मर्ज ड्रॅगन्स व इतर मोबाइल गेम्स- लॉकडाउन इस्पेसल.

Submitted by अमा on 29 April, 2020 - 07:25

माझ्या मायबोलीकर मित्र व मैत्रीणींनो,

आपण ह्या लॉक्डाउन च्या कठीण काळात एक मेकांच्य साथी ने एक एक दिवस मोजुन घालवत आहोत. टेन्शन, व वर्क फ्रॉम होम, वाढलेले घरातले काम , व्हॉ ट्सॅप ग्रुप वर्ची चॅलेंजेस पाणीपुरी काय, डालगोना कॉफी काय, बनाना ब्रेड अन काय काय. साड्या नेसुन फोटो काढा, मेक अप करुन फोटो अपलोड करा ..... ह्यातले मी काहीही करत नाही. गरजे पुरते काम स्वयंपाक व बाकी माबो पितामह झक्कींच्या घालुन दिलेल्या
नियमांनुसार एम बी ए - नव माबो बालकांसाठी - मस्त बसून आराम करते.

फटाफट कामे उरकुन मस्त पैकी गार गार पाण्याचा शावर घेउन सोफ्यावर पंख्या खाली बसून फ्रेश डोक्याने मोबाइल उघडून गेम खेळते. भरपूर
टाइम पास. तुम्ही खेळता का काही गेम्स?

मला पॅक मॅन, स्पेस इन्वॅडर्स, डिग डग च्या काळा पासून आर्केड व पझल गेम्स आवडतात. सध्या सॉलि टेअर पत्त्यातले व मर्ज ड्रॅगन अश्या दोन गेम्स फोन वर आहेत. कधी कधी बबल शूटर गेम पण अस्ते. कँडी क्रश बॉटल क्रश ज्वेल क्वेस्ट खेळून खेळून डोक्याचे भजे झाले म्हणून आता त्या नाहीत फोन मध्ये.

मर्ज ड्रॅगन मस्त गेम आहे, ह्यांची एक साइट पण आहे.

एक कँप म्हणून एरिआ आहे. तिथे ड्रॅगन ची तीन अंडी एकत्र केली की ड्रॅगन व्हेल्प जन्माला येते. अश्या तीन झाल्याकी एकत्र केल्यावर किड व ते
तीन झाले की एक फुल वाढलेला ड्रॅगन जन्माला येतो. व पाँइट मिळतात. ह्याच्या मध्ये. कँपच्या जमिनीवर फुले , दगड , मणी, मशरूम्स,
व इतर काय काय असेच तीन तीन च्या पटीत एकत्र करून वाढवत न्यायचे. मध्ये बोनस मिळत राहतो.

अधुन मधुन खेळायला कँप मधुन बाहेर येउन क्वेस्ट आहेत. व कँप मध्ये पन लाइफ देउन जागा जिवंत कराव्या लागतात. हिरवे चौकोन चौकोन आहेत व डेड लँड लाइफ दिल्यावर जिवंत होते व त्यावर काही ठेवता येते वगैरे.....

खरे पैसे देउन पण काही विकत घेता येते. पण ते तुमच्यावर आहे. ही ऑप्शन डिसेबल करता येते. व गेम मधीलच कॉइन्स व दगड देउन वस्तु घेता येतात. म्हणजे आर्थिक नुकसानाची भीती नाही.

मी २३ मार्च ला गेम डाउन लोड केली प्ले स्टोअर मधून . माझा अँड्रो इड फोन आहे. अ‍ॅपल फोन वर माहीत नाही गेम चालते का ते.
अजून चालू आहे. तिसरा लॉक्डाउन अनाउन्स होईलच. अपने को क्या डर!!! मेरे पास ड्रॅगन्स है.

एकच वैताग म्हणजे बॅक ग्राउंड ट्युन एकच सारखी वाजत राहते ते डोक्यात जाते. म्हणून म्युट करुन खेळलात तर बरे. तुम्ही खेळत असाल तर मला रिक्वेस्ट पाठवा.

लुडो पेक्षा बरे वाटले. ही ही ही.

https://www.mergedragons.com/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उद्योग आहे की अमा. तुझ्यातली मदर ऑफ ड्रॅगन जागृत झाली आहे. तुझ्या अंगाखाद्यावर चिकार ड्रॅगन्स खेळत राहोत.

मी देखिल माझ्या डेस्कटॉपवर काही हॉटलिंक्स सेव करून ठेवल्या आहेत. मला पझल्स आवडतात. हे माझे फेवरीट :

१. http://www.agame.com/game/magic-links

२. https://logic.puzzlebaron.com/init2.php

३. https://www.sudoku-puzzles-online.com/irregular-sudoku/choose-a-grid.php

४. https://www.247mahjong.com/

यातल्या १ आणि ४ तर एकीकडे काही ऐकत खेळता येतात.

तुझ्या अंगाखाद्यावर चिकार ड्रॅगन्स खेळत राहोत.>> व्हय जी. आताच्या घडीला १४५१ ड्रॅगन आहेत. २८१ का काय स्टार आहेत. भले मोठे झालेले
ड्रॅगन्स खूप च आहेत. मजा म्हणजे गेमच नोटिफिकेशन पाठवते कि आत सर्व उठलेत चला या खेळायला.

मला समहाऊ मोबाईल गेम्स कधीही रुचले नाहीत. सध्याच्या लॉकडाऊनमध्येच असं नाही पण ओव्हरऑल नेहमीच लोकांनी टाकलेल्या छान छान पदार्थांचे फोटो, चर्चा, सल्ले, रेसिपीज, कुकींग ब्लॉग्ज, व्हिडिओ वगैरे बघून खात राहण्याच्या मोहमायेपासून वाचवण्यासाठी सोमी वर न जाता मोबाईल गेम्स खेळावेत का अशा विचारात आहे. पण ड्रॅगन्स वगैरे झेपणार नाहीत.
मामी तुझ्या लिंक्स बघते.

हे हे हे .... खायला काय देतेस ड्रॅगन्सना?>> गेम मध्येच द्राक्षे, पेअर, केळे स्ट्रोबेरी ह्यांची झाडे आहेत. तेच खात असतील. कारन ते फक्त झोपतात व काम करतात .