बांद्रे येथील गर्दी conspiracy theory ,दोन्ही बाजू ,केंद्र आणि राज्य

Submitted by हस्तर on 14 April, 2020 - 13:35

बांद्रे येथील गर्दी conspiracy theory ,दोन्ही बाजू ,केंद्र आणि राज्य

राज्य सरकार
१) एवढी गर्दी जमते कशी? पोलीस तर नाक्या नाक्या वर असतात
२) abp माझा ने खोटी बातमी दिली तेव्हा कारवाईची अपेक्षा आहे
३) आदित्य ठाकरे ह्यांनीच आधी ट्विट करून सांगितले कि बाहेर राज्यातल्या लोकांना अन्न पुरवू आता म्हणत आहेत रेल्वे सुरु करा

केंद्र
१) सुरत मध्ये पण गर्दी जमली ,माबो वर एका ठिकाणी म्हटलेय जाळपोळ पण झाली ,का ?
२) रेल्वे प्रशासन मधल्या लोकांनी लाऊड स्पीकर वापरून गर्दी हाकलले का ?
३) अच्चनक सगळे भाजप नेते आज बाईट द्याल कसे ?

अनुत्तरित प्रश्न
१) दोन दिवस आधीच लॉक डाउन वाढणार असे सांगितले तेव्हा हे लोक का नाही आले
२) बांद्र्याहून गुजरात ला गाड्या जातात ते पण टर्मिनल आणि स्टेशन वेगळे ह्या लोकांना हे माहीत असायला हवे
३) फक्त बांद्रयाला मजूर लोक राहतात ? ते पण मुख्य मंत्री निवास जवळ आहे म्हणून ,अक्ख्या मुंबईत ?
ह्याचा अर्थ अफवा पसरवली आहे
abp ने पसरवली म्हणजे बाकी पण न्युज चॅनेल असू शकतात

सगळ्यात मुख्य सवाल
तिथे सगळे लोक होते एकाला पण हटकून मुलाखत अजून तरी घेतली नाही कि बाबा तू का आला

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद जिंदादील, आणि एव्हढे मोठे स्पष्टीकरण लिहिल्याबद्दल तुमचे कौतुक वाटते (मनापासून लिहितोय, उपहास नाही) .
पण मुळात त्यातील किती बातम्या खऱ्या आणि किती खोट्या याची काहीही माहिती नाही. काही "सूत्रांनी" तर त्या बातमीदारांना असेही सांगितले की 2००० च्यावर यात्रेकरू आहेत आणि फक्त गुजरात नाही तर इतरही अनेक राज्यांतील आहेत. पण ते असो,

आपापल्या घराकडे जाऊ पाहणारे मजूर व यात्रेकरूंच्या / विद्यार्थ्यांच्या संख्येत कितीतरी मोठी तफावत आहे, जी काही लोक ध्यानात घेत नाहीत. त्यांना ती गोष्ट शेंगदाणे बरणीत भरण्यासारखी वाटतेय. कारण ते सत्तेत कधीच नसतात. विहिरीच्या काठावर बसून आत गटांगळ्या खाणाऱ्या माणसावर टीका करून त्यांना पोहायला शिकवायचा अप्रोच या लोकांचा असतो. जो कोणालाही उपयोगाचा नसतो.

आताची यंत्रणा व मनुष्यबळ कोरोना चा सामना करण्यात गुंतलेले आहे. त्यात करोडो मजुरांच्या स्थलांतरामुळे निर्माण होणारे प्रश्न हाताळण्यासाठी मनुष्यबळ कुठून उपलब्ध होणार असा प्रश्न या लोकांच्या मनात येत नाही.

दुर्दैवाने असे लोक त्या मजुरांना सद्य साथरोगाच्या परिस्थितीत काय बरोबर आहे याचे प्रबोधन करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या राज्यात जाऊ ना देऊन किती मोठा अन्याय होत आहे हेच दाखवून देत असतात. तो विनय दुबे, जो स्वतः एक व्यावसायिक आहे, तो स्वतच्या कारमध्ये बसून मजुरांना चिथावणी देणारे भाषण देत होता ! त्यावरून मी काय म्हणतोय ते लक्षात येईल.

