करोना काळात आणि नंतरच्या जगात काय व्यवसाय / उद्योग करता येतील?

Submitted by मामी on 9 May, 2020 - 01:26

जगायचं, तगायचं आहे आणि पुन्हा उभारीनं आयुष्याला भिडायचं आहे.

कबुल आहे, प्रसंग बाका आहे. नोकरीची शाश्वती नाही. खूप अनिश्चितता आहे. पण हातपाय गाळून बसून काय होणार? पेला अर्धा रिकामा आहे बघण्यापेक्षा तो अर्धा भरलाय हे लक्षात घ्या. आजूबाजूला वाईट घटना घडत आहेत पण आपल्या जमेच्या बाजूलाही अनेक गोष्टी आहेत. अनिल अवचट म्हणतात तसं 'तरी बरं...... अमुकतमुक घडलं नाही. " हा सकारात्मक दृष्टिकोन.

आपल्याकडे (निदान आपल्यासारख्या मध्यमवर्गाकडे. सध्या या धाग्यापुरतं आपल्यावर फोकस करू कारण ते करतानाच कदाचित आपण इतर वर्गाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकू ) मेंदू आहे, हात पाय धड आहेत, डोक्यावर छप्पर आहे, बँकेत थोडीफार का होईना शिल्लक आहे, हाताशी स्मार्टफोन / कॉम्पूटर / इंटरनेट आहे, व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुक / मायबोलीसारख्या साईटमुळे झालेले सोशल नेटवर्क आहे. बरंच आहे की भांडवल. जर गरज पडली तर किंवा यानिमित्ताने आपला व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करूयात का?

या धाग्यात खालील मुद्दे विचारात घेऊ :

* या करोनाच्या काळातही आपल्याकडे अजूनही हातात काय आहे? किंवा यामुळे काय मिळालंय?
* व्यवसाय करण्याची इच्छा आहे का? त्या दिशेने कधी विचार केला आहे का?
* कोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येतील?
* आधीच कोणी सुरूवात केली असेल तर आपले अनुभव इतरांबरोबर शेअर करू
* तुम्हाला व्यवसाय करायचा नाहीये पण काही कल्पना मांडायच्या असतील तर त्या इथे मांडता येतील. इतर कोणाला त्यापासून स्फुर्ती घेऊन काही सुरू करता येईल.

Group content visibility: 
Use group defaults

धागा खरच छान आहे.
ऋन्मेष म्हणतात तशी डिलीव्हरी करणार्‍या स्टाफची खरच चलती आहे सध्या.

बेसिकली आजकाल जे सगळे क्लासेस face to face होतात ते सगळं online Happy
सध्यातरी मी online class hold वर ठेवलाय, पुढचं पुढे बघू. शिक्षिका पण म्हणते आहे की मला मुलांचा चेहरा बघून कळतं की त्यांना समजलंय का नाही. अगदीच urgent असेल तर मी मुलांना मदत करीन.

उत्तम, उपयोगी धागा मामी. मस्त प्रतिसाद.
आमच्या इथल्या बायका आजुबाजुच्या परिसरात रहाणार्‍या लोकांचा व्हाट्सप गॄप करतात व त्यांना अन्न पुरवतात. म्हणजे कसे की ती बाई मेसेज टाकते की २-३ दिवसांनी ती काय पदार्थ बनवणार आहे. व ते ज्यांना हव असेल त्यांनी तिला सांगायचे किती हवे आहे. व त्याप्रमाणे ती ठरवलेल्या दिवशी सर्व तयार करते व लोक तिच्याकडे जाऊन पैसे देऊन आपापली पॅकेट्स घेऊन येतात. त्यामुळे तिच्याकडचे अन्न वाया जात नाही, लोकांना जवळच्याजवळ छान स्वच्छ खाणे मिळते, वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात तेही रास्त दराने. आजुबाजुचेच इतके लोक घेतात की त्या बायकांना लांबची गिर्‍हाईके शोधायची पण गरज पडत नाही. हे करणार्‍या झाडुन सगळ्या बायका व्यस्त आहेत.
काहीजणी आठवड्याचा मेनु गृपवर टाकतात त्यानुसारही लोक ऑर्डर देतात. काहीजणी वा त्यांच्यातर्फे कोणी डिलीवरी माणुस सर्व पॅकेट्स घेऊन सोसायटीत जातात व तिथेच येऊन लोक घेतात... असे बरेच प्रकार होतात.
हे खुप ठिकाणी होतही असेल पण तरी लिहुन ठेवले.

