लॉकडाऊनमध्ये वेळ सत्कारणी लावता येण्यासाठी करता येणार्या गोष्टी

Submitted by स्वप्ना_राज on 19 April, 2020 - 03:27

मी इथे आजकाल फारशी येत नाही. त्यामुळे हा धागा काढ्ण्याचं मनात आलं तेव्हा थोडी शोधाशोध करून आधीच कोणी संकलन केलं आहे का ते पाहिलं. लगेच कुठला धागा दिसला नाही म्हणून हा काढतेय. दुसरा असा धागा असेल तर लिंक द्या. तो अ‍ॅड करेन.

तर सध्या वर्किंग फ्रॉम होम असल्याने फारसा वेळ हाती लागत नाहिये पण जो लागतो त्यात जे काही करतेय किंवा करायचं योजते आहे त्याच्या ह्या लिंक्स. तुम्हाला उपयोगी पडल्या तर उत्तम.

१. Duolingo App - परकीय भाषा शिकायला उपयुक्त. रोज फक्त ५-१० मिनिटं देऊ शकता. फार वेळ इन्वेस्ट करायची गरज नाही. फक्त भाषा शिकायची आवड हवी. आणि हो, ह्याचं अ‍ॅडिक्शन होऊ शकतं बरं का Happy

२. Stitcher किंवा पॉडकास्टस ऐकायचं दुसरं कुठलंही अ‍ॅप. आणि ही पॉडकास्टसची लिस्ट कुठले पॉडकास्टस ऐकता?

३. मराठी नाटकं - http://natak.com/

४. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची लाईव्ह सफर - ही नुकतीच सुरु झाली आहे. https://www.youtube.com/channel/UCzj_lZkssvEhK3GykJ0A1sw

५. For techies Happy - https://www.pluralsight.com/ एप्रिलमध्ये कोर्सेस चकटफू देत आहेत.

६. हार्वडचे कोर्सेसेही एप्रिलमध्ये फ्री आहेत. https://online-learning.harvard.edu/catalog?keywords=&paid%5B1%5D=1&max_price=&start_date_range%5Bmin%5D%5Bdate%5D=&start_date_range%5Bmax%5D%5Bdate%5D=

७. वेदिक गणित - https://www.youtube.com/results?search_query=%2321DayVedicMathChallenge

८. 'बारोमास' नाटकाच्या टीमतर्फे कथांचं अभिवाचन:

https://www.facebook.com/LoksattaLive
https://www.facebook.com/natakbaromaas

तुमच्याकडे माहिती असेल ती जरुर पोस्ट करा. काळजी घ्या. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही पोस्ट केलेल्या सर्व लिंक्स पहिल्या नाहीत , पण कृपया तुम्ही पोस्ट केलेली एखादी गोष्ट कॉपीराइट च्या अंतर्गत येत नाही एवढं एकदा तपासून घ्या (विशेष करून गूगल ड्राईव्ह मध्ये स्टोअर केलेल्या गोष्टी)

प्राचीन, sparkle Happy मी-माझा धन्यवाद. पुस्तकांची लिंक काढून टाकली आहे.बाकी कुठे कॉपीराइटचा मुद्दा येईल असं वाटत नाही

ओ तै धन्यवाद,
बरेच दिवस झाले एखाद्या मुव्हीची/ सिरीयल चिरफाड वाचायची इच्छा आहे. लिहा प्लीज.

@ स्वप्ना, ६. हार्वडचे कोर्सेसेही एप्रिलमध्ये फ्री आहेत ----- मी कधी online course केले नाहीयेत. ५ आठवडे आणि १५ आठवडे कालावधीचे २ आवडलेत. DURATION, TIME COMMITMENT per week हे काटेकोर असते का?

जर तितक्या वेळात आपला नाही झाला पूर्ण तर course access disable होतो का? की PDFs मध्ये study material download करून ठेवता येते ?

ता.क. -- कळले काय प्रकार आहे ते. लॉगईन केल्यवर दिसले सगळे कालवून दिलेले. आधी काही FAQ वगैरे दिसले नाही म्हणून विचारले होते. लिंककरता धन्यवाद.

मुलांसाठी online science course/quiz असं काही असेल तर सुचवा ना. वयोगट इयत्ता ४थी/५वी. हार्वडचे कोर्सेसे पाहिले. ते थोड्या मोठ्या मुलांसाठी योग्य वाटले.
शक्यतो science experiments घरी करा अश्या type चे courses नको. कारण त्याला लागणारं सामान घरात असेलच असं सांगता येणार नाही. आणि एखादा experiment बघितला की मुलीला तो करायची फारच खुमखुमी येते आणि त्याला लागणारं सामान घरात नाही म्हटलं की गंगा-जमूना वाहू लागतात. ते control करणे, तीची समजूत घालाणे हे अजून मोठं काम होऊन बसते. Happy

Duolingo app डाऊनलोड केलंय एकदम भारी आहे..खरच अ‍ॅडिक्शन झालंय..खूप दिवसापासून फ्रेंच शिकावं असं मनात होत आता शिकतेय..
आभारी आहे स्वप्ना_राज..

कारवी, मी कधी हार्वर्डचे कोर्सेस केलेले नाहीत. आणि फ्रिही केलेले नाहीत. त्यामुळे काहीच कल्पना नाहिये.

सोहा, मुलांसाठीच्या कोर्सेसबद्दल सध्या तरी काही कल्पना नाही. काही लिंक मिळाली तर पोस्ट करेन. तरी त्यांच्या वयाला अनुसरून कुकींगचे काही व्हिडिओज यूट्यूबवर असतील तर त्यांना दाखवा असं सुचवेन. सध्याच्या काळात बेसिक कुकिंग येणं सगळ्यांची गरज होउन बसली आहे ते बघतच असाल.

अमृताक्षर , सहीच. ये अ‍ॅडीक्शन अच्छा है Happy ऑल द बेस्ट

jui.k, क्राफ्ट आणि पेटिंगज् अपने लिये काला अक्षर भैंस बराबर है. Proud

अतरंगी, विनिता.झक्कास, पूर्वी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

जेम्स बॉन्ड, चित्रपट बघायला वेळच मिळत नाहिये हो. मिळाला की टाकतेच लेख Happy

गिरिप्रेमी संस्थेच्या फेसबूक पानावर दररोज एक ह्या प्रमाणे त्यांच्या मोहिमेवर आधारित केलेल्या चित्रफिती दाखवत आहेत.
https://www.facebook.com/groups/giripremi

आदिश्री,हर्पेन, चिन्मय_1, उदय धन्यवाद!

हर्पेन, लिंक्सबद्दल खास आभार! चिन्मय_1, नवी भाषा शिकण्यासाठी शुभेच्छा Happy