तो आणि ती

Submitted by Asu on 5 May, 2020 - 01:08

तो आणि ती

मद्याचा एकच प्याला
वेड लावितो दारुड्याला
तो ना सोडी वारुणीला
ती ना सोडी मग त्याला

वार्ता पसरली गल्लोगल्ली
दारूविक्री खुली जाहली
बंद दुकानी रांग जमली
सहा फुटांची वाट लागली

तळीरामांची एकच गर्दी
सचिंत झाली खाकी वर्दी
दारूविना घसा कोरडा
कुणी करो आरडाओरडा

पिऊन काहीही घसा गरम
दारुड्या ना लाज शरम
दारूविना मरणार नाही
मद्यप्यांनो करू नका घाई

कामधंदा, नाही नोकरी
बायको रडते, रडे छोकरी
मुलाबाळांची ना चिंता करी
माणसापरीस जनावरं बरी

विष खाण्याही पैसा नाही
पैसे उधळती व्यसनापायी
दारूपायी काळीज सडते
कोरोनाचे काम न पडते

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.04.05.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults