Before marriage sex.?

Submitted by Kajal mayekar on 1 May, 2020 - 11:06

आज तु फारच छान दिसत आहेस संजना... संजनाकडे बघत अक्षय म्हणाला.

Thank you... संजना लाजत म्हणाली.

तुझे हे सौंदर्य मी अजून जवळून बघू शकतो का संजना...संजनाच्या जवळ जात अक्षय ने विचारले.

अक्षयला आपल्या इतक्या जवळ येताना बघून संजना गोंधळली.. जसे अक्षयची पाऊले संजनाकडे वळली तसे आपसूकच संजनाची पाऊले मागे झाली.

अक्षयला कसे थांबवावे हे तिला कळत नव्हते. तर तिचे मागे सरकणे म्हणजे ती आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी परवानगी देत आहे असे अक्षयला वाटले.

अक्षय संजनाच्या जवळ गेला. त्याने तिच्या कमरेत हात टाकून झटक्यात तिला आपल्याजवळ ओढले. अक्षयच्या ह्या कृतीने संजना बावरली. अक्षय असे काही करेल हे तिला अपेक्षित नव्हते.

अक्षय काय करताय हे तुम्ही.. सोडा ना प्लीज... संजना अक्षयच्या राकट पकडीतुन सुटायचा प्रयत्न करत म्हणाली.

अक्षयने काही सेकंद विचार केला आणि मग त्याने संजनाला सोडले. संजना क्षणाचा विलंब न करता लगेच अक्षयपासून लांब झाली. अक्षयला वाटले संजना लाजली. पण खरे पाहता संजना मुळात थोडी घाबरली होती आणि त्याला कारण ही तसेच होते. ह्या आधी कधी ती कुणाच्या इतक्या जवळ गेली नव्हती.

संजना स्वतःला शांत करत होती कि इतक्यात अक्षयने तिला उचलून घेतले व सरळ बेडवर टाकले.

सर्वप्रथम संजनाला कळलेच नाही की काय झाले जसे तिला कळले की आता पुढे काय होईल तशी ती पटकन बेडवर उठून बसू लागली तसे अक्षयने तिच्या दोन्ही खांद्याना पकडून तिला झोपवले. आता संजना खूपच घाबरली होती..गोंधळली होती.

अक्षय काय करताय तुम्ही.. डोक ठिकाणावर आहे का तुमचे... चिडून संजना म्हणाली. संजनाच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अक्षयने आपला शर्ट काढून बाजूला टाकला व तो संजनाला kiss करणार इतक्यात संजनाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला.

आता संजनाची भीती अधिकच वाढली होती.

अक्षयने संजनाच्या गळ्यातील ओढणी काढून टाकली व तो पुढे काही करणार इतक्यात संजनाच्या भीतीच्या जागी आता रागाने जागा घेतली.

शरीरात होती नव्हती तितकी सगळी ताकद लावून संजनाने स्वतः वरून अक्षयला बाजूला ढकलले व क्षणाचा विलंब न करता आपली ओढणी घेऊन ती बेडवरून खाली आली.

अक्षय संजनाकडे आश्चर्याने बघत होता कारण संजना आपल्याला स्वतःवरून बाजूला ढकलेल हे त्याला अजिबात अपेक्षित नव्हते.

काय झाले संजना... अक्षयने विचारले.

लाज नाही वाटत का तुम्हाला तोंड वर करून विचारायला काय झाले... संजनाने रागाने अक्षयलाच उलट प्रश्न केला.

का ह्यात काय लाज वाटण्यासारखे आहे..?? तु माझी होणारी बायको आहेस.. आपला साखरपुडाही झाला आहे मग हे सगळे साहजिकच आहे ना... अक्षय म्हणाला.

आपले लग्न ठरले आहे अजून झाले नाहीये... संजना रागात अक्षयला म्हणाली.

What do you mean संजना..?? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का..?? आता अक्षयही चिडला होता.

विश्वास... संजना उपहासात्मक हसली तिचे हे हसणे अक्षयला बरेच टोचले कारण कुठे ना कुठे तरी संजनाने कळत नकळत त्याचा so called पुरुषी अहंकार दुखावला होता.

तुमच्यावर विश्वास ठेवूनच तर इथे आले होते मी... संजना म्हणाली.

अग पण अस इतक केल तरी काय मी..?? फक्त थोडी शरीरसुखाची अपेक्षा तुझ्याकडून केली. ह्यात काय चुकीचे आहे..??

मी तुम्हाला इतक्या वेळा थांबवायचा प्रयत्न करत होते तरीही तुम्हाला थोडेतरी कळले नाही का..?? संजनासंजनाने विचारले.

अगदी पण ह्यात काय चुकीचे आहे..?? मी लग्नानंतर तुझ्याजवळ आलो की तेव्हाही असेच मला थांबवणार आहेस काय तु..?? अक्षयने उलट प्रश्न केला.

अर्थातच अक्षय. लग्नानंतर माझी इच्छा नसताना तुम्ही माझ्या जवळ आलात तर तुमच्या आणि एका rapist मध्ये फरकच काय राहिला..?? आणि राहीला प्रश्न ह्या सगळ्यात चुकीचे काय आहे.. हे सगळे साहजिकच वगैरे जे काही तुम्ही म्हणालात तर हो मला वाटते लग्नाआधी sex करणे चुकीचे आहे कारण practically विचार केला तर लग्न झाले नाहीये. लग्नाआधीच sex ची घाई का..?? आणि sex नंतर तुमचे लग्न त्या व्यक्तीबरोबर झाले नाही तर..?? शक्य आहे का मग तुम्हाला त्या व्यक्तीला विसरणे..?? शरीराने एकत्र आल्यावर माणसाचे मन आपसूकच समोरच्या व्यक्तीमध्ये गुंतले जाते. पुढे भविष्यात ज्या व्यक्तीबरोबर लग्न होईल त्या व्यक्तीवर हा अन्याय होणार नाही का.?? पुढे आयुष्यात आपल्याला सतत हि खंत वाटणार नाही का की आपण समोरच्या व्यक्तीची फसवणूक करीत आहोत.

अक्षयच्या प्रतिक्रियेची वाट न बघता संजना एकदाही मागे वळून न बघता निघून गेली.

समाप्त

वाचकमंडळी तुम्हाला काय वाटते लग्नाआधी sex करणे योग्य आहे का..?? आणि योग्य आहे तर कारण काय..??

Group content visibility: 
Use group defaults

छान कथा.
एक समंजस परिपक्व दृष्टीकोन मांडला. नायिकेचा खंबीरपणा आवडला.

दोघे तयार असतील तर मला काही प्रॉब्लेम नाही.

बाकी हि कथा नाही तर चर्चेचा धागा वाटतोय.

अवांतर - हा माझा आयडी नाही.

अवांतराबद्दल क्षमस्व..
माझा ना खुपच Genuine प्रश्न आहे..
जर मुलीची इच्छा असताना Sex केलं तर कायदेशीर आणि तिच्या इच्छा नसताना केलं तर रेप, करायचा प्रयत्न केला तर विनयभंग ( कायदेशीर पार्टनरसोबत बरं का) but what abou MEN..

म्हणजे त्याची इच्छा नसेल तर??

मग केवळ मुलीची इच्छा आहे म्हणून मुलाने मन मोडून Sex केला तर रेप, विनयभंग हे प्रकार लागू होत नाहीत का??
कित्येक पुरूष केवळ "स्त्री" संतुष्ट करण्यासाठी आणि घरात नंतर होणारी भांडण टाळण्यासाठी करतात किंवा आपल्या पार्टनरला आपण संतुष्ट नाही केलं तर तो ऑप्शन शोधेल ही भीती असतेच ना..

आणि ह्यात मनाचा होणारा कोंडमारा कित्येक पुरूष लोक हसतील म्हणून आतल्या आत घेऊन जगत असतात.

मला फक्त इतकंच म्हणायचं आहे.. जेव्हा दोघांची इच्छा असेल तेव्हाच Sex करावा.. thats called equality right??

आणि दोघांपैकी एकाची इच्छा नसेल तर सरळ समजून घ्यावं..

विनयभंग, रेप पुरूषांचे सुद्धा होतात.. फक्त समाजाचा नजरीया बदलला पाहीजे..पुरूषांनादेखिल तितकचं गांभिर्याने घेतलं गेलं पाहीजे..

As long as both of them are adults(not minors) and both parties agree, it should always be fine. Married or not married doesn’t matter. Men, women nothing matters.

बहुदा विरोधी आणि अवांतर प्रतिसाद उडवत असतील अडमीन

पण अशाने निम्मी मायबोली उडेल त्याचं काय

Happy

समोरच्या मुलीने कशीही प्रतिक्रिया दिली तरी ती लाजली असाच अर्थ काढतो अक्षय, केमिकल लोचा आहे त्याचा Proud

दोघांच्या संमतीने झाले तर काही चूक नाहीये. आताच्या मुलीही पूर्वी पेक्षा स्मार्ट आहेत सो सगळं समजून उमजूनच करत असतील. जेंडर आणि लग्ना आधी किंवा नंतर this doesn't matter.

लग्नाआधी करायलाच हवे म्हणजे नंतर सरप्राइझेस टळू शकतात. व वेळीच डंप करता येते अथवा पुढे जाता येते. कंपॅटिबल नसाल तर डोंबला ची जन्मठेप कोण भोगणार?

हा आयडी माझा नाही अन् तो माझा आहे.
दुसरं सुचत नाही का काही?
विरंगूळा करावा पण त्यातून दुसऱ्यांनाही आनंद मिळावा, त्रागा नाही.

लग्नाआधी करायलाच हवे म्हणजे नंतर सरप्राइझेस टळू शकतात. व वेळीच डंप करता येते>>>>> उत्तम सल्ला.
गावाकडे आम्ही ढाब्यावर जेवायला गेलो की आचारी आम्हाला लहान वाटीत ग्रेव्ही आणून देतो. ती चाखून आम्ही ठरवतो ऑर्डर द्यायची की नाही ते.

