जेव्हा मूर्ख ट्रेकिंगला जातात ! - ३

Submitted by शक्तिमान on 17 April, 2020 - 02:40

बारी गावात पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे ७:०० वाजले.
गाडीखाली उतरताच मला एक वेगळीच फीलिंग आली. असा छान वाऱ्याचा अनुभव कधीच आलेला नव्हता. असे वारे बहुतेक सह्याद्रीतच अनुभवायला भेटते. आम्हाला माहित नव्हते कि ह्या पुढील प्रत्येक ट्रेकला आम्हाला असं वारे लागणार आहे.
खाली उतरताच पोरांची चंगळमंगळ सुरु झाली. पोटातले कावळेही काहीतरी ग्रहण करण्याची request करत होते.
डबा... किती पॉवरफुल शब्द असतोना हा.
ह्याच डब्यामुळे मुंबई पुणे ला असलेल्या पोरांना आईच्या जेवणाची चव काय हे कळते !!! ह्याच डब्यामुळे कित्त्येक जोडप्यांचे "मला हीच भाजी का दिली ?" ह्यावरून भांडण होते !!! ह्याच डब्यामुळे मुंबईतले डबेवाले फेमस झाले,त्यांचे टाईमिंगवर डबा पोहचवणे तेपण व्यवस्थित सॉर्ट करून!!!
माघे एकदा ted talks वर डबेवाल्याचं स्पीच ऐकून मी खूप प्रभावित झालेलो.आता बनायचे तर डबेवालाच असा विचारही मी माझ्या अस्थिर मनाशी केलेला .
बरं हे सगळं राहूद्या बाजूला ,मी भलतीकडेच वळण घ्यायला सुरवात केली.

तर सांगायचं तात्पर्य इतकेच कि डब्बा आणायचा आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही विसरलो. आईने मला उपरण्यात भाजी पोळी दिली होती जी मी घरीच ठेवुन आलो ज्याकारणाने आता घरी गेल्यावर आईची बोलणे खावा लागणार होते . हितेश तर हॉस्टेल मेंबर होता त्यामुळे त्याचा विषयच नव्हता आणि राहिला भाऊश्या. त्याच्याकडून अपेक्षा करणे हे मूर्खपणा ठरले असते.

भाडंण करण्यात तथ्य नव्हते. पोटापाण्याचा प्रश्न मिटवायचा होता. अजूनही आम्ही रोड वरच होतो. विचार करण्यासाठी आम्ही जवळच्या दुकानाच्या समोर ठेवलेल्या बाजेवर बसलो. आम्ही दुकानातून फरसाणचं भालं मोठं पॅकेट घेतले आणि सोबत काही biscuits आणि bonfire साठी काडीपेटी घेतली.

मोबाइलला range नव्हतीच त्यामुळे सगळे रस्त्याच्या खाली उतरले और चालायला लागले. पुढे एक गावकरी भेटला ,त्याला रस्ता विचारला असता जसं त्याने आपले तोंड उघडले तसा देशी मदिरेचा दुर्गंध भपकन भाऊश्याच्या नाकपुड्यांमध्ये घुसला. भाऊश्या तिथून विजेच्या गतीने बाजूला झाला. त्यामुळे आम्हालाही प्रकार समजला आणि आम्ही त्याला काहीही न बोलता पुढे चालू लागलो. पुढे एका मावशींना रास्ता विचारून आम्ही चालायला लागलो.

थोडंसं चालल्यावर समोर भलं मोठं पटांगण लागलं. जिथे एक हापसा होता आणि समोर एक मोठा कट्टा जिथं काही आमच्याच वयाची मुलं बसलेली होती . मला हापसा चालवायला लावून भाऊश्या त्याचा थोबाड धुवून घेऊ लागला. असं दृश्य कधीही नाही बघितलेला हितेश आमची हापश्यासोबतची विडिओ काढू लागला. तोंडाला फेसवॉश लावल्यामुळे भाऊश्या उगाच भुतासारखा दिसायला लागला होता. एकवेळेस भूत सुद्धा थोडेशे well cultured असतील पण भाऊश्या त्यांना बदनाम करत होता.
विडिओ चालू केल्यामुळे भाऊश्या भलताच मूड मध्ये आला होता. त्यात सागर त्याला वेग वेगळी dialogue म्हणायला देत होता. भाऊश्या अचानक shhhh .... फिर कोई है !!! असा म्हणायला लागला. ते कट्ट्यावरचे पोरंही त्यांचा टार्गटपणा सोडून आम्हाला बघायला लागले. असले ट्रेकर्स त्यांनी पहिल्यांदाच बघितले असावे. तितक्यात हितेशच्या मोबाइलला range आली. आम्ही आमचे फोन्स चेक केले तर आमच्याही फोनला range आलेली होती. प्रथम घरच्यांना दूरध्वनी केला जेणेकरून नंतर घरच्यांच्या शिव्या नाही खाव्या लागणार.