हे देखिल मस्त मॉडेल आहे.

माझ्या आधी रहात असलेल्या बिल्डिंगमधली एक मैत्रीण असं करते. ती असा आठवड्याचा मेन्यु व्हॉट्सअ‍ॅपवर टाकते. आपल्याला हव्या त्या गोष्टींकरता ऑर्डर नोंदवा. इथे तिचं फेसबुकपेज आहे : https://www.facebook.com/SwatiHomeChef

Myma Meals चं मॉडेलही मस्त आहे. रोजचंच जेवंण पण आपल्या सोईनुसार थोडं अधिक करून त्यातून अर्थार्जन. दोन्ही बाजूंची सोय. याचं अ‍ॅप आहे ते डालो करून घ्यावं लागेल.

https://www.youtube.com/watch?v=HHJQYlffvAY&t=3s

हे वर जे सुचवलेले उद्योग आधीही करतेच होते. पोस्ट करोना काय बदल होतील गरजा कशा बदलणार आहे ह्यावर विचार व त्यावर तदनुरूप व्यवसाय काय करू शकतो असं अपेक्षित आहे का मामी...

पोस्ट करोना लोकांकडे चैनीच्या गोष्टी करायला पैसे मुळातच कमी असतील तर फक्त जीवनावश्यक गोष्टी आणि घरपोच माल पुरवठा एवढेच तोकडे पर्याय उरतात.

घरगुती लेव्हलची सुरु असलेली खाद्य पदार्थ विक्री आजपर्यन्त फारशी कायद्याच्या कचाट्यात नव्हती पण आता हाइजीन आणि इतर आरोग्यविषयक निकषानुसार ह्या सेवा पुरवणे बंधनकारक असू शकते ह्याची योग्य ती जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

<< आयडिया चे पण पैसे असतात ना. कोणाकडे फक्त आयडिया असतील पण बाकी काही execute करणे शक्य नसेल तर अश्या व्यक्तीला आयडिया चे पैसे मिळायला हवेत. फुकट आयडिया कशाला इंटरनेट वर! >>
शोध घेतला की फुकटात बर्याचश्या आयडिया मिळतात. महत्वाचे म्हणजे त्याचे एक्जिक्यूशन कसे करता ते. कचरा उचलून स्वच्छता करणे ही काही विशेष आयडिया नाही, पण त्याचे एक्जिक्यूशन करून आज BVG India आज १४०० कोटी उलाढाल करणारी कंपनी आहे.

इथे आय.टी.मधील बरेच लोक तासनतास निरर्थक वेळ घालवत असतात, त्यांच्यासाठी काही आयडिया:
१. जाहिराती सुरू झाल्या की टी.व्ही. चा आवाज आपोआप बंद किंवा कमी होईल असे अ‍ॅप बनवा. ते अ‍ॅप स्टोरमध्ये विका.
२. फूड डिलिव्हरीसाठी किती वेळ लागेल आणि ड्रायव्हर कुठे आहे, ते कळेल असे अ‍ॅप बनवा. ते रेस्टॉरंटना विका.
३. Optimum मार्ग वापरून वेळ आणि इंधन कसे वापरता येईल ते शोधा. ते कंपन्यांना विका.
४. अपॉईंटमेंटची आठवण करून देईल असे अ‍ॅप बनवा. (Twilio चा वापर करून) ते डॉक्टर, हॉस्पिटलना, बँकेत, सरकारी कामात विका.
५. concierge सुविधा देणारे अ‍ॅप बनवा. (प्लंबर् कुठे मिळेल, मला पुण्यातून दिल्लीला जायचे आहे आणि भाड्याने गाडी पाहिजे, मी परगावी आहे आणि डॉक्टर पाहिजे, मेड पाहिजे,) मग त्यातून कमिशन कमवा.
६. माझी खाजगी माहिती जाहिरातीसाठी वापरता येऊ नये म्हणून non-IT savvy लोकांसाठी काही उपाय शोधा.
वगैरे वगैरे.

. फूड डिलिव्हरीसाठी किती वेळ लागेल आणि ड्रायव्हर कुठे आहे, ते कळेल असे अ‍ॅप बनवा. ते रेस्टॉरंटना  --- हे already स्वीगजि/zomato / dunzo मध्ये आहे. आजकाल रेस्टॉरंट इथे डिलिव्हरी करत नाहीत तर डिलिव्हरी पार्टनर शी टाय उप करतात.

