धर्मो रक्षति रक्षितः

Submitted by maitreyee on 9 April, 2020 - 12:58

परवा टिव्ही वर स्पेशल ऑप्स ही सीरीज बघताना रॉ चे ब्रीदवाक्य दिसले
"धर्मो रक्षतो रक्षितः"
अर्थाचा नीट विचार केलेला नव्हता कधी पण आता केला. आणि डोक्याला किडा लागला.
प्रचलित अर्थ साधारण पणे - धर्माची रक्षा करणार्याचे रक्षण धर्म करतो असा काहीसा सांगितला जातो पण शब्दशः पाहिले तर तो अर्थ चुकीचा वाटतो.
धर्मो रक्षति - हे सरळ आहे , पण धर्मो रक्षति रक्षकः असे नसून ते "रक्षितः" असे आहे. रक्षित = ज्याचे रक्षण केले गेलेले आहे असा होतो. ज्याने त्या ओळीचा अर्थ बदलतो! मग मी तो पूर्ण श्लोक शोधला तो असा :
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः
तस्मात् धर्मो न हन्तभ्यो मा नो धर्मो हतोवधित

भावार्थ आणि शब्द्शः अर्थ दोन्हीवर चर्चा करायला/ समजून घ्यायला आवडेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

यावर टीपापा मधे झालेली चर्चा :
धर्म न पाळणार्‍याचा नाश त्यामुळेच होतो आणि धर्म पाळणार्‍याचं रक्षण धर्मच करतो, म्हणून प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं.
इथे धर्म म्हणजे रिलिजन हा अर्थ नसावा, तर आपापली निहित कर्तव्यं या अर्थी.
जसं नलदमयंतीच्या कथेत नलाने एक छोटीशी बाब पाळली नाही (मूत्रविसर्जनानंतर हातपाय धुतले नाहीत!) म्हणून त्याच्या शरीरात कली शिरला. खरंतर हा पुण्यश्लोक राजा. कली बहुधा टपून बसला असेल अशा एखाद्या चुकीसाठी. मग त्यानंतर जे झालं त्याचा दोष कलीला देता येणार नाही. नलाचा प्रॉब्लेम न पाळलेल्या धर्मामुळे झाला.
(सॉरी, सध्या हात धुण्याचा विषय सारखा डोक्यात असतो त्यामुळे पटकन हेच उदाहरण आठवलं!)
Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2020 - 10:02

धर्मो - रक्षति - म्हणजे रक्षा करतो - पण रक्षितः चा अर्थ "पालन करणारा /रक्षण करणारा" असा होत नाही ना, म्हणूनच हा प्रश्न. रक्षित= प्रोटेक्टेड
म्हणजे मराठीत अर्थ "प्रोटेक्टेड" चे प्रोटेक्शन धर्म करतो असा होतोय.
Submitted by maitreyee on 9 April, 2020 - 10:07

फ्रूट ऑफ अ पॉयझनस ट्री सारखं झालं का हे? की अधर्माने काही मिळालं तरी ते (कोर्टात Wink ) टिकत नाही.
Submitted by अमितव on 9 April, 2020 - 10:08

>>> रक्षितः चा अर्थ "पालन करणारा /रक्षण करणारा" असा होत नाही ना
'राखणारा' असं वाचून बघ.
अगदी रक्षण असा शब्दशः अर्थ घेतला तरी उदा. 'लव्ह दाय नेबर' हा 'धर्म' सगळ्या कम्यूनिटीचं रक्षण करेलच ना?

आता हे थोडंसं टॅन्जन्ट वाटेल, पण बेअर विथ मी...
आपल्याकडे जी षड्रिपूंची कल्पना आहे, (काम, क्रोध, दंभ, मद, मत्सर आणि अहंकार?) - त्यांना 'रिपू' म्हणजे शत्रू का म्हटलं आहे? कारण दे एन्ड अप हर्टिंग द व्हेरी पर्सन हू नर्चर्स देम द मोस्ट! त्याचविरुद्ध उदा. दया, क्षमा, शांती, कृतज्ञता इ. गुण (जे सगळ्याच रिलिजन्सच्या मुळाशी असतात) ते राखणार्‍यासाठीच सर्वात उपकारक असतात ना?
ईव्हन मॉडर्न सायकॉलॉजी टॉक्स अबाउट प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड आणि फर्गिव्हनेस आणि काल्मने?/मेडिटेशन?
जो समाज अ‍ॅज अ होल हे गुण सोडून देईल (या शांतीप्रियतेच्या धर्माचं विनाशापासून रक्षण करणार नाही), तो डूम्ड असेल! (आठवा: अमेरिकेतली वाढती व्हाइट सुप्रीमसी)
तळटीप बहुधा द्यायला नको, पण हे सगळे माझे वैयक्तिक विचार आणि मला लागलेले अर्थ आहेत. बट आय विल कीप लुकिंग.
हा किडा सोडल्याबद्दल धन्यवाद. Happy
Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2020 - 11:34

