समदानी एखादाच

Submitted by सामो on 22 April, 2020 - 10:12

* नाव बदललेले आहे.

जरी हे व्यक्तीचित्र असले तरी एक प्रकारची जंत्री आहे, यात कोणतीही चमकदार घटना नाही. हे लेखिकेचे स्मरणरंजन आहे. काही अत्यंत रोचक प्रसंग शोधायचा असेल तर तो यात सापडणार नाही. अजुन एक केलेले नीरीक्षण हे लेखिकेचे वैयक्तिक नीरीक्षण आहे. त्यावरती मतभेद संभवत नाहीत. मग एल1 वाले असुरक्षित नसतातच/असतातच/यापैकीकाही ठोस नाही वगैरे काहीही मतभेद असोत. लेखिकेची मर्यादीत हवे तर पीत दृष्टी नीरीक्षणे म्हणुन फक्त वाचणे.
________
समदानी - माझा सहकारी. याची ओळख मी कशी करून देईन तर सर्वप्रथम माणुसकी असलेला एक माणुस - माझा ऑफिसातील सहकारी - मुसलमान ज्याचे वडील शिंपी होते. म्हणजे बेतास बात घरातून आलेला. अन्य काही गुणावगुण ओघात येतीलच. तूर्तास इतकेच. सावळा- उंच-देखणा या सहकार्‍याशी माझी पहिली ओळख कधी झाली कधी आम्ही हँड शेक केला ते काही मला आठवत नाही. पण लक्षात आहे तो त्याचा माणुसकी असलेला स्वभाव. समोरच्याला कमी न लेखणारा, आस्था दाखविणारा, समोरच्याचे बोलणे एकाग्रतेने ऐकणारा. समोरच्याचे म्हणणे शांतपणे व एकाग्रतेने ऐकून घेणारा. भारतातून अमेरिकेत एल1 व्हिसावर आलेला समदानी माझ्या टीममध्ये होता. सदैव आनंदी-हसतमुख दिसायचा, हसला की सावळ्या चेहर्‍यावरती पांढरे शुभ्र दात लखकन चमकायचे. मला तो का आवडला तर बर्‍याच कारणांसाठी काही वर आलेली आहेतच अजून एक म्हणजे ऑफिसातील, राजकारणापासून तो थोडा दूरच होता. एल1 वरचे भारतीय एकमेकांची प्रचंड खेचत , स्वत:च्या असुरक्षिततेचे ओंगळ वाटावी अशी वर्तणूक करत. समदानी अपवाद होता. काळजीमुक्त, आनंदी आणि स्वतःची तत्वे, काही एक स्टँडर्ड राखून असलेला.
.
त्याच्याकडे खूप छान छान टीप्सही असत जशा देहबोली बद्दल. तो सांगे - कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीचे विस्फारलेले डोळे आपल्या बोलण्यात त्या व्यक्तीसा रुची आहे हे दर्शवितात तर चेहरा आपल्याकडे पण पाय अन्य दिशेस म्हणजे त्या व्यक्तीला तेथून कटायचे आहे. मी हसत या काही अगदी अतिपरिचीत टिप्स ऐके कारण तोदेखील माझे obvious वाटणारे बोलणे एकाग्रतेने ऐके. आमची mutual admiration society होती albeit silent .तो अन्य सहकार्‍यांसारखा रुक्ष नव्हता. त्याच्यामध्ये नेतृत्व गुण होते. पुढे एल1 वरून तो एच1 वरती तेही डेलॉइट मध्ये manager झालेला मला लिंक्ड इन वरून समजले.
.
एकदा कोणतातरी database manage करण्याचे काम त्याच्यावर सोपविला होते. मी त्याला म्हटले "मी तुला मदत करेन. मला database च्या बर्‍याच संकल्पना निट माहीत आहेत." खरं तर मला मदत करायची होती पण त्याने मला खूप समजावून सांगितले शेवटी तो म्हणाला "This is my ownership. मला अन्य कोणाची मदत नको." खरं तर एखाद्या कामाची ownership आणि मग त्या basis वरती होणारे संभाव्य appraisal यांची सांगड मला कळली ती तेव्हा प्रथमच.
ऑफिस मधील लॉरा नावाच्या सेक्रेटरी ची मैत्री मिळवण्याचा तो प्रयत्न करतो हे मला माहीत होते आणि त्या गोरवर्णी शिष्ठ मुलीला तो रुचणार नाही हे सुद्धा. पण मी कोण सांगणारी म्हणुन मी फक्त मूकपणे त्याचे प्रयत्न पहात असे.