ठीक आहे. मग आपली मुले कुठे खेळत आहेत ते ओळखण्यासाठी बनवा आणि पालकांना विका.

कुठल्या हॉटेलात दारू काय किमतीला विकतात याचे अ‍ॅप बनवा, हॉटेलशी संगनमत करून फक्त स्वस्तातले ड्रिंक दाखवा आणि हॉटेलकडून कमिशन कमवा.

नॉन आय.टी. उद्योग
१. एक्स्पोर्ट करा. उदा. आंबे, जरीकाम केलेले कपडे, मसाले
२. इम्पोर्ट करा. उदा. थोडी जुनी/वापरलेली मशिनरी

थोडक्यात सांगायचे तर चिक्कार पर्याय आहेत. काय जमेल ते शोधायला हवे.

करोना प्रतिबंध लढाई साठी आवश्यक सामग्री बनवणे उदा: हँड सॅनिटायझर, साबण इ. सध्याची साथ गेली तरी पुन्हा हिवाळ्यात येण्याचा धोका आहेच.

आपली मुले कुठे खेळत आहेत ते ओळखण्यासाठी बनवा आणि पालकांना विका.----
https://www.amazon.in/dp/B01GD0XJNA/ref=cm_sw_r_wa_apa_i_w34TEbSKQ3D8Z

एक्स्पोर्ट करा. उदा. आंबे, जरीकाम केलेले कपडे, मसाले - ही अशीच गूगल search मध्ये पहिली आलेली website. असंख्य आहेत.
https://engrave.in/crafts

थोडी जुनी/वापरलेली मशिनर ही अशीच एक website असंख्य आहेत
http://www.machinesale.in/Bangalore

दारुचं पण असणार comparison

https://www.google.com/amp/s/www.livemint.com/news/india/fmcg-companies-...

Sanitizers production --
लोकल असा अनुभव आलाय की almost सगळी मोठी दुकानं आणि इ commerce suppliers स्वतःचे सॅनिटीझर्स आणत आहेत मार्केट मध्ये.

https://www.google.com/amp/s/swarajyamag.com/amp/story/insta%252Findia-b...

Ppe kit production भारत शून्य prodution पासून जगात दुसऱ्या नंबरवर पोचलाय दोन महिन्यांत - lockdown मध्ये Happy

हे वर जे सुचवलेले उद्योग आधीही करतेच होते. पोस्ट करोना काय बदल होतील गरजा कशा बदलणार आहे ह्यावर विचार व त्यावर तदनुरूप व्यवसाय काय करू शकतो असं अपेक्षित आहे का मामी...

>> ते तर आहेच. पण आधी जरी कोणी असे हे प्रस्थापित व्यवसाय करत नसतील आणि आता काळापरत्वे पूरक अथवा गरजेच्या अर्थार्जनाची निकड असेल तर सर्व पर्याय इथे सापडावेत अशी संकल्पना आहे.

करोना नंतर काही फार बदल घडतीलच असं नाही पण नोकरी वगैरे गेली तर पर्याय माहित असावेत, त्यावर विचार केलेला असावा, मनाची तयारी झालेली असावी, काही पूर्वतयारी-जमावाजमव करायला लागणार असेल तर त्यासाठी वेळ आहे तो वापरला जावा असा हेतू आहे. शिवाय आपल्याला नसेल करायचं तरी इतर कोणाला याबाबत सल्ला अथवा आयडिया देता येतील.

महत्वाचे म्हणजे त्याचे एक्जिक्यूशन कसे करता ते. कचरा उचलून स्वच्छता करणे ही काही विशेष आयडिया नाही, पण त्याचे एक्जिक्यूशन करून आज BVG India आज १४०० कोटी उलाढाल करणारी कंपनी आहे. >>>> परफेक्ट!

पोस्ट करोना लोकांकडे चैनीच्या गोष्टी करायला पैसे मुळातच कमी असतील तर फक्त जीवनावश्यक गोष्टी आणि घरपोच माल पुरवठा एवढेच तोकडे पर्याय उरतात. >>> Lol नाही हो. इतकं काय जीवन बदलणार नाही. घरपोच पाठवायला माल लागेलच ना तयार करायला? आपली लाईफस्टाईल काही काळापुरती उन्नीस बीस होईल पण बहुतेक मंडळी आपल्या मूळपदी जाण्यालाच प्राधान्य देतील.

