#TravelDiaries
#Around_The_Globe
दिवाळी अंकातल्या अमेरिकेच्या प्रवास वर्णनात:
"...मग ते अनोळखी पण लोभसवाणे गोरे कपल ताबडतोब आमचे मित्र झाले. सूर जुळतात म्हणतात ना ते असे. मैत्री ला देश वय जात धर्म यांचे बंधन नसतेच मुळी. त्या रात्री दोनशे मैल प्रवास करून ते आम्हाला आग्रह करू करू - आग्रह करू करू - आग्रह करू करू त्यांच्या घरी घेऊन गेले. प्रवासात आम्ही खूप गाणी म्हंटली ह्यांनी म्हटलेले "ओ मेरी जोहरा जबी" तर त्यांना इतके आवडले कि बस. त्यांच्या २२ खोल्याच्या मॅन्शन मध्ये स्वतःच्या हाताने दोघांनी आम्हाला विविध चविष्ट पदार्थ करून खाऊ घातले. आम्हाला भेटायला त्यांच्या गावातले खूप लोक आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रेमळ. निरोप घेताना आमचे काळे आणि त्यांचे निळे डोळे भरून आल्या शिवाय राहिले नाहीत...."
जर असे लिहिले असेल तर ते असे वाचा:
"मी आणि हे (गोट्याचे बाबा) ज्या ग्रीन वॉटर पार्कात चार महिने रोज फिरायला जायचो तिथे मेलं काळ कुत्रे जरी दिसल तर शप्पथ!"
#प्रवासवर्णनातील_मायनर_त्रुटी
लेख व स्वाती आंबोळे यांचा
लेख व स्वाती आंबोळे यांचा प्रतिसादही धमाल..
फारएण्ड, तुम्ही दिलेली लिंक
फारएण्ड, तुम्ही दिलेली लिंक उघडत नाहीये.
लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही हहपुवा! योगायोगाने आत्ता एक प्रवासवर्णनच लिहीते आहे, तेही अमेरीकेतले.. त्यामुळे काय नाही लिहायचं, हे कळतंय.
Pages