.
टीम लंचमध्ये एकदा फ़ोटो काढण्याचे काम त्याच्यावरती सोपविलेले होते. मी मात्र माझा फ़ोटो काढू नये म्हणून संकोचाने चेहर्‍यावरती हात ठेवला आणि नेमका त्याने फ़ोटो काढला. नंतर बरेच दिवस तो चिडवे "जोव्ह आप तो पापाराझी के डरसे जैसे सेलिब्रिटॆज मुंह छुपाते है वैसे बिहेव्ह कर रहे थे ;)" एकदा, आमचा वर्मा नावाचा प्रचंड खत्रूड मॅजेनेजर कंपनी सोडून चालला होता. त्याच्याबरोबर कॉफी करता सारेजण जाणार होते . मी ठरविले होते कामाचा बहाणा करून जायचे नाही. तेव्हा एकटा समदानी मला समजवायला थांबला, "जोव्ह चलो. आप आये नाही तो बुरा दिखेगा. वर्मा का कुछ नाही जायेगा, आप अकडू हो ऐसा इंप्रेशन क्यों करना चाहते हो? Bear his last day with a pinch of salt" फक्त त्याच्या विनंतीला मान देऊन मी गेले खरी पण नंतर वाटले जे केले ते अगदी योग्यच केले. Why burn bridges & moreover why give importance to people like वर्मा?
.
आमचे प्रॉजेक्ट बे एरियातील एका गावात होते. समदानीने सांगितलेला एक विनोदी प्रसंग आठवतो. एकदा त्याने पाहिले एका काळ्याचे कृष्ण्वर्णियाचे, २५ सेंटस खाली पडले जे समदानीने उचलून त्या काळ्याला दिले. परत पडले परत उचलून दिले. तिसर्‍यांदा पडले तेव्हा समदानीला कळले "दालमे कुछ काला है " आम्ही सारेजण इतके हसलो. खरं तर ऑफिस मध्ये तो प्रसंग बरेच दिवस जोक झालेला होता.
.
पुढे आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वरती गेलो. मी दुसरीकडे तर समदानी अन्यत्र. फेसबुकवरती "मेहरू" नावाच्या इंडोनेशिअन-अमेरिकन मुलीशी त्याने लग्न केल्याचे कळले. पण नंतर नंतर फेसबुकवर फक्त रोज चमचमीत खाण्याचे फ़ोटो त्याच्याकडून येउ लागले. इतके की हा माणूस खाण्याकरताच जगतो काय असे वाटावे. तिडीक येईल इतके रोज ३ वेळचे खाण्याचे फोटोज. Something was wrong . त्याने कधी लिहीले नाही पण त्यचे लग्न मोडले असावे ही शंका घेण्यास खूप वाव आहे. नंतर एका काही मुस्लिम तसेच काही हिप्पी मुली-मुलांबरोबरच्या भटकंतीचे त्याचे वाळवंटातील दाढी वाढवून अरबाअंसारखा फेटा घातलेले फ़ोटो येत राहिले. पण या फ़ोटोत तो अतिशय आनंदी दिसे.
.
पुढे लिन्क्ड इन वरती अचानक त्याचे अपडेट आले "योगा टीचर". बापरे डेलॉइट मॅनेजर ते योगा टीचर ....मोठीच उडी की ही. up the ladder की down हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबुन असेल. पण एक नक्की एक वेगळं मस्त कलंदर आयुष्य तो जगला-जगतो आहे. आणखी एक नक्की जिथे जाइल तिथे तो आसपासच्या लोकांना समृद्ध करणार हेही तितकेच अटळ.
.
थोड्या थोडक्या नाही २० वर्षाच्या माझ्या नोकरीच्या कारकिर्दीत एकाच समदानी निघाला बाकी रॅट रेस वाले उंदीर. हे फक्त त्याचे गौरवीकरण करायला इतरांची खोडलेली लाइन नाही हा माझा मनुष्य स्वभावाचा घेतलेला अनुभव आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखिकेचे स्मरणरंजन आहे. काही अत्यंत रोचक प्रसंग शोधायचा असेल तर तो यात सापडणार नाही.........

हे वाचले नाही.सरळ लख वाचत गेले.मग काही पटेना.मग वरची वाक्ये वाचली आणि संदर्भ लागला.

लेखिकेचे स्मरणरंजन आहे. काही अत्यंत रोचक प्रसंग शोधायचा असेल तर तो यात सापडणार नाही.........

हे वाचले नाही.सरळ लेख वाचत गेले.मग काही पटेना.मग वरची वाक्ये वाचली आणि संदर्भ लागला.

सामो, छान व्यक्तिचित्रण.
डेलॉइट मॅनेजर ते योगा टीचर हा प्रवास रॉबिन शर्माच्या monk who sold his ferrari ची आठवण करून देऊन गेला.
जीवनात वैफल्य आलं की काही काही जण असा निर्णय घेतात.

ह्या लेखात 'काळ्या' असा उल्लेख आलेला आहे. हे सर्वतः अयोग्य आहे - आफ्रिकन अमेरिकन म्हटले पाहिजे. आपण आदर केला पाहिजे वंश-वैविध्याचा.

काळे = ब्लॅक
मराठी भाषांतर आहे ते. काळा वर्ण या शब्दात आक्षेपार्ह काय आहे समजेल का? काळा हे विशेषणही आहे जे की त्या वंशाला, वर्णावरुन मिळालेले आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Black_History_Month - जर ब्लॅक हिस्टरी मंथ साजरा केला जातो तर ब्लॅक या शब्दात आक्षेपार्ह काय आहे?
'एन' शब्द आक्षेपार्ह समजला जातो. 'काळा' नाही.

हेटाळणीचा स्वर जाणवला मला. कृष्णवर्णी म्हणा हवे तर - वर तुम्ही वापरलाच आहे की गौरवर्णी हा शब्द. भाषेतले बारकावे न समजल्याने असे घोळ होत असावेत .

मलाही खटकला काळ्याचे... असा उल्लेख. कॅजुअली बोलताना असा उल्लेख केला जातो, नाही असं नाही पण लिहिलेलं वाचताना खटकला. ते जे जोक म्हणून लिहिलंय त्यातला जोकही फारसा कळला नाही. पण ते असो..

ढवळे सर बरोबर संस्कृत शब्द किती छान वाटतात ऐकायला. मराठीच्या तुलनेत.
अरेच्च्या यात मराठीचा अवमान झाला का? सॉरी आय डिड नॉट मीन इट. Happy
___________
>>>>>>हेटाळणीचा स्वर जाणवला मला. >>>> मग विनम्रतेने मी हे निदर्शनास आणू इच्छिते की - तो तुमच्या दॄष्टीचा दोष आहे. दोष या अर्थी दोष नाही म्हणायचं मला. मला वाटतं तो आपला पूर्वग्रह आहे. असो Happy

ह्या लेखात 'काळ्या' असा उल्लेख आलेला आहे. हे सर्वतः अयोग्य आहे - आफ्रिकन अमेरिकन म्हटले पाहिजे. आपण आदर केला पाहिजे वंश-वैविध्याचा.>> प्लस वन.

CNN news title (date - 7 Apr 2020)
Why black Americans are at higher risk for corona virus

Another title -
Black America must wake up to this viral threat.