जर कोणाची नोकरी गेली / अधिक पैसा मिळवण्यासाठी पार्टटाईम व्यवसाय करायचा ठरवला / या निमित्ताने कोणी नोकरी सोडून व्यवसाय करायचा ठरवला / व्यवसायाचा विचार केव्हाचा डोक्यात आहे पण नोकरी आहे म्हणून कधी गांभिर्यानं विचार केला नव्हता तो आता अनायसे वेळ मिळाला आहे तर विचार करायचं ठरवलं तर आपल्याला सुचत आहेत ते पर्याय समोर ठेवले आहेत.

कोरोना पृथ्वीवरील 25% माणसं कमी करणार आहे. त्यामुळे कोरोना संपल्यानंतर नोकरी जाणार नसून अजून चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

इथे घरगुती अन्नाबद्दल लिहिले आहे तर अमेरीकेत कॉटेजफूड लॉज आहेत. तुम्ही कुठल्या स्टेटमधे रहाता त्या प्रमाणे हे कायदे बदलतात. तेव्हा त्याबद्दल माहिती करुन घ्यावी. यात फुड हॅंडलर्स परमिट पासून काय आणि कुठे विकू शकता याचे वेगवेगळे नियम आहेत. तुमच्या फ्रेंड्सच्या राज्यात अमुक फूड प्रॉडक्ट विकलेले चालते पण तुमच्या राज्यात नाही असे असू शकते. तुमच्या देशी लोकं सर्रास डबे देणे वगैरे करतात आणि आपल्या देशी सर्कल मधे विकतात त्यामुळे कदाचित असे करणे सेफ वाटत असेल पण बहूतेक राज्यांतून असे मिल्स विकणे याला परवानगी नाही. एक मिसहॅप आणि तुम्ही अडचणीत असे व्हायला वेळ लागत नाही. तुमच्या स्टेटचे नियम काय आहेत ते माहित करुन घ्या. आमच्या राज्याचे नियम बरेच रेस्ट्रिक्टिव आहेत त्यामुळे स्थानिकांकडून सातत्याने विचारणा होवूनही मी कधी या उद्योगात पडले नाही. करोना मुळे आधीच परीस्थिती कठीण असताना उगाच आगीतून फुफाट्यात असे व्हायला नको

छान आणि अतिशय उपयुक्त धागा.
मला वाटत कि एकुणच बरेच दिवस याचा इम्पॅक्ट सोशलायझेशन वर राहणार आहे. त्यामुळ अधिकाधिक लोक डिलिव्हरी सर्व्हिसेस , (भाज्या/फळ ग्रोसरी वगैरे) वर अवलंबून रहातील . त्याचबरोबर घरची कामे जस कि फॅन बसविणे,प्लंबिगची कामे वगैरेसाठी चांगली वेबसाईट बनवून तशी लोक पुरविणे यात अजुनही भारतात खुप स्कोप आहे. इथे बर्‍यापैकी तशा वेबसाईटस आहेत पण भारतात मला तरी जस्ट डायल शिएवाय तस काही दिसल नाही.
व्हर्च्युअल शाळा/ट्युटरिंग इथे आणि भारतात भरपुर स्कोप आहे.
व्हेजी गार्डनिंग/ शेती कडे लोक खुप वळु लागली आहेत. खत/माती/रोप्/बीया पुरविण्यासाठी सोय केली तर त्यात खुप स्कोप आहे.

भारतात मला तरी जस्ट डायल शिएवाय तस काही दिसल नाही. --- आहे.
Urbanclap, Housejoy हे मोठ्या शहरांत आहेत. Just dial हे local search engine आहे. Payment पण process करतात बहुतेक. Centralised Complaint handling करतात का ? माहीत नाही. बाकी अजून कित्येक लोकल पण आहेत.

माती/रोप्/बीया पुरविण्यासाठी सोय केली तर त्यात खुप स्कोप आहे. --- बऱ्याच लोकल नर्सरीज फ्री home delivery करतात. जे लोकं हातगाडी घेऊन झाडं विकायला यायचे ते बहुतेक migrant असतील तर गावी गेले असतील नाहीतर येतील परत. बिग बास्केट वर माती, कंपोस्ट, खत, कुंड्या, झारी, ग्लोव्हज इत्यादी मिळतं म्हणजे बाकी तत्सम ठिकाणी पण मिळत असणार. Online nursery आहेत.

