मर्ज ड्रॅगन्स व इतर मोबाइल गेम्स- लॉकडाउन इस्पेसल.

Submitted by अश्विनीमामी on 29 April, 2020 - 07:25

माझ्या मायबोलीकर मित्र व मैत्रीणींनो,

आपण ह्या लॉक्डाउन च्या कठीण काळात एक मेकांच्य साथी ने एक एक दिवस मोजुन घालवत आहोत. टेन्शन, व वर्क फ्रॉम होम, वाढलेले घरातले काम , व्हॉ ट्सॅप ग्रुप वर्ची चॅलेंजेस पाणीपुरी काय, डालगोना कॉफी काय, बनाना ब्रेड अन काय काय. साड्या नेसुन फोटो काढा, मेक अप करुन फोटो अपलोड करा ..... ह्यातले मी काहीही करत नाही. गरजे पुरते काम स्वयंपाक व बाकी माबो पितामह झक्कींच्या घालुन दिलेल्या
नियमांनुसार एम बी ए - नव माबो बालकांसाठी - मस्त बसून आराम करते.

फटाफट कामे उरकुन मस्त पैकी गार गार पाण्याचा शावर घेउन सोफ्यावर पंख्या खाली बसून फ्रेश डोक्याने मोबाइल उघडून गेम खेळते. भरपूर
टाइम पास. तुम्ही खेळता का काही गेम्स?

मला पॅक मॅन, स्पेस इन्वॅडर्स, डिग डग च्या काळा पासून आर्केड व पझल गेम्स आवडतात. सध्या सॉलि टेअर पत्त्यातले व मर्ज ड्रॅगन अश्या दोन गेम्स फोन वर आहेत. कधी कधी बबल शूटर गेम पण अस्ते. कँडी क्रश बॉटल क्रश ज्वेल क्वेस्ट खेळून खेळून डोक्याचे भजे झाले म्हणून आता त्या नाहीत फोन मध्ये.

मर्ज ड्रॅगन मस्त गेम आहे, ह्यांची एक साइट पण आहे.

एक कँप म्हणून एरिआ आहे. तिथे ड्रॅगन ची तीन अंडी एकत्र केली की ड्रॅगन व्हेल्प जन्माला येते. अश्या तीन झाल्याकी एकत्र केल्यावर किड व ते
तीन झाले की एक फुल वाढलेला ड्रॅगन जन्माला येतो. व पाँइट मिळतात. ह्याच्या मध्ये. कँपच्या जमिनीवर फुले , दगड , मणी, मशरूम्स,
व इतर काय काय असेच तीन तीन च्या पटीत एकत्र करून वाढवत न्यायचे. मध्ये बोनस मिळत राहतो.

अधुन मधुन खेळायला कँप मधुन बाहेर येउन क्वेस्ट आहेत. व कँप मध्ये पन लाइफ देउन जागा जिवंत कराव्या लागतात. हिरवे चौकोन चौकोन आहेत व डेड लँड लाइफ दिल्यावर जिवंत होते व त्यावर काही ठेवता येते वगैरे.....

खरे पैसे देउन पण काही विकत घेता येते. पण ते तुमच्यावर आहे. ही ऑप्शन डिसेबल करता येते. व गेम मधीलच कॉइन्स व दगड देउन वस्तु घेता येतात. म्हणजे आर्थिक नुकसानाची भीती नाही.

मी २३ मार्च ला गेम डाउन लोड केली प्ले स्टोअर मधून . माझा अँड्रो इड फोन आहे. अ‍ॅपल फोन वर माहीत नाही गेम चालते का ते.
अजून चालू आहे. तिसरा लॉक्डाउन अनाउन्स होईलच. अपने को क्या डर!!! मेरे पास ड्रॅगन्स है.

एकच वैताग म्हणजे बॅक ग्राउंड ट्युन एकच सारखी वाजत राहते ते डोक्यात जाते. म्हणून म्युट करुन खेळलात तर बरे. तुम्ही खेळत असाल तर मला रिक्वेस्ट पाठवा.

लुडो पेक्षा बरे वाटले. ही ही ही.

https://www.mergedragons.com/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उद्योग आहे की अमा. तुझ्यातली मदर ऑफ ड्रॅगन जागृत झाली आहे. तुझ्या अंगाखाद्यावर चिकार ड्रॅगन्स खेळत राहोत.

मी देखिल माझ्या डेस्कटॉपवर काही हॉटलिंक्स सेव करून ठेवल्या आहेत. मला पझल्स आवडतात. हे माझे फेवरीट :

१. http://www.agame.com/game/magic-links

२. https://logic.puzzlebaron.com/init2.php

३. https://www.sudoku-puzzles-online.com/irregular-sudoku/choose-a-grid.php

४. https://www.247mahjong.com/

यातल्या १ आणि ४ तर एकीकडे काही ऐकत खेळता येतात.

