मिन्दी गाणी - खेळ

Submitted by किल्ली on 8 May, 2020 - 12:29

हा एक टाईमपास खेळ आहे.

ह्यात हिंदी गाणी मराठीत भाषांतर करून लिहायची / गायची आहेत, जमेल तशी.

फा वे टा धाग्यावर उल्लेख केल्याप्रमाणे ही अशी गाणी (बे,) सुरात गायला मजा येते मला.

बघुया किती जमतय आपल्याला.

१. डोळ्यात तुझ्या विचित्र विचित्र अदा आहेत
हृदयाला बनवील पतंग श्वास तुझी ही हवा आहे

(आखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है - ओम शान्ती ओम)

२. माझ्या रंगात रंगणारी परी आहेस की पऱ्यांची राणी
की आहेस माझी प्रेमकहाणी
माझ्या प्रश्नांचं उत्तर दे गं बाई
दे ना

(मेरे सवालो का जवाब दो - मैने प्यार किया)

३. तू जवळ आलास आणि हसलास
तू माहिती नाही कितीतरी स्वप्ने दाखवलीस
आता तर माझं हृदय
जगात नाही झोपत नाही
काय करू देवा
कसंतरी होतंय
( कुछ कुछ होता है)

4. एवढं प्रेम करू नको
मी बुडून जाईन कुठेतरी
परत किनाऱ्यावर यायचं
मी विसरुन जाईन कधीतरी
पाहिलाय जेव्हापासून चेहरा तुझा
मी तर झोपुच शकलो नाही

बोल ग ना जरा
हृदयात जे आहे लपलेलं
मी कुणाला सांगणार नाही

( बोल दो ना जरा - एम एस धोनी)

बाकी आठवतील तशी प्रतिसादात लिहिते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy

कविता लिहिली तेव्हा विरह काही डोक्यात नव्हता. रोजच्या धावपळीत भावना हरवून बसतोय , असा विचार होता.

कविता वाचकाच्या हातात गेली की ती त्याची असते आणि त्याने लावलेला अर्थही तितकाच खरा असतो. तुमचं इंटरप्रिटेशन आवडलं.

>>>>>रोजच्या धावपळीत भावना हरवून बसतोय , असा विचार होता.>>>> ओह करेक्ट.
>>>>कविता वाचकाच्या हातात गेली की ती त्याची असते आणि त्याने लावलेला अर्थही तितकाच खरा असतो.>>>> त्रिवार सत्य आहे हे वाक्य.

बघ मी बघितलं एक स्वप्न,
फुलांच्या नगरात असे घरकुल आपलं
मी इथेs s s तू कुठे s s s s
मी आले आले आले आले
ये ना
----देखो मैने देखा है एक सपना
फुलोके शहर मे है घर अपना
मै यहा, तू कहा
मै आई आयी आयी आयी
आजा

तुला पाहिलं तेव्हा हे जाणवलं सखे,
प्रेम असतचं वेड हे मानलं सखे.
आता येथून जाऊ कुठे,
तुझ्या मिठीत येऊन जगेन.

तुला पाहिलं तेव्हा हे जाणवलं सखे,
प्रेम असतचं वेड हे मानलं सखे.
आता येथून जाऊ कुठे,
तुझ्या मिठीत येऊन जगेन.>>>

तुझे देखा तो ये जाना सनम
प्यार होता है दिवाना सनम
अब यहाँ से कहाँ जाए हम
तेरी बाहों में मर जाए हम...

छुकर मेरे मन को
किया तूने क्या इशारा
बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा
>>
स्पर्शून माझ्या मनाला
केला तू एक काय इशारा
बदले हा मोसम
लागे प्रेमळ हे जीवन

Pages