व्हर्च्युअल शाळा/ट्युटरिंग इथे आणि भारतात भरपुर स्कोप आहे. --- private शाळांनी / कॉलेजेस नी already व्हर्चुअल learning सुरू केलेला आहे. सरकारी मध्ये नाही अजून सुरू झालं बहुतेक. Byjus चा Byju already famous बिलिनीयर आहे. बाकी vedantu, cue math, kumao हे मला माहीत असणारे आहेत. पण अर्थात प्रत्येक tuition क्लास चालवणारा असं personal virtual tutoring सुरू करु शकतो.
भारतात अलमोस्ट सगळं online मिळतं आणि home deliver पण होतं. गरज लोकांची मानसिकता बदलण्याची आहे. लोकांना स्वतः बाहेर पडल्याशिवाय, चार गोष्टी हाताळल्याशिवाय, विक्रेत्यांशी घासाघीस केल्याशिवाय आणि पाकिटातून कॅश पैसे दिल्याशिवाय कामं केली / चांगली कामं झाली असं वाटत नाही. रोज रोजची भाजी शेतातून खुडून (harvest) 12 तासात home डिलिव्हरी देणारी service पण आहे. तुम्हाला फ्रिज मध्ये स्टॉक करायची गरज नाही, रोज ताजी भाजी मिळवा, शिजवा, खा. बघूया, मानसिकता बदलते का!

हा वेळ स्वतःची authority affiliate marketing वेब्साइट सुरु करण्यासाठी वापरता येईल. एका वाक्यात affiliate marketing म्हणजे दुसर्‍याचे प्रॉड्क्ट ऑन्लाईन विकून कमिशन कमवणे. हे कमिशन प्रॉडक्ट्च्य किमतीच्या १% पासून अगदी ७५% पर्यन्त असते. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात असे खोर्‍याने affiliate प्रोडक्ट्स असतात जे आपल्याला माहिती देखील नसतात.

पण वेबसाईट चान्गल्या रितीने rank होईपर्यन्त एखादे वर्ष सहज जाते. Rank होणे म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट्स विकायचा प्रयत्न करताय ते गूगल च्या पहिल्या पेज वर तुमच्या वेबसाईटच्या लिन्क सह दिसायला लागणे, तेही चकटफू. वर्षभर वाट पहायची नसेल आणि तुमच्याकडे थोडं भांडवल असेल तर तुम्ही गूगल फेस्बूक आणि तत्सम ईतर platforms वर paid ads रन करून देखील तुमचे प्रॉडक्ट प्रमोट करू शकता.

पण affiliate marketing success चा एक flow असतो. कोणत्या niche ची वेबसाईट कशी बनवायची, कोणत्या niche मधले कोणते प्रोडक्ट कसे प्रमोट करायचे, paid ads कशा रन करायच्या आणि बरच काही सुरवातीपासून शिकावं लागते.

तुम्हाला affiliate marketing बद्दल अगदी माहित नसेल तर खालील लिंक वर क्लिक करा
https://onlinemoneyreality.com/affiliate-marketing-definition-what-why-w...

तुम्हाला affiliate marketing शिकायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून फ्री बनवा आणि ७ दिवस एक बेसिक certification course पुर्ण करा. आवडलं तर पुढे जा, नाहीतर एक फ्री certification course करण्यात काही नुकसान नाही Happy
https://onlinemoneyreality.com/LearnAffiliateMarketing

कोरोनाच्या काळात माणसाच्या ख-या गरजा समोर आल्या आहेत. माणसाला दोन वेळेला अन्न लागतं.
व्यवसाय उपलब्ध होतील. पण माणसाच्या गरजा लक्षात घेऊन नवीन व्यवस्था उभारायला पाहीजे.

ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाची गरज नाही त्यांना इथे बंदी घातली तर अनेक रोजगार उभे होती. बाटाला हाकलले तर अनेक जण चर्मोद्योग, पादत्राणांचा व्यवसाय या क्षेत्रात उतरतील. त्यांच्यासाठी महामंडळ बनवा किंवा सहकारी संस्थांचे जाळे उभे करता येईल.

