एकदा रात्र होईन म्हणतो

Submitted by पियुष जोशी on 5 May, 2020 - 00:03

कधीतरी एकदा
रात्र होईन म्हणतो
पुनवेच्या रातीचा
चंद्र होईन म्हणतो
भिरभिरणारा तो
एकदा वारा होईन म्हणतो
काळोखात बुडालेल्या आकाशात
लुकलूकणारा
एखादा तारा होईन म्हणतो
होईन म्हणतो एकदा
शांत निजलेली पाने
कधी मधुर आवाजातील एखादे
गाणे होईन म्हणतो
दिवसाला या तरी
नाम मात्र करीन म्हणतो
शांत, निर्मळ अशी एकदा
रात्र होईन म्हणतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर स्वागत!
मस्त लिहिलीये कविता! Happy

दोन ओळींमधे स्पेस दिलीत तर कविता सुटसुटीत दिसेल.

छान