स्वाती - >>> रक्षितः चा अर्थ "पालन करणारा /रक्षण करणारा" असा होत नाही ना
'राखणारा' असं वाचून बघ. >> तिथेच प्रॉब्लेम आहे ना, "राखणारा" म्हणजे कर्ता झाला. रक्षक असा शब्द असता तर तो बरोबर असता. पण रक्षित असा शब्द आहे. रक्षित चा अर्थ राखला गेलेला, रक्षित - असा होतो. त्याने त्या ओळीचा अर्थ नक्की बदलतो.
धर्मो रक्षति रक्षकः
धर्मो रक्षति रक्षितः
फरक आहे ना?
Submitted by maitreyee on 9 April, 2020 - 12:11

माझ्यामते तरी तुमची अन्वय करताना गल्लत होत आहे.

पहिल्या ओळीचा अन्वय - (यदि) हतः धर्म: एव हन्ति, (यदि) रक्षितः धर्मः रक्षति |

जर धर्माचा नाश केला तर धर्मही नाश करतो, जर धर्माचे रक्षण केले तर धर्म रक्षण करतो.

इथे कर्ता व कर्म दोन्ही धर्मच आहे आणि ज्याने नाश केला किंवा ज्याने रक्षण केले हा कर्ता सूचित केला आहे पण अव्यक्त आहे.

"धर्म एव हतो हन्ति" आणि "यदि हतो धर्म हन्ति" हे एकच कसे? अर्थ बदलणारच मग.
बरं दुसर्‍या ओळीचे काय मग?

पायस, सहमत. जर हत: आणि रक्षित: ही कर्मे असती तर या शब्दांच्या विभक्ती बदलल्या असत्या. हतं रक्षति, रक्षितं रक्षति अशी रूपे झाली असती. पण ह्या श्लोकात हत आणि रक्षित ही ' धर्म" ची विशेषणे ( कर्मणि भूतकालवाचक) आहेत. ती धर्म ह्या कर्त्याप्रमाणेच चालणार. जर धर्म रसातळाला गेला तर त्यामुळे आपला नाश होतो आणि धर्म राखला तर आपलेही रक्षण होते असा साध्या भाषेत अर्थ.

माझी एक गफलत आत्ता लक्षात आली. Happy ती म्हणजे विभक्ती प्रत्यय. रक्षितः म्हटले आहे रक्षितांचे (रक्षिताम् / रक्षितस्य वगैरे नही) त्यामुळे हीरा तुम्ही म्हणताय ते (हत आणि रक्षित ही ' धर्म" ची विशेषणे ( कर्मणि भूतकालवाचक)असावीत ) हे पटतेय. तरी शब्दांच्या ऑर्डर मुळे पहिल्या ओळीचा पहिला भाग जरा कन्फ्युजिंग आहे Happy

हीरा, सहमत.
"धर्म एव हतो हन्ति" आणि "यदि हतो धर्म हन्ति" हे एकच कसे? अर्थ बदलणारच मग. >> म्हणून तर मी म्हणालो की तुम्ही चुकीचा अन्वय केला आहे. संस्कृतच्या वर्गात सर्वप्रथम सुभाषिताचा अन्वय करायला याच कारणाने सांगितले जाते जेणेकरून अर्थ लावायला सोपे जावे.

बरं दुसर्‍या ओळीचे काय मग? >> एकतर तुम्ही दिलेली दुसरी ओळ चुकीची आहे.

तस्मात् धर्मो न हन्तभ्यो मा नो धर्मो हतोवधित >> यातल्या हन्तभ्य ला काही अर्थ नाही.

ही ओळ तस्मात् धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोवधित अशी हवी.

अन्वय - तस्मात्, धर्मः न हन्तव्यः | मा हत: धर्मः नः अवधीत् |

तरी (तस्मात्) धर्माचा नाश करू (हन्तव्य, तव्यत् प्रत्यय दिलेली क्रिया केली पाहिजे अशा अर्थाचा प्रत्यय) नये (नकारार्थी न). नाहीतर (मा) नाश पावलेला (हतः) धर्म आपला (नः - अहम् चे द्वितीया बहुवचनी रुप. कर्मार्थे द्वितीया) नाश करेल (अवधीत्).

तुम्हा लोकांचं व्याकरण बरंच पक्कं आहे. मी तर तसं शाळेतही संस्कृत शिकले नाही. त्यामुळे तिथे म्हटलं तेच डोक्याला शॉट नको म्हणून इथेही लिहिते.

इथे धर्म म्हणजे "ये तो मेरा धरम है, प्राजी" मधला धरम Happy

नवी माहिती कळली. धन्य्वाद Happy