तुम्ही जे लिहीले आहे ते त्यांच्या डोक्यात शिरणार नाही. त्यामुळे पुढील वादावादिस शुभेच्छा...

माझा स्वतः चा अनुभव
4 दिवसांपूर्वी मला एक fwd आलं की कर्नाटका सरकारला / आरोग्यखात्याला कानडी नीट येणारे लोकं emergency medical कॉल attend करायला हवे आहेत (बहुतेक 104 नंबर साठी) कारण बहुतांश calls हे emergency आणि medical नसतात आणि हे ठरवण्यात डॉकटर चा वेळ जातो. त्यांना call filter करुन द्यायला स्थानिक भाषा नीट येणारे लोकं हवेत.
मी माझ्या मुलाच्या कन्नड tutor ला msg fwd केला. तो फ्रेशर आहे आणि विकेंडला कन्नड शिकवतो. तो बंगलोरलाच होता, त्याच्या गावी उडुपिला गेला नव्हता.मी त्याला कसं काय विचारलं कारण 15 मार्च च्या आसपास कधीतरी आमच्या इथे PG च्या मुलांना/मुलींना जागा रिकाम्या करायला सांगितल्या होत्या म्हणे आणि बरेच freshers गावी/घरी परत गेले होते. त्याने नुकताच sharing मध्ये फ्लॅट भाड्याने घेतला, त्यामुळे त्याला हे सगळे वेळेवर कळले नाही.(गावी गेलेल्या freshers चे वेगळे प्रॉब्लेम्स होणार आहेत/ already आहेत पण तो विषय नाही) आता तो आणि त्याचे flatmates वर्क फ्रॉम होम करतात आणि एकत्र जमेल तसं जेवणखाण करून खातात. बरोबर अजून कोणी नाही, फक्त फोनवर घरी बोलता येते म्हणून त्याला एकटेपणा वाटतो. त्याने मला विचारले की तुम्ही नाही का गेले ? मी विचारलं - कुठे? तो म्हणाला- hometown ला / परेन्ट्स कडे? मी म्हणाले - where will I go? This is my home.

आताची यंत्रणा व मनुष्यबळ कोरोना चा सामना करण्यात गुंतलेले आहे. त्यात करोडो मजुरांच्या स्थलांतरामुळे निर्माण होणारे प्रश्न हाताळण्यासाठी मनुष्यबळ कुठून उपलब्ध होणार असा प्रश्न या लोकांच्या मनात येत नाही.

हो क़ाय ? मग 15 लाख सुशिक्षित परदेशी मजूर विमानातून कशाला आणले ? शिवाय , पाकिस्तानचेही चीन मधून दयाबुद्धिने अणणार होते ( आणले नाहीत ) , करोना चे सोर्स हेच लोक होते

त्यांना ती गोष्ट शेंगदाणे बरणीत भरण्यासारखी वाटतेय. कारण ते सत्तेत कधीच नसतात.

60 साल भाजपे हेच करत होते आणि आता फड़नवीसही हेच करत आहेत ना ?

1885 ते 1947 मध्येहि हे बरणीच्या आसपास नव्हते

भाजप सरकारच्या काळात , दर एक महिन्याला एक ना एक मोठा मोर्चा असायचा. कधी शेतकरी, कधी दूध उत्पादक, कधी मराठा मोर्चा तर कधी आणखी कुठलेतरी आंदोलन.

त्या सर्व प्रकारची एव्हढी सवय झालेली होती की त्यामागच्या कन्स्पिरसीवर (असलीच तर) एक धागा काढता येईल हेही कुणाला सुचलं नसेल !

त्यावेळी संजय राऊतही तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांवर मनसोक्त टीका करत होते.

आताचे सरकार आल्यावर सगळे काही शांत शांत झालं. सगळीकडे सुबत्ता आली व सगळ्यांना त्यांच्या उत्पादनाला मनासारखे भाव मिळू लागले ! यावरही कोणी धागा काढला नव्हता !

