आओगे जब तुम ओ साजना

Submitted by किंकर on 25 April, 2020 - 11:52

आयुष्यात प्रेम , ममता , आपुलकी सर्व काही गमावलेला एक तरुण, आर्थिक आघाडीवर भरपूर पैसे यश असूनही पराभूत आणि मनाच्या उद्विग्न अवस्थेत भरकटून सर्वस्व सोडून दिशाहीन जात असतो.

आणि जीवनावर भरभरून प्रेम करणारी एक अल्लड युवती, जिने तिच्या मनातल्या राजकुमाराशी लग्न करून संसार थाटण्याचे नक्की केलेले असते आणि त्या स्वप्नवत अवस्थेत आपल्या घरी जात असते.

आयुष्याच्या अशा अगदी भिन्न मनस्थितीत ते दोघे जण एकमेकांना भेटतात. भेट एका रेल्वेच्या डब्यात झाली असल्याने रेल्वे आणि ....... अर्थात जब वुई मेट या चित्रपटाची कथा पुढे सरकू लागते . एकूणच या चित्रपटाच्या कथेला वेग आहे . दोघांच्या आयुष्यातील गतकाळ आणि भविष्य यांची सांगड घालत आपले अनुभव परस्परांना सांगत प्रवास पुढे चालू ठेवतात.

या अशा एका वेगवान कथानकात एका वळणावर संपूर्ण चित्रपटाला कलाटणी देणाऱ्या क्षणी, कथानकात अतिशय सहज सामावून जाणारे हे गीत पडद्यावर इतक्या तरलतेने सुरु होते कि बस्स ....

उस्ताद रशीद खान यांनी ज्या ताकतीने पहिली आ आ आ हि तान घेतली आहे कि जणू त्या आर्ततेतूनच पुढील परिस्थिती काय असेल याचा अंदाज यावा. पडद्यावर कॅमेरा पुढील दृश्यावर नेण्यासाठी या आलापी पाठोपाठ येणारे बासरीचे स्वर गीतातील आर्तता सुरवातीसच अधोरेखित करतात.

आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे .... हि रचना. हे गीत मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा त्यातून नवीन नवीन अर्थ उलगडतात असे मला नेहमीच वाटते.

नैना तेरे कजरारे हैं
नैनों पे हम दिल हारे हैं
अनजाने ही तेरे नैनों ने
वादे किए कई सारे हैं
या ओळी जेव्हा उस्तादजींच्या गळ्यातून उतरतात तेंव्हा का कोण जाणे पण सुमनजींनी गायलेल्या एका मराठी गाण्यातील या दोन ओळी मला सारख्या कानात गुंजत राहतात. ते गाणे आहे -- केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर ..., पण नैना तेरे कजरारे हैं या शब्दापाठोपाठ

गहिवरला मेघ नभी, सोडला ग धीर याच ओळी येतात आणि पराभूत प्रेमाची आर्तता आणि मनोमन कोसळणे यांचा मिलाप होतो आहे असेच वाटत राहते

काही गीत रचना अशा असतात कि प्रत्येक कडवे जीवनाचा नवा नवा अर्थ आपल्या समोर उलगडून, त्यातून जणू वेगवेगळ्या भावनांच्या रेशीम लडीच आपल्यासमोर उलगडत असतात. आणि तरीही मन मात्र सारखे गीताच्या ध्रुव पदाकडे धाव घेत राहते. त्यामुळे हे गीत ऐकताना मन सारखे -

बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे.... इकडेच धाव घेत राहते

आणि उस्ताद रशीद खान यांचे या गीताचे सादरीकरण देखील असेच आहे संपूर्ण गाणे जरी एक गायक गात असला तरी, स्त्री मनाची घालमेल व्यक्त करणारी अगदी नाजूकातली नाजूक भावना आवाजातील चढ उतारातून त्यांनी अलगद टिपली आहे. पण त्या ताना आलापी आपल्याला पुन्हा पुन्हा ध्रुव पदाकडे खेचत राहतात

हि रचना ऐकताना नेहमी मला हे मनोगत जरी अगतिक प्रेमिकेचे असले तरी ती पराभूत वाटत नाही आणि या नाजूक स्थिती देखील आपले प्रेम नक्कीच यशस्वी होईल या आशावादावर ती जगते आहे असे मला वाटते आणि त्यामुळेच शेवटी तिच्या ओठी शब्द येतात -
सपनों का जहाँ
होगा खिला खिला
बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे
तर मग डोळे मिटून शांतपणे एकदा ऐकुया -https://www.youtube.com/watch?v=WPwTPhFMm3k

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त गाणे आहे.. सॉरी मस्त काय नुसते.. क्लास गाणे आहे !

