधनाताई, सुबोध खरे, सामो.

आपल्याकडे अशी मुळे कैलासपतीची असतात. कॅनन बॉल झाड. पण त्यात रुद्रता जास्त, सौंदर्य कमी. काळसर, भक्कम, भयावह. >>>>हे माहिती नव्हते. धन्यवाद. प्रतिसाद नेहमी प्रमाणे सुंदर Happy .
स्वाती२ पुन्हा या सहकुटुंब आणि माझ्याकडे उतरा. आपण जाऊ Happy .
@ अवल तू ही ये अवलताई लेकाकडे आलीस की. रोज नेईन तुला , मिळून मारू उड्या Lol !

अप्रतिम !
तुमचा तिथे जाण्याचा अनुभव थोडा सविस्तर शब्दबद्ध केलात तर आभासी सहल होईल ..

तिथे जाण्याचा अनुभव म्हणजे ते घराजवळ आहे खूप म्हणून आठवड्याला एकदा जाणे व्हायचेच. आता कोरोना मुळे बंद आहे.
हा एक खूप मोठा नेचर पार्क आहे. विविध ट्रेल्स आहेत, अवघड ,सोयीचे शिवाय सायकलीस्ट साठी. काही लोकं तर मुलांना घेऊन पाण्यात खेळण्यासाठी पण येतात. काही ठिकाणी पाणीजवळ किंवा त्यावर लाकडी डेक आहे. लोकं कुत्र्यांना फिरवायला येतात. एकुणच खूप मोठा आहे पार्क कधीकधी लग्न समारंभ, डोहाळजेवण वगैरे दिसतात.
त्यांच्या office मध्ये वेगवेगळ्या काचेच्या aquarium मध्ये इथली कासवं, विशिष्ट सरडे iguana आणि एक सापही आहे.
हे लोकं बहुतांश स्वयंसेवक आहेत. जे पक्षीनिरिक्षण कार्यक्रम आखतात. वेगवेगळ्या ऋतूंंमध्ये शनिवारी / रविवारी भल्या पहाटे दुर्बीण घेऊन सर्वांना मार्गदर्शन करतात. माझा मुलगा तिथला कचरा, प्राणी/ पक्षी यांसाठीच्या घातक गोष्टी प्लॅस्टिक उचलण्याच्या गटात आहे. या गोष्टी बहुतेक शाळकरी मुलं उत्साहाने करतात. जवळपासच्या शाळेच्या सहली इथे स्पेसिमन गोळा करायला, स्थानिक पशुपक्ष्यांच्या अभ्यास करायला व पिकनिकला येतात.
एवढेच नाही तर इथे भरपूर हरणं देखील आहेत. भारतातून कुणी तरी जंगलाची शोभा वाढवण्यासाठी चितळं आणून सोडली म्हणे साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी, आता ती वाढत जाऊन सगळी कडे पसरली आहेत. खरंतर ती एक invasive species आहे, इथली नाहीत. पण आता इथल्या हरणांपेक्षा चितळं अधिक दिसतात. मलाही भारतातील हरणं बघून जीव थंड वाटतो, Happy फक्त हरणं पहायला पण जातो आम्ही कधीकधी !

axis-deer-chital-portrait-devalia-safari-park-2016.jpg

आपली हरणं इथे सगळीकडे बागडताना दिसतात. माझ्या शेजारीन बाईच्या बागकामाची वाट लावतात.
पण किती गोड Happy

great-blue-heron_rebecca-field.jpg
Great blue herron
हे स्थानिक पक्षी जे नियमितपणे दिसतात

***************************
NORTHERN-MOCKINGBIRD.ngsversion.1498577193576.adapt_.1900.1.jpg
Mockingbird

**************

web_apa_2015_briankushner_red-tailed_hawk_kk.jpg
Red tailed hawk

आंतरजालावरून साभार.

horned_lizardlarge.jpg
Horned Lizard

fireant-686792679.jpg

Fire ant
ह्या मुंग्या अत्यंत विषारी आहेत. काही जणांना यांच्या दंशाची allergy होऊन जीवही जाऊ शकतो. माझ्या मुलाने चुकून घरासमोरील वारूळात पाय दिला तर त्याला भयंकर त्रास झाला व रात्री hospital मध्ये रहावे लागले.

46106542351_ffe72a05d5_b.jpg

Bat

Turtle.jpg

कासव

फोटो आंतरजालाहून साभार.

इथे वेगवेगळ्या प्रकारचे साप व सरडे आहेतच. शिवाय स्कंक, आर्माडिलो, badger सुध्दा आहेत. सगळीकडे घरं, रस्ते बांधकाम असल्याने नेहमीच गाडी खाली चिरडली जातात. जीव तळमळ होतो Sad , हरण तर आठवड्यातून एकदा तरी असे दिसते. मगं इथे गिधाडे आहेत भरपूर ते सर्व फस्त करताना दिसतात. तीन दिवसांत सगळे साफ होते. हे असे काही पाहिले की जीवनाचे सत्य दिसल्यासारखे होते. मला haunting वाटतात अशी द्रुष्य !!

wt_rattlesnake-free.jpg
***********
Rattlesnake
यांच्या शेपटीला एक खूळखूळा असतो. त्याद्वारे हे राग व्यक्त करतात. अत्यंत विषारी जात आहे ही सापाची .

americanbadgerfws.jpg

Badger

armadillo-dangerous-creatures-texas.jpg

Armadillo
फोटो आंतरजालाहून साभार .

टेक्सस म्हणजे फक्त तिथल्या कुठल्या विमानतळाचा लेओव्हर असेल तर काय ते वरून टीचभर पाहिलं असेल तितकंच Wink कधीच तिथे गेलो नाही. जाणार असू असंही काही नाही. सध्या तर अगदीच नाही. त्यामुळे यातले फोटो म्हणजे वॉव झालं. छान जागा आणि परीचय.
पुलेशु Happy

Pages