आजी
---------------------------------------------------------------------------------------------
“आजोबा, मला आजी का नाही?” सिनियर केजीमधल्या चिंटूने विचारलं.
त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नावर मी चमकलोच,” का रे? “
“साहिलची आजी किती मस्त आहे ! मलापण अशी एक आजी पाहिजे .”
मी गप्पच झालो. मला अमिताची आठवण आली . आमचं लव्हमॅरेज. पण पुढे बिनसतच गेलं. मी सावरण्याचा खूप प्रयत्न केला .पण नाही! तिने पुढे दुसरं लग्न केलं. मी तसाच राहिलो .तिच्या आठवणींमध्ये झुरत .
अन आता चिंटूला आजी पाहिजे म्हणून, पुन्हा दुसरं लग्न करायचं?...
संध्याकाळी चिंटूची आई आली. त्याला तिचा मोबाईल खेळायला मिळाला.
मध्येच त्याने मला मोबाईल दिला व एका आनंदी कुटुंबाचा फोटो दाखवला . मोठा करून पाहिला अन काळजातच कळ आली .
साहिलची आजी म्हणजे अमिता होती ! …
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आजी-शशक
Submitted by बिपिनसांगळे on 2 May, 2020 - 12:50
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भारीच!!
भारीच!!
आधी मिपावर वाचली होती. शेवटी
आधी मिपावर वाचली होती. शेवटी धक्का छान आहे. पण कथा तितकीशी आवडली नव्हती.
भारी आहे
भारी आहे
सुपर्ब!!!
सुपर्ब!!!
मिपावर वाचली होती शशक. आवडली
मिपावर वाचली होती शशक. आवडली !
मिपावर वाचली होती शशक.
मिपावर वाचली होती शशक.
आवडली !
वावे मन्या ऋन्मेऽऽष
वावे मन्या ऋन्मेऽऽष सामो क्यूटी कुमार आभारी आहे