प्रश्न फक्त एवढाच आहे

Submitted by आकाश वाघचौडे on 16 April, 2020 - 11:35

प्रश्न फक्त एवढाच आहे...
आजच सगळे जगावं...
की उद्यासाठी थोडे ठेवावं...
आधी झोपेत स्वप्न बघावं...
की झोप उडवून ते पूर्ण करावं...

प्रश्न फक्त एवढाच आहे...
सुखाच्या मागे लागावं....
की मागे असण्यातच सुख मानावं....
आपलं दुःख सांगावं...
की दुसऱ्याचं दुःख ऐकावं...

प्रश्न फक्त एवढाच आहे...
मनाला वाटेल ते करावं...
की वाट्याला येईल त्यात मन रमवावं...
आयुष्याच्या वळणानुसार वळावं....
की आयुष्याला नवीन वळण द्यावं...

प्रश्न फक्त एवढाच आहे...
विश्वची माझे घर म्हणून जगावं...
की विश्वात माझे घर असावे म्हणून झटावं....
आत्मशांती साठी ध्यानस्थ व्हावं....
की आत्म संतोष मिळावा म्हणून धडपडावं..

प्रश्न फक्त एवढाच आहे...
दुसर्‍याला हसवण्यासाठी धडपडावं...
की स्वतःच दुःख दुसर्‍यापुढे उलगडावं...
दुसर्‍याच्या सुखात सुख मानावं...
की आपल्या सुखात सुख मानणारं शोधावं....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..!