तुझ्या अंगाखाद्यावर चिकार ड्रॅगन्स खेळत राहोत.>> व्हय जी. आताच्या घडीला १४५१ ड्रॅगन आहेत. २८१ का काय स्टार आहेत. भले मोठे झालेले
ड्रॅगन्स खूप च आहेत. मजा म्हणजे गेमच नोटिफिकेशन पाठवते कि आत सर्व उठलेत चला या खेळायला.

मला समहाऊ मोबाईल गेम्स कधीही रुचले नाहीत. सध्याच्या लॉकडाऊनमध्येच असं नाही पण ओव्हरऑल नेहमीच लोकांनी टाकलेल्या छान छान पदार्थांचे फोटो, चर्चा, सल्ले, रेसिपीज, कुकींग ब्लॉग्ज, व्हिडिओ वगैरे बघून खात राहण्याच्या मोहमायेपासून वाचवण्यासाठी सोमी वर न जाता मोबाईल गेम्स खेळावेत का अशा विचारात आहे. पण ड्रॅगन्स वगैरे झेपणार नाहीत.
मामी तुझ्या लिंक्स बघते.

हे हे हे .... खायला काय देतेस ड्रॅगन्सना?>> गेम मध्येच द्राक्षे, पेअर, केळे स्ट्रोबेरी ह्यांची झाडे आहेत. तेच खात असतील. कारन ते फक्त झोपतात व काम करतात .

खूपच खपून म ड्रॅ मध्ये थोडे प प्रभुत्व मिळवले आहे. त्यासाठी गेमचे रेडिट पेज व विकिपीडिआ ची मदत झाली.

गेम मध्ये एक वीकेंड्ला इवेंट असतो. त्याला ते ते नाव असते. जसे ह्या वीकेंडला फा बू ऊ उ ऊ लस हेलोवीन इवेंट आहे. ह्याचा जनरल फॉर्मॅट सेमच असतो व चॅलेंजेस पण सेमच असतात. पण नवख्याला अवघड वाटू शकतात.

इवेंट शुक्रवारी रात्री भारतातील साडे बाराला सुरू होतो व भारतातील सोमवारी रात्री साडेबाराला संपतो. तीन दिवस असतो. चेलेंजेस खालील प्रमाणे आहेत.

एक शेप असतो. इवेंट थीम नुसार. त्यातील लँडचे चौकोन हील करायचे. ह्याला पॉइन्ट असतात. १ २ १० ५० ५०० ५००० व तीन टाइल्स ला ५०००० पॉइन्ट. ही पूर्ण करायला सहा तरी लाइ फ ऑर्ब ऑफ हेवन्स लागतात.
१) पहिले ३५ चौकोन हील करायचे
२) कोणते ही पाच आय टम एकत्र मर्ज करायचे.
ह्यात गेम मधले आयट म फुले पाने झाडे दगड हार्ट वगैरे आहेत काही पण प्लस प्रत्येक इवेंट मध्ये इवेंट हार्वेस्टेबल काही एक अस्तात ते ही थीम नुसार. जसे की जपानी थीम असली तर राइस केक नूडल बाउल सुशी कंदील हे ते असे असतात. ह्याच्या पण दहा लेव्हल्स आहेत.
हे १५० करायचे.

३) लाइफ फ्लावर मधील एक लेव्हल ५ फूल आहे. ते हार्वेस्ट करायचे २०० वेळा. त्या आधी हे फूल बनवावे लागते.

४) हे झाले की गेम मध्ये जी जमीन आहे त्यावर बरीच तण सुकी झाडे हाडे वगैरे पडलेली अस्तात त्या पासून ७५ लाइफ फ्लाव् र बनवायचे.

५) मग इवेंट हार्वेस्टेबल लेव्हल ७ हे पाच बनवायचे.

६) लाइफ ऑर्ब ऑफ हेवन्स ३ बनवायचे.

७) ३५० जमीनीचे तुकडे हील करायचे.

८) ६५० जमिनीचे तुकडे हील करायचे.

९) इवेंट हार्वेस्टेबल चा एक स्पेशल सोर्स असतो त्या पासून ७५ हार्वेस्ट करायचे.

१०) सर्व जमीन हील करायची.

हे करायला तुमच्या हाती दोन बाल ड्रॅगन्स असाfunction at() { [native code] } त थीम नुसार ते बदलतात.

एक एक इवेंट हार्वेस्टेबल बनवत गेले की तुम्हाला पॉइन्ट मिळ त जातात व एक एक बक्षिस अ‍ॅड होत जाते. हे पण इवेंट संपायला आला की च क्लेम करायचे.

गेम मध्ये तुम्ही नेहमी खेळतात त्या जागेला कँप म्हण तात ही बक्षिसे क्यांप मध्ये जातात.