Fox News title(date - 7 Apr 2020) -
Coronavirus exerts heavy till on blacks in places like Chicago

https://www.urban.org/urban-wire/say-african-american-or-black-first-ack...
Today, some people view “black” and “African American” interchangeably. But many have strong opinions that “African American” is too restrictive for the current US population. In part, the term African American came into use to highlight that the experiences of the people here reflect both their origins in the African continent and their history on the American continent.
_______________________
@ढवळे तुमच्या ओळखीमध्ये मी वाचले की आपण ओहायो मध्ये असता. आपण ब्लॅक ही सर्रास वापरली जाणारी संज्ञा ऐकली नाही?

@अमा, भारतामध्ये 'काळे' हा शब्द कसा ओळखला जातो मला माहीत नाही. अमेरीकेत सर्रास वापरला जातो. कोणताही न्यूनगंड हा शब्द घेउन येत नाही की वापरणार्‍याला कोणताही अपराधगंड देत नाही.

मागील (२०व्या) शतकात अनेक दशके आफ्रिकन अमेरिकन लोकांसाठी "डार्की" शब्द मीडियामध्ये सर्रास वापरायचे. डार्की आणि ब्लॅक यात जो फरक तोच काळा आणि कृष्णवर्णीय यात आहे. आता डार्की शब्द वापरला जात नाही. दोन्ही शब्द एकाच गोष्टीला indicate करत असून सुध्दा.
शब्दाचा अनुवाद केला म्हणजे sensibilities (and sensitivity) चा अनुवाद होत नाही automatically.
जिथे त्या माणसाच्या त्वचेच्या रंगावरच्या कमेंटला "विनोद" मानून खोखो हसणे, (तो standing joke होणे) हेच मूळात खटकत नाही तिथे शब्द कुठला वैगेरे गोष्ट फार दूर आहे.

@नाबुआबुनमा कोण हसलं?
>>>>शब्दाचा अनुवाद केला म्हणजे sensibilities (and sensitivity) चा अनुवाद होत नाही automatically.>>>> अय्या खरच मग काय प्रमाणपत्र सादर करायचं? मला स्वतःला काळ्या लोकांबद्दल अतोनात आदर आहे. जस्टीफिकेशन द्यायची गरज नाही पण देते. काही नीरीक्षणे -
(१) या लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर अव्वल दर्जाचा असतो
(२) त्यांच्या रक्तातच ठेका असतो. उत्तम नृत्यकला येते.
(३) डाउन टु अर्थ व नम्र असतात.
(४) समोरच्याकरता, पट्टकन 'ब्लेसिन्ग्स' तोंडात येतात.
(५) गरीबीमुळे व अन्य लोकांच्या अन्यायी किंवा भेदभाव करण्याच्या वृत्तीमधुन, यांचे तुरुंगात भरती होण्याचे प्रमाण बरेच जास्त असते. पुस्तके आहेत या विषयावरती.

इथे काय फरक पडतो काळयांना काळे म्हणाले तर? इथे कोण काळे वाचायला येतात का?आणि ह्या लेखात तरी काळा हा शब्द हिणवण्यासाठी वापरला नाहीये. जर गोऱ्या ला white / पांढरा म्हणलं तर काही प्रॉब्लेम नसेल तर काळा का प्रॉब्लेम? भारतीय दृष्टीने काळे-पांढरे सगळे सारखेच. Its not रेसिस्ट.

>>>>ह्या लेखात तरी काळा हा शब्द हिणवण्यासाठी वापरला नाहीये>>>> पीतदृष्टीनेच पहाणार्यांना त्याचे काय राजसी.

>>>> गोऱ्या ला white / पांढरा म्हणलं तर काही प्रॉब्लेम नसेल तर काळा का प्रॉब्लेम?>>>> Happy कारण गोरा म्हणजे काहीतरी उच्च अशी त्यांचीच स्वतःची भावना असते, चष्मा असतो आणि मग तो दुसर्‍यावर प्रोजेक्ट होतो.

Anyway, I am taking a break for a few days. इथे चर्चा चालू द्यात.

Pages