मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती.
एकदा काॅलेजला जात असताना गर्दीत माझी ओढणी कुणीतरी मागून खस्सकन ओढली. बघते तो एक माकड पटकन पळून गेले. माझ्या मैत्रिणीही खूप घाबरल्या. एकीने सांगितले, अशीच एकदा माकडाने तिची वेणी ओढली होती. आम्ही वर्गात बसलो असताना व-हांड्यात माकडे दात विचकत सदैव फिरायची. शिक्षकही वैतागले. शेवटी घरच्यांनी तोडगा काढला!
एक दिवस गावाहून मामा, एक बर्यापैकी दिसणारे अन असणारे माकड घेऊन आला. घरच्यांनी त्याच्याबरोबर माझे लग्न लावून पाठवून दिले. आता दहा वर्षे झाली, आमच्या घराजवळ माकडे अजिबात फिरकत नाहीत !!
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
(No subject)
कळलं नाही. इतर माकडं लग्नाला
कळलं नाही. इतर माकडं लग्नाला घाबरली का?
(No subject)
(No subject)
छान आहे भागाबाईची गोष्ट.
छान आहे भागाबाईची गोष्ट.
हाहाहा पण नवरदेव अल्फा मेल
हाहाहा पण नवरदेव अल्फा मेल हवा. नाहीतर पुन्हा तेच
माकडांना घाबरवण्यासाठी आम्ही
माकडांना घाबरवण्यासाठी आम्ही ट्रेकिंगला छत्री घेऊन जातो असं लिहिणार होतो पण दुसरीच गोष्ट निघाली. छत्री फोल्डिंगची असते ती स्याकमध्ये ठेवता येते.
असो.
हसवलंत.
धन्यवाद मी माझा, आनंद,
धन्यवाद मी माझा, आनंद, अज्ञानी, पाथफाईंडर,सामो.
@ पियू- अहो ही सर्व माकडे बिनशेपटीची आहेत!
धन्यवाद srd.
(No subject)
सहीये.. खूप आवडली
सहीये.. खूप आवडली
@ पियू,
पोरगी कॉलेजात जाऊ लागली, म्हणजे वयात आली की तिच्या भोवताली माकडं म्हणजे टग्या पोरांची रेलचेल अचानक वाढते. त्रास वाढतो. मग आईबाप एखादा परगावाचा माकड पकडून आणतात ज्याने त्या गावात केलेल्या माकडचाळ्यांचा ईथे पत्ता नसतो. आणि त्याच्याशी पोरीचे लग्न लावतात.
एकदा लायसन गळ्यात पडले की मग हा माकडांचा त्रास आप्सूक सुटतो
@ऋन्मेष, छान अन्वयार्थ लावलात
@ऋन्मेष, छान अन्वयार्थ लावलात. एकदम परफेक्ट.
माणसाचा पुर्वज माकड होता.
माणसाचा पुर्वज माकड होता. अजुनही त्याची चिन्हे दिसतात. त्यामुळे अन्वयार्थ लावणे सोपे होते. काय बरोबर ना ऋन्म्या?
जावे त्याच्या वंशा
आता वेगवेगळे मास्क लावून लोक
आता वेगवेगळे मास्क लावून लोक फिरत आहेत. काही मास्क लावल्यावर माकडासारखे ( हुप्प्या) तोंड दिसते.
(No subject)
धन्यवाद, मानवजी, ऋन्मेष,
धन्यवाद, मानवजी, ऋन्मेष, सामोजी, पाथफाईंडर, srd, बोकलत.
ऋन्मेष, अगदी बरोबर अर्थ लावलात.
थँक्स हा रुंम्या
थँक्स हा रुंम्या
भारीच :
भारीच :
छान!
छान!