करोना काळात आणि नंतरच्या जगात काय व्यवसाय / उद्योग करता येतील?

Submitted by मामी on 9 May, 2020 - 01:26

जगायचं, तगायचं आहे आणि पुन्हा उभारीनं आयुष्याला भिडायचं आहे.

कबुल आहे, प्रसंग बाका आहे. नोकरीची शाश्वती नाही. खूप अनिश्चितता आहे. पण हातपाय गाळून बसून काय होणार? पेला अर्धा रिकामा आहे बघण्यापेक्षा तो अर्धा भरलाय हे लक्षात घ्या. आजूबाजूला वाईट घटना घडत आहेत पण आपल्या जमेच्या बाजूलाही अनेक गोष्टी आहेत. अनिल अवचट म्हणतात तसं 'तरी बरं...... अमुकतमुक घडलं नाही. " हा सकारात्मक दृष्टिकोन.

आपल्याकडे (निदान आपल्यासारख्या मध्यमवर्गाकडे. सध्या या धाग्यापुरतं आपल्यावर फोकस करू कारण ते करतानाच कदाचित आपण इतर वर्गाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकू ) मेंदू आहे, हात पाय धड आहेत, डोक्यावर छप्पर आहे, बँकेत थोडीफार का होईना शिल्लक आहे, हाताशी स्मार्टफोन / कॉम्पूटर / इंटरनेट आहे, व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुक / मायबोलीसारख्या साईटमुळे झालेले सोशल नेटवर्क आहे. बरंच आहे की भांडवल. जर गरज पडली तर किंवा यानिमित्ताने आपला व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करूयात का?

या धाग्यात खालील मुद्दे विचारात घेऊ :

* या करोनाच्या काळातही आपल्याकडे अजूनही हातात काय आहे? किंवा यामुळे काय मिळालंय?
* व्यवसाय करण्याची इच्छा आहे का? त्या दिशेने कधी विचार केला आहे का?
* कोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येतील?
* आधीच कोणी सुरूवात केली असेल तर आपले अनुभव इतरांबरोबर शेअर करू
* तुम्हाला व्यवसाय करायचा नाहीये पण काही कल्पना मांडायच्या असतील तर त्या इथे मांडता येतील. इतर कोणाला त्यापासून स्फुर्ती घेऊन काही सुरू करता येईल.

Group content visibility: 
Use group defaults

सध्या लोकांच्या खिशात कमी पैसा असला तरीही दोन क्षेत्रं अशी आहेत की ज्यांच्यावर खर्च केला जातोच.
१. खाणे - काही परिस्थिती असो, माणसाला चार वेळा खायला लागतेच.
२. मुलंबाळं - काही परिस्थिती असो, मुलाबाळांवर / त्यांच्या शिक्षणावर / स्किल्स डेवलप करण्यावर पैसा खर्च करण्यास कोणी फारसं मागेपुढे बघत नाही.

आयडिया चे पण पैसे असतात ना. कोणाकडे फक्त आयडिया असतील पण बाकी काही execute करणे शक्य नसेल तर अश्या व्यक्तीला आयडिया चे पैसे मिळायला हवेत. फुकट आयडिया कशाला इंटरनेट वर!

समजा closed group काढून लोकं खऱ्या लोकांनी join करून नीट brainstorming केलं तर प्रत्येकाला abilities चे पैसे मिळतील.

राजसी, तसं नक्कीच करू शकतो. ही देखिल एक आयडियाच आहे. तुम्ही हवं तर असा पेड गृप तयार करू शकता.

आयडियांचे पैसे असतात त्या आयडिया काहीतरी युनिक असतील तर. तशी काही आयडिया असेल तर नका शेअर करू. पण बाकी नेहमीचे उद्योगधंदे तर नक्कीच डिस्कस करू शकतो.

परप्रांतीय उत्तरप्रदेशीय पळालेत. लवकर काही येत नाही. त्यांचा पाणीपुरीचा धंदा हायजॅक करा. तसेही लॉकडाऊन काळात पाणीपुरी चॅलेंजची चलती आलेली. कोरोनापश्चात काळात लोकं हायजिन जपू लागतील. रस्त्याकडेला भैयाच्या गाडीवर खाण्याऐवजी तुलनेत टापटीप गाडीवर खातील.

