यालाच सुख समजून मी ...

Submitted by प्रकाशसाळवी on 4 May, 2020 - 10:26

यालाच सुख समजून मी सुगंधीत राहीलो
यालाच मुख समजून मी गोंजारीत राहीलो
**
का कळ्यांनो आज तुम्हाला भास झाला
यालाच श्वास समजूनी मी जिवंत राहीलो
**
सुरवंटाचे आयुष्य किती असते सांगा ना !
तरीही सुखाने पंखांना फिरवित राहिलो
**
जे बापजाद्यांनी केले तेच पुढे कित्ते गिरविले
आणि पुढच्या पिढीलाही गिरवित राहिलो
**
काय सुखाची परीभाषा कुणास ठाऊक
अखेर श्वासातही तेच ते शोधीत राहीलो
**
भेट तुझी माझी ती अद्भुत अशी जाहली
अन् पुढेही एकसारखे कसे भेटीत राहीलो
**
उगवतो नभी तो मित्र आणि मावळतो ही
गाठोडे सुख- दू:खाचे तसेही बांधित राहीलो
**
माणूस माणसाला का असा पाण्यात पहातो?
एकदा दे नजर प्रेमाची माणसे जोडीत राहीलो
**
दू:ख मी अगणित सांगितली माझ्या माणसांना
अन् सोनेरी सुखांना मी असा लपवित राहिलो
**
प्रकाश साळवी
०३-०५-२०२०

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults