Submitted by वैशाली अ वर्तक on 7 May, 2020 - 10:58
शिंतोडे
होते पहात बागेत
मनोहर पुष्करणी
अंगी पडता तुषार
जाग्या झाल्या आठवणी
जात होते वाटेतून
होते साचलेले पाणी
गाडी जाता भरधाव
आली बघा आणिबाणी
चिखलाचे ते शिंतोडे
परिधान वस्त्रावरी
किती घाणेरडे पाणी
नको झाले क्षणभरी
पुढे जाता बरसल्या
वर्षा धारा जोरदार
गेले निघून पाण्याने
शिंतोड्याचे डाग चार
थेंब तुषार असती
सारी रुपे शिंतोड्याची
अती अल्प प्रमाणात
रूपे सारी ती पाण्याची
वैचारिक शिंतोडे ते
करी मनास प्रफुल्लित
विचाराने मन होई
सदा साठी आनंदित
साठलेले ते विचार
मन रूपी कारंज्यात
हास्य रुपी शिंतोड्यांची
करतात बरसात
मोदभरे हास्याचे ते
सदा तुषार उडावे
बेअब्रूचे ते शिंतोडे
जीवनात न पडावे
*....वैशाली वर्तक*
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान! शेवटच कडवं विशेष आवडलं!
छान! शेवटच कडवं विशेष आवडलं!
भापो. खूप छान.
भापो. खूप छान.
धन्यवाद खूप दिवसांनी आज
धन्यवाद खूप दिवसांनी आज मायबोली वर पाहिले . धन्यवाद प्रतिसादासाठी
मस्त
मस्त
छान.
छान.
वैचारिक शिंतोडे ते
करी मनास प्रफुल्लित
विचाराने मन होई सदासाठी आनंदित "हे विशेष आवडले.
धन्यवाद ....नदिशा
धन्यवाद ....नदिशा
...सामो........धन्यवाद
...सामो........धन्यवाद
छान कविता...
छान कविता...
थेंब तोच, पाणी असलं की तुषार
थेंब तोच, पाणी असलं की तुषार होतो आणि चिखल असला की शिंतोडा होतो. कल्पना आवडली.
आवडली
आवडली
धन्यवाद प्रतिसादासाठी...
धन्यवाद प्रतिसादासाठी....हरचंद पालव जी
धन्यवाद ..तेजो अभिप्रायासाठी
धन्यवाद ..तेजो अभिप्रायासाठी