कजाग -शशक

Submitted by बिपिनसांगळे on 3 May, 2020 - 05:00

कजाग
------------------------------------------------------------------------------------------------
मी निवांत बसलो होतो .चंद्या आला .शंकर गेल्याचं सांगायला.
शंकर आमचा जवळचा मित्र. निर्व्यसनी माणूस. आमच्यासारखं नव्हतं ! अन असा माणूस एकाएकी गेला होता. खूप वाईट वाटलं .
आम्ही त्याच्या घरी पोचलो. लोक जमले होते. रडणाऱ्या बायका. त्यात त्याचीही बायको .
नंतर आम्ही बाहेर जाऊन शांतपणे बसलो. लोकांची बडबड आणि गडबड पहात! थोड्या वेळाने सारं पार पडलं. आता निघायचं -
आणि त्याच्या बायकोने आकांत मांडला. ते पाहवत नव्हतं.
“बघ, कशी रडते साली ! आयुष्यभर नवऱ्याला रडवलं आणि आता स्वतः रडतेय . कजाग बाई ! “ चंद्या म्हणाला.
मी मान डोलवली .
बायका असंच करतात. अहो खरंच ! मी गेलो होतो - तेव्हा माझीही बायको अशीच रडली होती. पार माझ्या अंगावर पडून !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@ बिपीन जी, विषय फार धाडसी आहे, लॉकडाऊन च्या तिसर्या पर्वात फार कंटाळा आलाय. बाकीच्या धाग्यावर लोक पेटलेत. सांभाळून असा. Rofl

मन्या आणि पाफा + 1
मायबोलीवर विषयाला धरून प्रतिसाद देणे फाऊल समजला जातो Happy

भारी Happy

सस्मित का तेल ओतत आहात? Biggrin
ओ नका नां आयडीया देवुत चुकुन ते ईकडे डोकावले तर धागा निघायचा.
माबोवरील स्रिया कजाग आहेत क? तुम्हाला काय वाटते?

बापरे Lol
शशक छान ! Short and strong.
सस्मित LOL . ह्याचे रूपांतर कधीही काडीत होऊ शकते. Lol
@पाफा खरचं....मी तर फार सावधपणे वावरते आहे काही धाग्यांंवर ..... Happy

कुठे आहे ऋन्मेश Happy
नवीन Submitted by च्रप्स on 5 May, 2020 - 00:54
>>>

मी माझ्या गर्लफ्रेंडलाच बायको बनवल्याने कजाग असो वा नसो बोलायची सोय नाही. हि असली धाडसी विधाने अरेंज मेरेजवल्यांना शोभतात

मी माझ्या गर्लफ्रेंडलाच बायको बनवल्याने कजाग असो वा नसो बोलायची सोय नाही. हि असली धाडसी विधाने अरेंज मेरेजवल्यांना शोभतात

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 15 May, 2020 - 00:50
हाहाहा

कटप्पा
ऋन्मेष
सोनाली
तृप्ती
आभारी आहे

शिवप्रीत
शशक लिहिण्याची प्रेरणा इथे मायबोलीवरच मिळाली .
तुमचेही आभार व माबोचेही

Pages