माझा शिकाशिकवा हा विणकाम शिकण्याचा ब्लॉग आता सर्वांसाठी खुला

Submitted by अवल on 2 April, 2020 - 11:35

नमस्कार
आज मी माझा शिकाशिकवा हा ब्लॉग सर्वांसाठी खुला करते आहे. गेली सात वर्षे हा ब्लॉग सशुल्क होता. जगभरातील अनेक जणींनी याचा लाभही घेतला. अजूनही घेत आहेत.

आजच्या परिस्थितीत मला असा वाटल की आपणही काही करावं,. या द्रूष्टीने आज हा ब्लॉग मी ओपन टू ऑल करते आहे. आज पासून कोणीही या ब्लोगवरती जाऊन विणकाम शिकू शकेल. आशा आहे हा उपक्रम काहींना विरंगुळा देईल, सद्यस्थितीतील ताणतणावांना सामोरे जाताना हा छंद तुम्हाला मदतीचा ठरेल. शुभेच्छा !
https://shikashikava.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अवल,
उत्तम उपक्रम! तुझ्या मनाचा मोठेपणा सगळ्यांनीच अनुकरण करावा असा आहे. खूप खूप धन्यवाद! _/\_

__/\__
विणकामात गम्य नाही ना कोणती कला अंगी आहे पण आपला हेतू फार चांगला आहे त्याची ही पोच Happy

अवल, खूप चांगला निर्णय. तू अतिशय उत्कृष्ट शिक्षिका आहेस त्यामुळे ब्लॉगचा अनेक जणींना फायदा होईल हे निश्चितच!!

_/\_

धन्यवाद, माझ्यापासून सुरुवात करते शिकायला, आता सुरु केले तर नातवंडांना एखाद-दुसरे स्वेटर तयार होईल Lol .
हो तितकीच कला आणि चिकाटी आहे.
शेअर करते, खूप उपयोग होईल बर्याच जणांना Happy .

खूप छान निर्णय अवलं. तू जेव्हा ब्लॉग ओपन केलास तेव्हा मी मेम्बरशिप घेतली होती पण ऑफिस च्या धावपळीत वेळ न्हवता मिळालेला.
नंतर दहिसर ला तू आमच्यासाठी घेतलेले वर्कशॉप सुद्धा अटेंड केले होते. तू खरंच उत्कृष्ट शिक्षिका आहेस .
सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यामुळे जमेल असे वाटत नाही . पण तुझ्याकडून नक्कीच शिकायचे आहे.
वर आदिश्री ने म्हटल्याप्रमाणे निदान नातवंडांसाठी तरी काही करता येईल. Happy

छान

अवल,
उत्तम उपक्रम! तुझ्या मनाचा मोठेपणा सगळ्यांनीच अनुकरण करावा असा आहे. खूप खूप धन्यवाद! _/\_>>>+१

यप बदललाय ॲक्सेस
जरा विचित्र अनुभव आला।
ज्यांना ॲक्सेस हवाय मला इ मेल करा
arati.aval@gmail.com मग तुम्हाला फ्रि मधे ब्लॉगवर घेईन