शिंतोडे

Submitted by वैशाली अ वर्तक on 7 May, 2020 - 10:58

शिंतोडे
होते पहात बागेत
मनोहर पुष्करणी
अंगी पडता तुषार
जाग्या  झाल्या आठवणी

जात होते वाटेतून
होते साचलेले पाणी
गाडी जाता भरधाव
आली बघा आणिबाणी

चिखलाचे ते शिंतोडे
परिधान वस्त्रावरी
किती घाणेरडे पाणी
नको झाले क्षणभरी

पुढे  जाता बरसल्या
वर्षा धारा जोरदार
गेले निघून पाण्याने
शिंतोड्याचे डाग चार

थेंब तुषार असती
सारी रुपे शिंतोड्याची
अती अल्प प्रमाणात
रूपे सारी ती पाण्याची

वैचारिक शिंतोडे ते
करी मनास प्रफुल्लित
विचाराने मन होई
सदा साठी आनंदित

साठलेले ते विचार
मन रूपी कारंज्यात
हास्य रुपी शिंतोड्यांची
करतात बरसात

मोदभरे हास्याचे ते
सदा तुषार उडावे
बेअब्रूचे ते शिंतोडे
जीवनात न पडावे

*....वैशाली वर्तक*

Group content visibility: 
Use group defaults

मस्त

छान.
वैचारिक शिंतोडे ते
करी मनास प्रफुल्लित
विचाराने मन होई सदासाठी आनंदित "हे विशेष आवडले.