भेट

Submitted by किल्ली on 3 April, 2020 - 11:33

आठव
ते दिवस
जेव्हा तू आणि मी
फक्त दोघेच

असंच
उगाच
नेहमीच
तिन्हीसांजेला भेटायचो

तेज गेलेले
थकलेले
कोमेजलेले
चेहरे असायचे

भावना
इच्छा
आकांक्षा
फक्त एकच

भूक...

-------++++--------
#random
#killicorner
#गूढार्थ
---------------------
© *पल्लवी कुलकर्णी/किल्ली*
---------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशक Lol

छान!!!

धन्यवाद सगळ्यांचे Happy Happy
अजिंक्यराव पाटील, लिहा की बिनधास्त
असंही मी काही कवयित्री नाहीये, काहीतरी खरडते कधीतरी

इथे 30 प्रतिसाद झाले तर मी कवितेची खरी खुरी घटना सांगेन Biggrin
फेसपाम

छान कविता....

एखाद्या किल्लीप्रमाणे...... उभी Happy

इथे जर 30 प्रतिसाद झाले तर मी खरी खुरी कवितेची घटना सांगेन >>> किल्लीताई, डायरेक्ट कथाच टाकायची होती कि ग 30 काय 31 प्रतिसाद आले असते. Wink Lol

माझी एक ऑफिस मैत्रीण होती, तिने सांगितलेलं ते इथे लिहितोय. मैत्रिणीचे नाव अ आणि तिच्या प्रियकराचे नाव ब.. ही अ भारताच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर masters करायला गेली होती, तिथं तिचं प्रेम जमलं ते तिच्या मुळगावाच्या जवळच राहणाऱ्या एका मुलासोबत. मुलगा गरीब होता, मुलीला घरून जे पैसे यायचे ते अगदीच कमी असायचे. त्यातूनही मुलगी त्या मुलाच्या शिक्षणाला हातभार लावत होती. तर अश्याप्रकारे एकूणच हलाखीच्या परिस्थितीत दोघे होते, पण सोबत होते. महिन्यातले शेवटचे आठवडे तर एकवेळ जेवण करून ढकलत असत. अश्यावेळी संध्याकाळी दमून भागून आल्यावर एजमेकांच्या सहवासात ते हरवून जात, जेणेकरून भुकेची जाणीव होऊ नये. कविता अगदी त्या प्रसंगाला साजेशी वाटली, म्हणून लिहिले.

आहे की suitable घटना
धन्यवाद पाटील Happy
(पूर्ण id लिहायचा कंटाळा आला )

25

26

27

28

29

30

Pages