उदयीगधंद्यात मंदी आली, नोकऱ्या गेल्या तरी खायला तर लागणारच. त्यामुळे ज्यांनी आजवर घरची शेती असूनही दुर्लक्ष केले त्यांनी सध्याचा वेळ शेतीतील नवे तंत्र समजून घेण्यात घालवावा व नंतर शेतीत लक्ष घालावे. जे आधीच शेती करताहेत त्यांनी शेतमालाला पूरक छोटे प्रोसेसिंग उद्योग, जसे कांदा, आले, लसूण यांच्या सुक्या पावडरी, इतर भाज्यांवर प्रक्रिया करून साठवणीचा काळ वाढवणे वगैरे करता येईल का याची चाचपणी करावी.

अजूनही बरेच शेतकरी एकरी एकच भाजी किंवा धान्य घेऊन ते सगळे एकत्र कापणीस अथवा काढणीस आले की आता हा टनावारी माल मी कुठे विकू म्हणत दलालांना शरण जातात. शेतकऱ्यांनी हा अप्रोच बदलून शेतात एकच भाजी लावण्याऐवजी वेगवेगळ्या भाज्यांचे प्लॉटस करावे म्हणजे सगळी भाजी एकत्र काढणीला येणार नाही व कुठली न कुठली भाजी विकली जाईल, पैसा येत राहील.

कोकण नाशिक सातारा इथल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी व्हात्सापवरून संपर्क वाढवून आपले आंबे, द्राक्ष वगैरे विकले. हेच संपर्क पुढे वाढवून आपला इतर माल थेट विकायला सुरवात करायची. वेगवेगळी पिके एकत्र पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकडून माल घेऊन तोही असा थेट विकायला सुरवात करायचा व्यवसायही करता येईल. मधली दलाली वाचेल आणि ती शेतकऱ्याला मिळेल.

सुरवातीला अगदी थोडया प्रमाणात शेतमाल सोर्स करून विक्री करणारे आता लाखात विक्री व तीही घरबसल्या व्हात्सापवर करताहेत आणि लोकडाऊनमध्येही धंदा सुरू आहे हे ओळखीत पाहिले आहे त्यामुळे मी वर लिहिले ते नुसतीच गप्पा नसून इच्छा असेल तर शक्य आहे.

अर्थात कष्ट भरपूर आहेत पण धंदा म्हटले तर बसून खायला मिळणार नाही एवढे लक्षात ठेवायचे आणि धंद्यात उतरले की लगेच यश मिळणार नाही, कमीत कमी वर्षभर तर बैलासारखे काम करावे हेही लक्षात ठेवावे. Happy Happy

खाण्याच्या संदर्भात : ऑफिस मध्ये काम करणार्‍या स्त्री पुरुषांना रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार्‍या भाज्या आणि तत्सम सामान आधी ऑर्डर घेऊन पोचवता येईल. उदा धुऊन निवडलेल्या / कापलेल्या भाज्या, मोड आणलेली कडधान्यं, आलं लसूण वाटण, असं. आदल्या दिवशी अथवा सकाळी अमुक एक वाजेपर्यंत ऑर्डर घ्यायची आणि संध्याकाळी ऑफिस सुटायच्या आधी त्यांच्यापर्यंत ती पोचवायची. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता येईल.

लॉक डाउन ऑफिशियली सम्पला तरी माझ्यासारखे अनेक जण बाहेर पडणार नाहीत. अश्या लोकांची बाहेरची कामं पैसे घेऊन करून देणे हा फार स्किल नसणाऱ्या लोकांसाठी पैसे मिळवण्याचा चांगला मार्ग आहे.
ACTually आत्ता ही ह्याची खूप लोकांना गरज आहे. दुकानदारांकडे मनुष्यबळ नसल्याने होम डिलिव्हरी द्यायला कोणी तयार होत नाहीये. हे arrange करण्यात आमची खूप ताकद खर्ची पडतेय . अशी सर्व्हिस देणारी लोक पुढे आली तर दोघांचा ही फायदा आहे त्यात.