पण आता ही पहिलीच घटना घडल्यानंतर सरकार हवालदिल झाल्यासारखे वाटते आहे. संजय राऊत त्या जमावामागे जे आहेत त्यांना शोधून काढू अशी प्रतिज्ञा करत आहेत. त्यांना यश मिळो ही मनापासून शुभेच्छा...

अशा वेळी मागील सरकारात अतिशय स्थितप्रज्ञतेने फडणवीसांनी प्रत्येक मोर्चाच्या / आंदोलनाच्या वेळची परिस्थती हाताळली, कुठल्याही प्रतिज्ञा, चिडचिड वगैरे केली नाही हे प्रकर्षाने जाणवते व त्याबद्द्ल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडच असेल.

दर रोज १०० फ्लाईटस चालवल्या A380 च्या तरी एक महीना लागेल १५००००० लोकांना परत आणण्यासाठी !!

१५ लाख रक्तात भिनलेली संख्या आहे ?

ते वर बातमित छापलेत त्याना विचारा

त्यात more than 15 lakhs लिहिले आहे,

मोदींचे 15 लाख जुने झाले , आता 5 ट्रिलियन झालेत Proud

भरत, नियम मोडला गेला आहे हे स्पष्ट आहे आणि याची जबाबदारी त्या प्रदेशातील राज्यसरकारची आहे. पण यात एक गोष्ट नजरेआड करून चालणार नाही ती म्हणजे लाॅकडाऊनच्या काळात प्रवास करू नका असे वारंवार केंद्र सरकार व राज्यसरकारे नागरिकांना सांगत आहेत कारण स्थलांतरीत मजुरांचा असलेला महाप्रचंड आकडा. जर असे केले गेले नाही तर प्रचंड गोंधळ माजून करोनाचा प्रादुर्भाव रोखणे कठीण होईल.
परराज्यातील सर्वांनाच या वैश्विक आपत्तीच्या काळात आपल्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. वरील बातमीमधून हे स्पष्ट होतेय की गुजरात सरकारने त्यांच्या नागरिकांना ज्यांची संख्या, ठिकाण त्यांना माहित होते त्यांनाच आणण्यासाठी प्रयत्न केले. गुजरातचे सुध्दा अनेक नागरीक विखुरलेल्या स्वरुपात अनेक प्रदेशात अडकलेले असतील पण त्या सर्वांना ते आणू शकत नाही हे त्यांना माहित आहे. बातमीतच म्हटले आहे की उत्तराखंड सरकारने मात्र त्या बसेसमधून त्यांच्या नागरिकांना परत आणण्यासाठी काहीही आधी ठरवले नव्हते किंवा त्यांनी तसा प्रयत्न सुध्दा केला नव्हता. यात गुजरात सरकारचा दोष नाही.
बाकी बातमीतील उत्तराखंडच्या नागरिकांवर ओढवलेला प्रसंग दुर्दैवी आहे.

नियम मोडला गेला आहे हे स्पष्ट आहे >>

लॉक डाऊन दरम्यान राज्य सरकार अशा प्रकारे निर्णय घेऊ शकतात, परंतु त्यासाठी ठोस कारण असावे लागते. खरोखर emergency असणारे लोक प्रशासनाकडून परवानगी घेऊन प्रवास करत आहेत असे मी काही बातम्यांमध्ये वाचले आहे.

बाकी असे यात्रेकरूंना इतरत्र नेण्याचे काही प्रकरण झालेच असेल तर, तो सबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय असेल व त्यामागील कारणे इच्छुकांना RTI मार्फत उत्तराखंड सरकारला व केंद्र सरकारला नक्कीच विचारता येतील.

