नो अपत्य

Submitted by अज्ञातवासी on 16 April, 2020 - 12:17

हा धागा विडंबन वगैरे म्हणून काढलेला नाही, तर खरंच मनातले विचार मांडावेत म्हणून काढलाय.
जेव्हा जेव्हा कुणी म्हणत ना, की आज मुलाची फी भरायचीय, आज त्याची स्कुल ट्रिप, आज सुट्टी टाकून स्कुलमध्ये जायचंय, तेव्हा तेव्हा मी विचार करतो, खरंच मूल असणं गरज आहे, की पूर्वापार आलेली परंपरा म्हणून पाळायची म्हणून पाळायची?
सध्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीचं पालकत्व बघतोय. रात्री अपरात्री लहान मुलगी उठली, की रात्रभर त्याचा डोळा लागत नाही. सारखी रडत असते. सकाळी त्याचे तारवटलेले डोळे बघून वाईट वाटत. त्याच्या बायकोच म्हणणं तर असं की खूप कमी वयात तिच्यावर हे पालकत्व लादलं गेलंय.
त्यानंतर एका काकांची कथा. मुलगा काहीही कामधंदा करत नाही. अट्टल दारुबाज आणि भामटेगिरीत मुरलेला. हा नसता तर बरं झालं असत, असं नेहमी ऐकू येतं.
याउलट माझी पुतणी, अशी धमाल करते ना, वेळ कसा जातो ते कळत नाही. मी चांगला मुलगा बनू शकेल की नाही माहिती नाही, पण माझे बाबा आणि काका यांनी नक्कीच चांगल्या मुलांची जबाबदारी निभावली.
लहानपणी त्याचं शाळेत एडमिशनचं टेन्शन, नंतर कॉलेजचं, नंतर जॉबच, मग लग्नाचं, मग सून जावई कशी असेल याचं. म्हणजे पालकत्व फक्त एक जबाबदारीच बनून राहते का?
असो, आम्ही दोघे भावंडे. लहानपणापासून एकत्र कुटुंबाची सवय होती, बरीच लहान बाळे असायची जवळ, पण कधी लळा लागला नाही.
मोठेपणी हळूहळू लोकसंख्या विस्फोट वगैरे गोष्टी समजत गेल्या, आणि कॉलेजही असं मिळालं, की येता जाता एक अनाथाश्रम दिसायचा. एकीकडे आमची पुढची पिढी यावी याचा अट्टाहास असणारे पालक, आणि दुसरीकडे त्याच पिढीला नसणारे पालक.
हळूहळू वैचारिक बैठक पक्की होत गेली, की आपल्याला मूल नकोच. कारण आपण ही जबाबदारी नाही सांभाळू शकत.
पण जर समजा कधी वाटलं, स्वतःच मूल असायला हवं तर?
तर सरळ अपत्याचे जे लाड पुरवायचे असतील, ते जर पैशात मोजता येत असतील तर तेवढी देणगी आश्रमाला देऊन टाकायची.
अजून लग्न व्हायचंय, करेन की नाही माहीत नाही. पण लग्न करताना एकच अट असेन. मला मूल नकोय.
आणि हो, फायनान्शियली प्लॅनिंग करतोय, एका अपत्यासाठी. मी दत्तक वगैरे घेणार नाही, पण एका अपत्याचा संपूर्ण खर्च उचलेन. राहणीपासून शिक्षणापर्यंत. शेवटी तेही माझंच अपत्य होईल, नाही का? भलेही माझं नाव लागणार नाही, आणि इच्छाही नाही, पण कमीत कमी एका अभागी जीवाचं आयुष्य मार्गी लागल्याचं समाधान तर मिळेन.

असो, ईथे कुणी असा निर्णय घेतला असेल तर प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

आणि हो, आता मी पुतणीबरोबरच खेळतोय हे टाइप करताना. कारण तिचे डायपर मला चेंज करावे लागत नाही. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडे दिवस स्वतःचाच धागा वाचनमात्र होतो. खरंच खूप मस्त वाटलं काही प्रतिसाद वाचून. मेन म्हणजे कुणी जजमेंटल झालं नाही.
@नौटंकी - थँक्स. आणि हो, ती जबरदस्त विचित्र आहे. आज सकाळीच तीन बाळे घेऊन आली होती. एक cute पिग, एक पोपट आणि एक लहान बाळ (खेळण्यातले!)
पिगचं नाव - वराहराज, पोपटाच नाव - कडकनाथ, आणि बाळाचं नाव - पांडुरंग. नावे म्हणता येत नाही, तरी पूर्ण नाव घेण्याचा अट्टाहास असतो.

खूप चांगला निर्णय.. i just wonder कि असं लग्ना नंतर वाटलं तर काय होईल... फसवणुकीच्या basis वर गुन्हा दाखल होऊ शकतो का

फसवणुकीच्या basis वर गुन्हा दाखल होऊ शकतो का
>>>>

लग्नाआधी निर्व्यसनी असलेल्याने लग्नानंतर दारू प्ययाअ सुरुवात केले तर त्या केसमध्ये जे तेच ईथेही लागू.
आधी असे काही लपवले तर ती फसवणूक.
नंतर घडलेला बदल हे दुर्दैव्य.

मूल होणार का, हवे /नको किंवा आहे पण मंदबुद्धी, अपंग होईल का , त्रास देईल का वगैरे हे सर्व त्रास, विवंचना या तुम्हाला आताच सतावू लागल्या आहेत. ( धागा खराच गंभीर आहे आणि काथ्याकूट नसेल तर).
शुभेच्छा.

srd...
तुम्ही माझा मुद्दा नीट समजून घ्याल का प्लिज??? म्हणजे तुमच्या कोट्यांवर पुनर्विचार करता येईल?
नसेल तरी इट्स ओके. चालुद्या!

मुल असावी की नसावी.
ह्याचे मूल्य मापन करायचे झाले तर
पाहिले ज्याला मुल नको असे वाटते त्याची कारण त्या व्यक्तींनी स्पष्ट करणे गरजेचं आहे.
कारण ही व्यक्ती नुसार बदलत जाणार.p

>>>मुद्दा नीट समजून घ्याल का प्लिज??? म्हणजे तुमच्या कोट्यांवर पुनर्विचार करता येईल?
नसेल तरी इट्स ओके. चालुद्या!
Submitted by अज्ञातवासी >>

मुद्दा समजला आहे आणि या विषयावरची ती कोटी नाही. कोटी करण्याची ही समस्या नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या विषयाने /गोष्टीने ती असल्याने/ नसल्याने चिंतीत होते तेव्हा त्यासंबंधी कारक ग्रह ( फार गुणगान गायला जाणारा गुरुच) बिघडलेला असतो. आणि दुसऱ्यांनी दिलेले सल्ले उपयोगी पडत नाहीत. जे अगोदर इतर आइडींनी मांडलेले आहेतच.

त्यामुळे शुभेच्छा म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे शुभ होवो असं थोडक्यात आटपलं.

बाकी "नै तर काय" ही प्रतिक्रिया अगोदरच्या प्रकाश घाटपांडे यांनी पुढील पिढी ( सर्वांचीच)काय म्हणेल यासाठी होती. ते त्यांनी क्षमापुर्वक मागे घेतला.
तर बऱ्याच कोट्या नाहीतच.

वैयक्तिक काही नाही, एक मत होते ते पुन्हा पुन्हा सांगून बेजार करणे हेतू नाहीच.

Pages