शशक- माकडांपासून सुटका!!

Submitted by Cuty on 1 April, 2020 - 06:52

मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती.
एकदा काॅलेजला जात असताना गर्दीत माझी ओढणी कुणीतरी मागून खस्सकन ओढली. बघते तो एक माकड पटकन पळून गेले. माझ्या मैत्रिणीही खूप घाबरल्या. एकीने सांगितले, अशीच एकदा माकडाने तिची वेणी ओढली होती. आम्ही वर्गात बसलो असताना व-हांड्यात माकडे दात विचकत सदैव फिरायची. शिक्षकही वैतागले. शेवटी घरच्यांनी तोडगा काढला!
एक दिवस गावाहून मामा, एक बर्यापैकी दिसणारे अन असणारे माकड घेऊन आला. घरच्यांनी त्याच्याबरोबर माझे लग्न लावून पाठवून दिले. आता दहा वर्षे झाली, आमच्या घराजवळ माकडे अजिबात फिरकत नाहीत !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माकडांना घाबरवण्यासाठी आम्ही ट्रेकिंगला छत्री घेऊन जातो असं लिहिणार होतो पण दुसरीच गोष्ट निघाली. छत्री फोल्डिंगची असते ती स्याकमध्ये ठेवता येते.
असो.
हसवलंत.

धन्यवाद मी माझा, आनंद, अज्ञानी, पाथफाईंडर,सामो.
@ पियू- अहो ही सर्व माकडे बिनशेपटीची आहेत!
धन्यवाद srd.

Lol
सहीये.. खूप आवडली

@ पियू,
पोरगी कॉलेजात जाऊ लागली, म्हणजे वयात आली की तिच्या भोवताली माकडं म्हणजे टग्या पोरांची रेलचेल अचानक वाढते. त्रास वाढतो. मग आईबाप एखादा परगावाचा माकड पकडून आणतात ज्याने त्या गावात केलेल्या माकडचाळ्यांचा ईथे पत्ता नसतो. आणि त्याच्याशी पोरीचे लग्न लावतात.
एकदा लायसन गळ्यात पडले की मग हा माकडांचा त्रास आप्सूक सुटतो Happy

माणसाचा पुर्वज माकड होता. अजुनही त्याची चिन्हे दिसतात. त्यामुळे अन्वयार्थ लावणे सोपे होते. काय बरोबर ना ऋन्म्या?
जावे त्याच्या वंशा Rofl