कित्येक पुरूष केवळ "स्त्री" संतुष्ट करण्यासाठी आणि घरात नंतर होणारी भांडण टाळण्यासाठी करतात
>>>>>

येस्स असेही होऊ शकते.

दोन्हीकडून एकाची कुचंबणा आणि एकावर जबरद्स्ती होऊ नये म्हणून दोघांची सेक्सबद्दलची आवड //प्रमाण जुळणे फार गरजेचे आहे.
आणि हे जुळते की नाही हे केव्हा कळणार?
नुसते बोलून एकमेकांची सेक्सबद्दलची आवड ओळखणे किंचित अवघड आहे. त्यासाठी तो करणे हाच ऊत्तम मार्ग आहे.

म्हणजे बघा हं.
कांदेपोहे संभाषण चालू आहे,
तुम्ही दारू पिता?
ओकेजनली पार्टी वगैरे,
आणि तुम्ही?
मी सुद्धा चारसहा महिन्यातून एकदा

तुम्ही सिगारेट ओढता?
कधी तल्लफ आलीच तर, दिवसातून एखाद वेळ..
आणि तुम्ही?
छे! मला तो वासही आवडत नाही.
काही हरकत नाही, मी सोडायचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत घरात पिणार नाही.

अच्छा तुम्हाला सेक्सची आवड आहे?
हो, आहे थोडीफार. पण कधी केला नाही.
आणि तुम्ही?
मला तर फार आवड आहे. पण मी सुद्धा कधी केला नाही.
मग आठव्ड्यातून किती वेळा करायला आवडेल?
मला सुट्टीच्या दिवशी करायला आवडेल..
मला तर मूड आल्यावर करायला आवडेल..
मला रोज करायला आवडेल... पण मला झेपेल का हे माहीत नाही..
आणि पोजिशन्स?
अबडक तबडक
अरे देवा ... झेपेल आपल्याला?
मला काय माहीत? आवड सांगितली.. मी नॉर्मल पोजिशनने तरी कुठे केलेय..
..
..
संभाषणाचा शेव्ट -
जाऊद्या जमेल तसे करूया. ज्याला जसे झेपेल तसे झेपेल. लग्नानंतर घेऊ सांभाळून एकमेकांना...

लग्नानंतर घेऊ सांभाळून एकमेकांना...>>
धागा लग्नाआधीच्या घटनांबाबत आहे, लग्नानंतर काय करावं, कसं करावं याबाबत नाही.

जाऊ द्या हो
त्याला सवय आहे लांबलचक असंबद्ध प्रतिसाद द्यायची
त्याला टोकू नका
आनंद घ्या
अजून यात त्याने शाहरुख ला कसे आणले नाही
कारण दारू आणि सिगारेट आणली आहे
या दोन्ही गोष्टी करणारा सेलिब्रिटी तर यायलाच हवा
Happy

या तै नी असलं शीर्षक देवुन निदान नवीन ५/६ धागे काढु शकण्याच्या शक्यतेच्या चिंधड्या (राई राई हे पुलंच्या शिक्षकाने वाचलेल्या टोन्मधे) उडवल्यात.
असं शीर्षक देतं का कोणी कधी????????
अरे विचारायचे लोकांना की बाबांनो.......
लग्नापुर्वी सेक्स केला तर चालेल का?
लग्नापुर्वी सेक्स केला असल्यास चालेल का? (यात दोन्ही समाविष्ट)
लग्नानंतर सेक्स करावा की नाही ?
लॉकडाउन काळात सेक्स करावा का?
सद्य काळात अपत्यप्राप्तीसाठी सेक्स आवश्यक आहे का?

Happy
+ 1572

धागा लग्नाआधीच्या घटनांबाबत आहे, लग्नानंतर काय करावं, कसं करावं याबाबत नाही.
>>>
तो संवाद लग्नाआधीचाच आहे.

@ आशुचॅम्प, असंबद्ध प्रतिसाद असला की उडवले जातात Happy

मनापासून thanks who appreciate
आणि बाकी टिकाकारांना बोलू द्या नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल

हो
सेक्स या विषयावर आपल्याकडे उघड बोलायल घाबरतात
त्यात तुम्ही लग्नाआधीच्या सेक्सवर त्यांना बोलायला सांगत आहात.
असंब्द्ध आणि अवांतर प्रतिसाद येणारच Happy

अवांतर - फेसबूक पेज दवणीय अंडे यावर आपला हा लेख काल पाहिला. ईथे काही लोकांना ते माझे वाटते पण माझे नाहीये. गैरसमज नसावा.

Consent हा एक शब्द समजून घेतला तर धागा आणि प्रतिसाद काहीही लिहायची गरज उरत नाही. लग्नापूर्वी, लग्नानंतर, प्रेम असताना, प्रेम नसताना... कोणत्याही कंडिशनमध्ये consent असेल तर काहीही करायला हरकत नाही. Consent नसताना काहीही करणे म्हणजे अत्याचारच/ या केसमध्ये बलात्कारच. यात gender मॅटर करत नाही.

Pages