भेट

Submitted by किल्ली on 3 April, 2020 - 11:33

आठव
ते दिवस
जेव्हा तू आणि मी
फक्त दोघेच

असंच
उगाच
नेहमीच
तिन्हीसांजेला भेटायचो

तेज गेलेले
थकलेले
कोमेजलेले
चेहरे असायचे

भावना
इच्छा
आकांक्षा
फक्त एकच

भूक...

-------++++--------
#random
#killicorner
#गूढार्थ
---------------------
© *पल्लवी कुलकर्णी/किल्ली*
---------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कविता.
का कोण जाणे पण अचानक "परिंदा" सिनेमातला तो प्रसंग आठवला ज्यात लहानपणची माधुरी कबुतरांना खायला घालण्यासाठी दाणे देते आणि अनिल कपूर ते स्वतः:च खातो कारण त्याला खूप भूक लागलेली असते.

धन्यवाद मंडळी Happy

अज्ञातवासी
हे आकडे कशासाठी टाकलेत म्हणायचे Proud

८ एप्रिल २०२० रोजी एका महान व्यक्तीने दुपारी ४ वाजून ४४ मिनिटांनी एक भविष्यवाणी केली होती.
त्या भविष्यवाणीला आपला हातभार लागावा म्हणून....
(आता भरपूर डू आयडी घेऊन ठेवले असते, तर तीस पर्यंत पोहोचण्यासाठी छान, सुरेख वगैरे प्रतिसाद दिले असते. पण एकच आयडी असल्याने आकडेच मोजावे लागणार Proud

आम्ही एका बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या मैत्रिणी, आधी मैत्री मग शेजार असं काहीसं..
तिचा नवरा परदेशात म्हणून घरी एकटी.. तीही तिकडे जाण्याच्या वाटेवर, procedures मध्ये अडकलेली..
माझा नवरा त्यावेळी night shift ला असायचा त्यामुळे संध्याकाळी ofc नंतर आम्हीच असायचो एकमेकींना सोबत...
तिच्या घरी तर कधी माझ्या घरी dinner करायचो..
तिने मला बऱ्याच वेळा tasty dishes खाऊ घातल्या आहेत, तिच्या आठवणीत ही कविता झाली, तिच्या recipee ने धिरडे बनवताना.
वाचताना funny वाटू शकेल पण ते दिवस तसेच होते, संध्याकाळी दमून भागून घरी यायचो, भुकेले कोमेजलेले चेहरे घेऊन, जेवण बनवण्याचं त्राण नसताना आपुलकीनं कोणी असं खाऊ घातलं न की खूप बरं वाटतं Happy
Miss you A M B
(ती आता london मध्ये आहे, आणि तिकडच्या परिस्थिती मुळे तिची काळजी वाटत आहे)

Pages