अतिशय वाजवी दारात कन्स्ट्रक्शन कामगार,मजूर इत्यादी लोकांना सरकारी वेब साईट, त्यावरची माहिती, ऑनलाईन अर्ज कसे भरावे ,जिथे फुकट वाय फाय झोन आहे असे एरिया आपल्या कामांसाठी कसे वापरावे (मोबाईल असेल असे मी गृहीत धरतेय) याचे शिक्षण देता येईल.

आमच्यईथे स्विगीवाले सध्या हे डिलीवरीबॉयचे काम करत आहेत. ज्यांच्या घरापासून किराणा दुकाने लांब आहेत वा या काळात बाहेर जाणे आणि रांगेत ऊभे राहणे ज्यांना टाळायचे आहे ते या सेवेचा लाभ घेत आहेत.

लहान मुलांकरता झूमवर संस्कार वर्ग, श्लोक, पाढे वगैरे शिकवणे, गोष्टी सांगणे, लहान लहान खेळ घेणे हे करता येईल.

असेच लहान मुलांसाठी चित्रकला, हस्तकला वर्ग घेता येतील.

चेस किंवा बोर्ड गेम्सची आवड असणार्‍यांसाठी - इतरांबरोबर वन टु वन सेशन्स घेता येतील. तुम्ही त्यांना खेळ शिकवूही शकाल आणि खेळूही शकाल. हे केवळ संध्याकाळी अथवा विकेंडलाही नोकरी सांभाळून करता येईल.

श्लोकांचे, विविध कलांचे, बेसिक पाकृंचे (उदा चपातीकरता कणिक मळणे ते चपात्या करणे, वरणभाताचा कुकर लावणे, कोशिंबीर करणे, भाजी कशी निवडाव+ धुवावी+ कापावी, दही कसे लावायचे) व्हिडिओ बनवून युट्युबवर चॅनेल सुरू करता येईल.

चांगला धागा, कल्पना पण एकेक छान.

साधना यांनी लिहील्याप्रमाणे डायरेक्ट काही फळं मागवली सोसायटीने आमच्या, देवगड तालुक्यातून आंबे आले, छान होते आणि यंदा आमचे आंबे येणार नाहीयेत तर आमच्या तालुक्यातले खायला मिळाले हि अपूर्वाई आणि परवा द्राक्षं, कलिंगडं पण आली, कुठुन ते माहीती नाही पण द्राक्ष एवढी छान, ताजी आणि टपोरी आहेत की बास रे बास, चवीलाही छान.

सध्या आमच्या कल्याण डोंबिवली म्युनिसिपलने अ‍ॅप वर एरीयावाईज किराणा दुकानं दिली आहेत, ते सामान घरी पोचवतात तसं माझ्याकडे आणि भावाकडे मागवलं.

आत्ता किंवा नंतर स्थानिक बेरोजगार लोकांना इथे राज्यातच कामं मिळतील का, ती करता येतील का, सामाऊन घेता येईल का हे बघायला हवं, त्यांनीही तयारी दाखवायला हवी. तोही एक मार्ग आहे त्या अनुषंगाने पण वेगवेगळ्या प्रतिसादात सुचवलं गेलंय वर बऱ्याच जणांकडून.

मानिमोहर, dunzo, swiggy दोन app सध्या lockdown मध्ये पण अश्या होम delivery चे काम करत आहेत. App डाउनलोड करून बघा. तसेच ह्या अँप वर फक्त वस्तूच नाही तर काही सामान जस की जेवणाचा डबा, पुस्तक इत्यादी पाठवता येतं. हे काम फक्त same city साठी आहे. एखादा ओळखीचा, नातेवाईक आजारी आहे तर त्याला डबा पाठवता येऊ शकतो.

ola टॅक्सी बंद असली तरी त्याच app वर ओला emergency service सुरू आहे. ही emergency service फक्त जवळच्या हॉस्पिटल मध्ये जायला वापरता येते.
कोणालाही lockdown मुळे कसली अडचण असेल आणि कळवली तर उपाय सांगता येऊ शकतात.

अतिशय उपयक्त धागा. गेले काही दिवस घरात हीच चर्चा आहे. अशा अनिश्चिततेच्या काळात जरी नोकरी शाबूत असली तरी काय पूरक व्यवसाय करता येईल. शिवाय लाॅकडाऊन नंतर अर्थव्यवस्थेची नेमकी काय अवस्था असेल आणि त्या काळात कोणते व्यवसाय चालतील. शिवाय यात महिलांना ,
गृहिणींना करता येण्याजोगे कोणते व्यवसाय आहेत.