दूरध्वनी झाल्यावर त्या मुलांच्या घोळक्यातून २ मुले आम्हाला जेवणाची विचारपूस करू लागली.
त्यांच्यातला एक जण बोलला "तुम्ही रात्री जाणार आहे का डोंगरावर?"
मी -"हो"
मुलगा - "मग जेवणाची काही सोय केली आहे का ?".
मी - "नाही ,इथे कोठे होईल का व्यवस्था?"
मुलगा - "हो ,आमच्या घरी चला. आमची छोटीशी खानावळ आहे"
मी पुढे काही बोलणार तितक्यात भाऊश्या ने संवादात उडी घेतली.
भाऊश्या - "जेवायला काय काय आहे ?"
मुलगा - "फ्लॉवर , बटाट्याची भाजी , भाकर ,भात. १२० रुपयांमध्ये फुल जेवण."
भाऊश्या -"छ्या ,असा कुठं असतं का ?"
मुलगा - "म्हणजे ?"
भाऊश्या - "दुसरा काहीतरी मेनू सांगा राव"
मुलगा - "अहो दुसऱ्या मेनूसाठी तुम्ही शनिवार रविवार यायला पाहिजे होते ,आज इतकेच मिळेल. जमतंय तर बघा नाहीतर जातो मी."
असं म्हणत तो मुलगा गेला देखील.
एकतर जेवणाचे वांदे त्यात भाऊश्याच्या शहाणपणामुळे आमचे जेवण हुकले. आम्हाला वाटले पुढे गेल्यावर अजून काहीतरी भारी मिळेल पण आम्हाला माहित नव्हते कि सह्याद्री मध्ये कुठेही गेल्यावर हेच जेवण हमखास मिळते आणि आपल्याला ते खावच लागतं. आणि ते किती किती चवदार असतं हेही खूप नंतर कळलं.
असो ,आता आम्हाला चढाई सुरु करण्याशिवाय पर्याय नव्हता.

planning आधी केलेलीच होती. सगळ्यात पहिले कमान गाठायची.त्यानंतर १ तास चालत जाऊन ,मध्ये कुठेतरी bonfire पेटवून ३:०० पर्यंत तिथेच आराम करायचा आणि नंतर ट्रेक सुरु करायचा.

आता प्रॉब्लेम हा होता कि ह्या आधी आमच्यातले कोणीच कळसूबाईला आलेले नव्हते.
चालतांना उगाच भामट्यासारखे सगळे एकमेकांना बघत होते.
त्यामुळे शहाणपणा करून एक ६वी -७वी च्या मुलाला आम्ही मार्ग विचारला. तर तो बोलला कि मी तुमच्यासोबत येतो. त्याला पैसे विचारल्यावर तो ६०० बोलला. त्याला घेऊन जाण्याचा प्लॅन आम्ही तिथेच सोडला आणि "फक्त रस्ता सांग कमानीपर्यंत" असा बोलल्यावर त्या बिचार्याने आम्हाला रास्ता सांगितला.
आम्ही त्याने सांगितलेल्या वाटेवर चालू लागलो. मनात धाकधूक होतीच. excitement मुळे कदाचित.
पौर्णिमेच्या २ दिवस नंतर आल्यामुळे चंद्रप्रकाश भरपूर होता त्यात माझ्याकडे एक आणि भाऊश्याकडे एक अश्या दोन टॉर्च होत्या.
रात्रीचा वावरात पाणी सोडायला जी टॉर्च वापरतात ती भाऊश्याने घरून ढापून आणली होती.
कमान येईपर्यंत आम्हाला खरंच टेन्शन होते पण शेवटी आलो एकदाचे तिथे.
तिथं एका घराचा दिवा लुकलुकत होता." चला जेवण नाही तर निदान चहा घेऊ" ह्या आशेने पोरं त्या घराकडं पळत सुटले.
माऊंट एव्हरेस्टची summit climb केल्या इतका आनंद आम्हाला कळसूबाईच्या पायथ्याशीच झाला.बट इट वॉज जस्ट अ begining...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळसुबाई डोंगरावरच्या पठारावर एक छोटेसे देऊळ आहे आणि आसरा नाही असे समजल्यावर माझा उत्साह सरला आणि एवढे उंचावर जाऊन लगेच खाली यायचे या विचाराने अजून गेलो नाही. त्यापेक्षा रतनगड सरस.

छान. तीनही भाग एकदम वाचले. कधीतरी एकटेच ट्रेकिंगला जाणे ही माझी बकेट लिस्ट आहे. नाहीच शक्य झाले तर पोरीला सोबत नेणार. तुमचा पहिला अनुभव माहितीपुर्ण ठरेल. जेवढ्या तुम्ही जास्त ठेचा खाल्ल्या असतील त्या माझ्यासाठी चांगल्या...

पद्म Lol
पौर्णिमेला उगवलेली भूतं वाटेत भेटली असतील आणि त्यात ह्यांच्याकडे बोकलत भगतांचा नंबरसुद्धा नाहीये म्हणून मुक्कामी पोचल्याची वार्ता द्यायला अंमळ उशीर झाला असावा.

<<<<<<अरे हरवलात की काय, ट्रेक करता करता...<<<<<<माफी असावी,पुढचा भाग रात्री पर्यंत येऊन जाईल

ह्यांच्याकडे बोकलत भगतांचा नंबरसुद्धा नाहीये<<<<<<<<आज अमावस्या असल्यामुळे बोकलत साहेब busy आहेत ,त्यात किलवीश ने शहरामध्ये हाहाकार माजवलाय,त्याचाशी दोन हात करायला मी गेलो होतो. त्यामुळेच थोडा उशीर झालाय.