मध्यमवर्गियांना सहकारी संस्था उभारून थेट शेतीतून शेतमाल, डाळी, धान्य आणता येईल. यात शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा आहे.
किराणा माल घरोघरी पोहचवण्याचा धंदा काढता येईल. त्यासाठी सहकारी संस्था उत्तम असतील. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओ सारख्या मध्यस्थांची गरज नाही.

बॅटरीवर चालणा-या वाहनांचे उत्पादन हा एक चांगला व्यवसाय आहे. तसेच फ्युएल सेल वरच्या गाड्या हे भविष्य आहे.

ज्यांना बागकामाची आवड आहे ते हा व्यवसाय करू शकतात. इतरांना त्यांच्या त्यांच्या घरात ऑर्गानिक किचन गार्डन अथवा नुसतीच शोभेची गार्डन वगैरे करून देणे आणि त्यांना हवी तर मेंटेन करून देणे. यासाठी एक छोटीसी टीम हाताशी ठेवावी लागेल. >>> हे मी सुचवलं होतं. आज वाचनात एक अशी कंपनी आली म्हणून इथे देतेय.

आयआयटी च्या दोन तरुणांनी ही Khetify कंपनी सुरू केली आहे.
https://hindi.moneycontrol.com/news/market-news/awaaz-entrepreneur-farmi...

युट्युबवरही त्यांच्याबद्दल माहिती आहे : Khetify - IIT Graduates का ऐसा group जो उगाता है छत पर 700Kg सब्जियां - https://www.youtube.com/watch?v=qN5L5-EQejs

अश्या अजूनही काही कंपन्या / स्टार्टप्स असतील.

हे सगळं छानच आहे . पण मुंबई सारख्या शहरात कच्चा माल साठवण्यासाठी छोटीशी जागा किंवा गोदाम घेणं दुरापास्त आहे. बिया, माती रोपं पुरवणं छान व्यवसाय आहे. किंवा घरी अथवा सोसायटीच्या जमिनीवरच्या रोपांची काळजी घेणं, महिन्यातून एकदा खतपाणी, कीटकनाशके फवारणी अशी कामं बरेच लोक करतात. हातगाड्यांचं मात्र कठीण असतं. परवानगी, हप्ता वगैरे. एका ठिकाणीच लावायची असेल तर गल्लीतल्या दादांना नमन करावं लागतं. खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता पाळणारे आणि वाटेल तेव्हा रजा न घेणारे मदतनीस मिळणं कठीण.
अर्थात नन्नाचा पाढा ना वाचता, अडचणी असल्या तरी इच्छा तेथे मार्ग हे खरंच आहे.

इथे आय.टी.मधील बरेच लोक तासनतास निरर्थक वेळ घालवत असतात, त्यांच्यासाठी काही आयडिया:>>
एखादा सिनेमा किंवा वेबसिरीज कोणत्या streaming platform वर available आहे हे पटकन शोधून देणारे अ‍ॅप कोणी बनवेल तर फार मदत होईल. आमच्या कडे सध्या १०-१२ streaming platform/ अ‍ॅप आहेत. पण एखादा सिनेमा बघायची (विशेषतः जुना सिनेमा) लहर आली तर तो कुठे available आहे हे शोधण्यात फार वेळ जातो.
तसच मला अजून एक service/ अ‍ॅप मिळालं तर हवं आहे पण ते बरचंस स्वप्नरंजन ह्या category मधे मोडतं. रेसिपीज सांगणारे अनेक अ‍ॅप्स किंवा चॅनल आहेत. पण मला अशी काहीतरी सर्व्हीस हवी आहे: माझ्या घरात उपलब्ध असणार्‍या गोष्टी आणि माझ्याकडे असणारा वेळ, असा डाटा मी त्या अ‍ॅपला सांगितला की ते अ‍ॅप मला उपलब्ध साहित्यातून बनणार्‍या रेसिपीज सुचवेल. लॉकडाऊन मधे असं अनेकदा व्हायचं की एखादी रेसिपी करायला उत्साहाने जावं तर लक्षात यायच की त्यातले महत्त्वाचे घटक घरात नाहीतच. किंवा बाजारातून आणण पण शक्य नाहीये. मग काय करावं असा प्रश्न पडायचा.

निव्वळ बनवायचे म्हणून अ‍ॅप बनवण्यात काही अर्थ नाही. मुद्दा हा आहे की त्यातून monetization कसे करणार म्हणजे पैसे कसे कमावणार?

Pages