संस्कार वर्ग, श्लोक, पाढे वा साठी तरूण आजीआजोबांना सामील करून घेता येईल. >>> येस्स, मंजूताई. हे फार मस्त आहे.

लॉकडाऊन काळात दर तीनचार दिवसांनी घरी मॅगी पार्टी चालते. पोरांना तर रोज संध्याकाळी हवी असते. जेव्हा बनवतो तेव्हा मोठ्यांनाही चवीपुरती हवी असते. एकूणच बच्चे कंपनीत मॅगीचे क्रेझ आणि त्यात मोठेही सामील पाहता मॅकडीच्या धर्तीवर मॅगी रेस्टॉरंटही उघडता येऊ शकते. सोबत फ्रेंच फ्राईज, स्माईलीज, आईसक्रीम, सॉफ्टी चहा कॉफी वगैरे आलेच. पण लीड रोल वा पोस्टरवर मॅगी वा तत्सम नूडल्सच जे कुटुंबातल्या मुलाला आकर्षित करेल.
बाकी मॅगी घरीही झटपट बनत असली तरी व्हरायटी ऑफ मॅगी सगळ्या घरी बनवत नाहीत वा सगळ्यांनाच जमत नाही.
अर्थात असे मॅगी कॉर्नर आधी कुठे असल्यास कल्पना नाही.

Zoom अँप विरुद्ध भारत सरकारची advisory आहे, ते app सुरक्षित नाही. तेव्हा ज्यांना कोणाला हे ऑनलाईन class इत्यादी सुरु करायचं आहे त्यांनी zoom ऐवजी दुसऱ्या सुरक्षित यंत्रणेचा विचार करा.

तिथे लिझिकीच्या धाग्यावरच्या साधनाच्या कमेंटवरून सुचलं :

ज्यांना बागकामाची आवड आहे ते हा व्यवसाय करू शकतात. इतरांना त्यांच्या त्यांच्या घरात ऑर्गानिक किचन गार्डन अथवा नुसतीच शोभेची गार्डन वगैरे करून देणे आणि त्यांना हवी तर मेंटेन करून देणे. यासाठी एक छोटीसी टीम हाताशी ठेवावी लागेल.

अर्थात असे मॅगी कॉर्नर आधी कुठे असल्यास कल्पना नाही. >> ऋन्मेष, मागे शिवाजीपार्कला पेट्रोलपंप + क्रॉसवर्डच्या शेजारी जी काही दुकानं/रेस्टॉरंट्स आहेत त्यातल्या एका छोट्या गाळ्यात असं मॅगीच्या व्हरायट्या विकणारं रेस्टॉ निघालं होतं. मी नाव विसरले. पण मग ते बंद झालं. पण हे असं मॅगीचं रेस्टॉरंट एखाद्या कॉलेजशेजारी जोरात चालेल असं वाटतंय. किंवा मग फुड ट्रक लावायचा कॉलेजजवळ.

संस्कार वर्ग, श्लोक, पाढे वा साठी तरूण आजीआजोबांना सामील करून घेता येईल. >>> येस्स, मंजूताई. हे फार मस्त आहे.>>>>+1
मी तरुण आजी नाही , तरुण आई आहे . पण मी हे करु शकते . कंटाळले आहे घरी बसून !!
राजसी zoom बद्दल धन्यवाद ! मलाही आवडत नाही पण इथे हेच वापरतात सगळे.

मी तरुण आजी नाही , तरुण आई आहे . पण मी हे करु शकते . >>> खरंच सुरू कर आदिश्री.

या धाग्याचा उद्देश सुफळ होईल.

उपयुक्त धागा मामी.
मी लोकांना हव्या त्या दुकानातून हव्या त्या सामानाची घरपोच सेवा सुचवणार होतो, जे आधीच्या प्रतिसादांत आलेले आहे.
लहान मुलांसाठी ऑनलाइन चित्रकला / नृत्यकला क्लासेस सुरू करता येतील.

Pages