विनय दुबे ला एक दिवसही जेलच्या आत ठेवू शकल नाही महा विकास आघाडी सरकार !! तो बाहेर आल्या आल्या व्हिडीयो बनवुन खिजवत आहे !
https://youtu.be/2a9WCvwpOEs

https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-ne...>>>>
लाॅकडाऊन दरम्यान प्रवास करणे का धोकादायक आहे याचे हे एक उदाहरण. याबातमीमधील व्यक्ती कोणत्याही सरकारला पूर्वकल्पना न देता प्रवास करत होते. जर त्यांना पकडले नसते तर इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर करोनाचा फैलाव करण्यास कारणीभुत ठरले असते.
असाच एक प्रकार बहुतेक परभणीत आढळला. मुंबईतील एक व्यक्ती लपून प्रवास करून गावी पोहचला. घरातल्यांनी सुध्दा ही बाब लपवून ठेवली. आता ती व्यक्ती करोना पॉझिटीव्ह आढळली आहे. त्यामुळे त्याच्यावर व त्याच्या घरातल्यांवर आता गुन्हा दाखल झाला आहे. पण त्याच्यामुळे जो करोनाचा फैलाव होऊ शकतो त्याचे परिणाम त्याच्या गावातील लोकांना भोगावे लागणार आहेत.

नितीशकुमार आणखीनच थोर आहेत. कोटामधील वि द्यार्थ्यांसाठी बसेस पाठवायच्या उ प्र सरकारच्या निर्णयावर त्यांनी भेदभावजनक आणि नियम मोडणा रे कृत्य म्हणून टीका के ली. पण आप ल्याच एका आमदाराला त्याच्या मुलाला कोटाहून आणायला जाण्यासाठी परवानगी दिली.
https://twitter.com/ShivamShankarS/status/1252116832661594113
शेवटी some are more equal हेच खरं.

विनय दुबे ला एक दिवसही जेलच्या आत ठेवू शकल नाही महा विकास आघाडी सरकार !! तो बाहेर आल्या आल्या व्हिडीयो बनवुन खिजवत आहे !
https://youtu.be/2a9WCvwpOEs

Submitted by विवेक नाईक on 18 April, 2020 - 16:21
Ha vinay dubey ranga bills कोणाला म्हणत आहे.
अंध भक्त कोणाला म्हणत आहे.
उध्दव ला नक्कीच म्हणत नसणार.
नाही तर आतापर्यंत राज ठाकरे नी नक्की चोपला असता.
भाषणाच्या शेवटी jai hind jai maharashtra .
Hi पद्धत bjp chi nahi

विनय दुबे चा कुठला तरी जुना व्हिडिओ आहे.
पहिला कधी जैल मध्ये गेला होता तेव्हाच.
हा कानेहया चा जोडीदार आहे.

तो फुरोगामीं कंपू मधला आहे हे त्याच्या याच धाग्याच्या प्रतिसादांत टाकलेल्या एका व्हिडिओ लिंकवरून स्पष्ट झालं. त्यात त्याने कल्याण मध्ये दिलेल्या CAA विरोधी भाषणाची रेकॉर्डिंग आहे. त्यात तो अभिमानाने सांगताना दिसतो की ते त्याच शाहीन बाग टाईप एकशे पाचव भाषण आहे.

विनय दुबे हा एक संधीसाधू माणूस आहे. निवडणुकीत निवडून येणाऱ्यातला नाही. पाडापाडी करण्यासाठी, दुसऱ्याची मते खाण्यासाठी अशी माणसे प्रत्येक पक्षाला लागतात.

ही अशी कुत्री पाळणार वेगळाच असतो.
त्याचे कधी नाव येत नाही
हा पण कोणाचा तरी पाळीव कुत्र असणार.
महाराष्ट्रात पण अशा भुंकणाऱ्या चित्पुट अनेक संघटना आहेत पण त्यांचे खरे मालक कोण आहेत ते माहीत पडत नाही

How cunning.
वांद्र्याच्या गर्दीचा संबंध मुस्लिमांशी जोडायचे उद्योग अजूनही थांबलेले नाहीत.

नाही हो भरत. मला खरंच कळेना कुठे द्यावी ही लिंक. योग्य धागा सुचवा की ही लिंक इथून काढून टाकते आणि तिथे घालते.
इतकी कावीळ नका होऊ देऊ की सगळंच पिवळं दिसत राहील.

Pages