इवेंट पूर्ण केला की इवेंट क्वेस्ट स्टार मिळतो पॉइन्ट असतात व तुम्हाला इतर बक्षिस बरोबर एक विहीर एक अंड्यांचे घरटे व एक सोनेरी
झाड मिळते.

अधून मधून इतरही बक्षिसे मिळत राहतात. पैसे मिलत राहतात व त्यातून कँप मध्ये काहीही विकत घेता येते. ( हे गेम मधले पैसे)

इवेंट च्या शेप मधील काही भाग ढगांनी झा कलेला असतो. व त्याला एक एक क्लाउड की असते. असे पाच सहा क्लाउड असतात. की जमिनीत असते कुठेतरी किंवा शोधून मर्ज करून बनवावी लागते. की चा भाग हील करून मग की तिथे ठेवली की क्लाउड उघडतो. ह्याच्या आत काही कही बक्षिसे अस्तात.

इवेंट सोडवायचे एक टेक्निक आहे. त्याचा मी अभ्यास करून एक पद्धत बनवली आहे. मर्ज ड्रॅगन चे विकी पेज किंवा सब रेडिट आहे त्यावर
ड्रागोनिया डेन चे लोक्स हेल्प्फूल गुगल डॉक टाकतात. व सोडवायची पद्धतही लिहीतात. तिथेच लोक शंका वगिअरे विचार तात व सोलुशन देतात. टेक्निक मी पुढे लिहीन.

कँडी क्रश बॉटल क्रश >>> सध्या मी कँडी क्रश सोडा खेळतेय, पुर्वी कधीही मी कँडी क्रश खेळले नव्हते. मोबाईलवर गेम्स खेळत नाही मी. पत्ते गेम्स किंवा हा गेम मी डेस्कटॉपवर खेळते. पैसे वगैरे भरत नाही, फ्री असेल तेवढंच. हा सोडा बॉटलवाला गेम हल्ली दोन महीनेच खेळतेय. साडेतीनशेच्या पुढे गेलेय.

अमा तुम्ही मागे लिहिले होते म्हणून मी सहज डालो केला मर्ज ड्रॅगन्स आणि नादच लागला की हो. Happy मजा येते खेळायला.
वीकेन्ड इव्हेन्ट मजा असते पण ते लाइफ ऑर्ब ऑफ हेवन्स फार वेळखाऊ काम आहे. काही टेक्निक आहे का लवकर बनवायला किंवा लवकर लँड हील करायला.

When the event opens and you have cleared enough land buy prism flower level four. This costs real$ do be prepared.
In my experience I have to buy 24 of these at inr 10 each approximately 600 inr. I 5 merge them to make one level 8 flower bouquet. This is called prism flower method. You will get leaves. Make two small trees. In between this bouquet will give high level life orbs. 5 merge them . Out of the wood from trees you will get mushrooms. Make level 6 shrub. Merge three of them to get a wonder.

Wonder will give either nest - high kevel cloud key or extra eggs . You will get more dragons to do your work.

This event is a mix of active play and passive play.

Once you get higher level life flowers you can leave on passive play and let dragons harvest. Watch it once a while or the dragons waste a lot of time on lower level hearts harvest.

Once I reach passive play level I do housework in between.

मी नाव वगैरे पण माझं देत नाही, गेममधे आणि मेल आयडीही नाही. अर्थात ते फेसबुकवरुन मिळवू शकतात. मी ऑनलाईन असताना एकीकडे फेसबुक ओपन असतं.

Hi star oasis event has started. Get Anubis dragon eggs and other goodies for camp. Happy weekend.

हाय गेम अपडेट. आता मला इवेंट सोडवता येतात. तितपत प्रगती केली आहे. नवी स्ट्राटेजी खालील प्रमाणे.

शुक्रवारी रात्री साडेबाराला इवेंट उघडतो.
रात्री आधी झोपताना फोन चार्जिंगला लावुन झोपा म्हणजे तो फुल चार्ज होईल.

१) पहिले ३५ जमीन सोडवायची.
२) मग एक प्रिझम फ्लावर दुकानातून घ्यायचे. खर्च रुं दहा. पहिले आपल्याला स्लो ड्रागन असतो. दोन फास् ड्रागन सारखी चैन नाही जीवनात. हा रॉक्या हळू हळू उपद्य्वाप करत करत चालू असतो.

३) मग पुढील लँड सोडवत सोडवत दुसरी क्वेस्ट साठी फूल बनवायचे. व ती हळू हळू चालू करायची.
४) साइडला पाच मर्ज करत राहायचे. रात्री दोन अडीच ला फोन पॅसिव्ह प्लेवर टाकून झोपाच. हे गरजेचे आहे. मग मी पाच साडेपाचला उठते.
कुत्रा उठे परेन्त मला दीड तास निवांत मिळतो. मग घरच्या कामांसाठी ब्रेक घ्या व फोन चार्ज करून ठेवा.