लेखही सुंदर !

मला मित्र हसायचे जेव्हा मी एकटाच कॅंटीनमध्ये हे गाणे रिपीट मोडमध्ये लाऊन ऐकायचो. पण संध्याकाळची वेळ, एकांत आणि चहा... यासोबत हे गाणे लावा मस्त वाटते.
त्यानंतरही कधीतरी अध्येमध्ये ऐकणारया निवडक गाण्यांपैकी एक आहे हे..

आज नक्की ऐकतो ! शनिवारही आहे. रात्रीच्या शांततेत कॉफी मॅगी आणि मोबाईल अशी मेहफिलही जमणार आहेच.

माझ्यासाठी हे गाणं म्हणजे,
एकांतात गरम कॉफी खिडकीबाहेर बघितलं तर पावसाच्या सरी आणि बँकग्राउंडला वाजणार हे गाणं.. Happy जो मौहोल पैदा होतो.. अहाहा..

Kashvi , ऋन्मेऽऽष, मन्या ऽ - प्रतिसादाकरिता धन्यवाद !
खरच हे छान गाणं आणि भोवतालचा माहोल म्हणजे दुग्ध शर्करा योग .
हातात कॉफी आणि मनात भिजवणारा पाऊस . मग बाहेरील पावसाच्या सरी मन चिंब करणारच . खरय ना !

त्यामुळे हे गीत ऐकताना मन सारखे -

बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम झूमके
दो दिल ऐसे मिलेंगे.... इकडेच धाव घेत राहते
>>>>>>>>>>>>
अगदी असेच वाटते.

एकांतात गरम कॉफी खिडकीबाहेर बघितलं तर पावसाच्या सरी आणि बँकग्राउंडला वाजणार हे गाणं.. Happy जो मौहोल पैदा होतो.. अहाहा..>>> ++१११

TI - धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी ! अगदी खरय आवडते गाणे आणि माहोल व्वा

मला हे मनोगत जरी अगतिक प्रेमिकेचे असले तरी ती पराभूत वाटत नाही आणि या नाजूक स्थिती देखील आपले प्रेम नक्कीच यशस्वी होईल या आशावादावर ती जगते आहे असे मला वाटते ~~+१२३४५
वा.. खरचं सुंदर आहे गाणं.

अप्रतिम गाणं आणि सुंदर पिक्चर... माझा अतिशय आवडता, कधीही लागला तरी पहावासा वाटतो...
तुमचा लेखही मस्त जमलाय... पुलेशु...!

BLACKCAT - देश रागाच्या जवळ जाणारा हा राग या गीतात छान वापरला आहे. धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी .

swwapnil - गीतातील रिदम आपल्याला सतत ध्रुवपदाकडे नेत राहतो, धन्यवाद

Piku,आणि मीनाक्षी कुलकर्णी - आपल्या प्रतिसादाकरिता मनपूर्वक आभार.

खूपच सुंदर गाणं. लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पहिली तानच पुढचा सगळा मूड निर्माण करते.
लेखही छान

खूप सुंदर लिहिलंय....

हा चित्रपट खूप आवडता आहे , तीन चारदा पाहून झालाय, गाणे पण खूप आवडते पण हल्लीच्या गाण्यांशी काही कनेक्शन राहिलेच नाही. गाणे डोळ्यांसमोर काहीही चित्र उभे करत नाही. हे गाणे चित्रपटात कधी येते हे आठवतच नाहीये Happy Happy

मी मनाने अजूनही 50-60-70 च्या दशकात अडकल्यामुळे बहुतेक असे होत असावे .

हीरा , साधना ,निर्झरा ,च्रप्स , mi_anu ,मन्या ऽ, अजिंक्यराव पाटील - आपण सर्वांनी दिलेले अभिप्राय आणि मतप्रदर्शनासाठी मनपूर्वक आभार.
punekarp - आपण दिलेली लिंक लेख लिहण्यापूर्वी वाचनात आली नव्हती. हायझेनबर्ग - एक..यांनी उस्तादजींच्या आवाजाविषयी लिहताना व्यक्त केली असलेली मते नक्कीच योग्य आहेत. सुंदर आणि ताकदीचा कलाकार हे नक्कीच. आणि संदर्भासाठी -आओगे जब तुम ओ साजना आल्याने प्रतिक्रियां मध्ये चर्चा पण छान झाली आहे. लिंकसाठी धन्यवाद .