५) आता कामे संपली ब्रेफा करून रुइन्ड पॅलेस वंडर बनवायला घ्या. लक्ष लावुन केले तर जेवायच्या आधी साडेबाराला झाले पाहिजे. आधी सुद्धा होईल. वंडर झाले की लगेच लग्गेच टॅप करा तरच घर टे मिळायचा चान्स आहे. आज मला मिळाले प्लस पाच अंडी. ही पाच गेम मधील दोन व घरट्याच्या खालची सहा व घरट्यातली चार पाच मिळून पाच ते सहा ड्रा गन्स मिळतात. आता रॉकीला विश्रांती द्या त्याला इथे तिथे भटकूदे.

६) आता जेवण झोप ब्रेक घ्या. गेम पॅसिव्ह प्ले ठेवा व लागेल ते करत रहा. इथ परेन्त एक ब्रिलिएंट लाइफ फ्लावर झाले पाहिजे पर्पल कलर्ड
७) आता शॉप मधून अजून एक प्रिझम फ्लावर घ्या. व ही दोन प्रि फ्ला व एक ब्रि ला फ्ला मिळून एक लाइफ ऑर्ब ऑफ हेवन्स बनवा.
हे झाले की तुमचे क श्ट संपले.
८) आता तिसरी क्वेस्ट आरामात संपेल हार्वेस्ट फ्रॉम डेड प्लांट्स. काही करावे लागत नाही. व दुसरे तिसरे ब्रिला फ्ला मिळेल.
९) रेडिट वर ट्विटर वर ड्रॅगन गिल्ड क्लाउड की गाइड देतात. ती जरु र बघून घ्या. गरज नसेल तर लेव्हल ६ इन्फिनाइट हार्वेस्टेबलस डिलीट करा.

१० ) आता पाच मर्ज करत करत. दोन ला ऑर ऑफ हेवन्स बनवून घ्या. मी आत्ता ह्या परेन्त आहे. आता बागडत बागड त बोर्ड क्लीअर करून घ्या व उद्या परेन्त परत एकदा पाच मर्ज करत लाऑऑ हे. बनवा. ह्यासाठी आधीचे पर्पल १३ ऑर्ब लागतात. सोमवारी मला हपीस अस्ते. पण्मागील आठवड्याचा इवेंट मी जायच्या आधीच सकाळी सा डे आठला संपवला.

टोटल ५ लाऑरॉ हेवन्स लागतातच. उरलेले मग संपवायचे.

११) लेव्हल १० इवेंट क्वेस्ट हार्वेस्टेबल बनवणे शक्य आहे पण माझा संयम नाही टिकत.

१२) इवँट क्वेस्ट स्टार साठी जरूर प्रय्त्न करा सोमवारी रात्री साडेबारा परेन्त वेळ असतो. ह्यात घुबड ड्रा गन एग्ज एक विहीर व एक सोनेरी झाड मिळते जे एरवी मिळत नाहीत किंवा अवघड आहेत.

भारीच अमा Happy तुम्ही एकदम सॉलिड गेमर दिसताय !
पॅसिव प्ले वर ठेवायचे म्हणजे कसे नक्की?

पॅसिव प्ले वर ठेवायचे म्हणजे कसे नक्की?>> म्हंजे असे की फोन ओपन मोड मध्ये ठेवायचा. बारके ड्रागन आपापले काम करत राहतात. म्हणजे पॅसिव्ह प्ले. अ‍ॅक्टिव्ह प्ले म्हणजे आपन फोन घेउन टोच्या मारत बसायचे. काही लोक बॉस डेवलपर टाइप असतात ते फोन च्या सेटिन्ग मध्ये जाउन फोन पूर्ण चोवीस तास ऑनच ठेवतात म्हणजे इवेंट लगेचच खतम करता येतो. हे मला जमत नाही माझ्याफोन मध्ये अर्धा तास जास्तित जास्त फोन ओपन होतो मग लॉक होतो.

काल शुगर पाइन्स इवेंट चालू झाला. माझ्या तीन क्वेस्ट झाल्या. आता वंडर बनवाअय्चे व एक लाऑर्ब हेवन बनवायचा हे टार्गे ट आहे. यावेळी इवेंट हार्वेस्टेबल्स सर्व नटस आहेत पाइन कोन्स, नटस अ‍ॅकॉर्न स्टार अनीस दोन बेरीज व हे ते आहे. हॅपी मर्जिंग

आर्काडिआ म्हणून एक पोर्टल आहे त्याचे दोन डबे मिळाले. हे हळू हळू काम चालू आहे.