पॅनकेक (pancake) झटपट आणि चविष्ट

Submitted by 'सिद्धि' on 23 March, 2020 - 08:43

IMG_20200323_104548.jpg
***
साहित्य -
२ वाटी मैदा किवा गव्हाचे पीठ, ३ टेबलस्पून पिठीसाखर, १ टिस्पून बेकिँग पावडर, अर्धा टिस्पून बेकिँग सोडा, ३ टिस्पून तूप, १ ते दिड वाटी दूध (लागेल तसे घ्यावे). १ टिस्पून vanilla essence.
IMG_20200323_163807.jpgकृती-
मैदा, पिठीसाखर, बेकिँग पावडर आणि बेकिँग सोडा, vanilla, मेल्टेड तुप हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. यानंतर यामध्ये थोडे-थोडे दुध घालून मिश्रण थोडे सैलसर करावे. इडलीच्या मिश्रणाप्रमाणे हे मिश्रण तयार झाले पाहीजे. जास्त पातळ करु नये.
आता हे मिश्रण पाच मिनिटासाठी झाकून ठेवावे. यानंतर (अगदी बारीक आचेवर) नॉनस्टीक पॅन वरती थोडेसे तुप लावून घ्यावे, व त्यावर पळीने थोडे-थोडेसे मिश्रण घालावे (फुलक्या एवढेच लहानसे पसरावे). एका बाजुने भाजून दुसया बाजूनेही सोनेरी सर भाजून घ्यावे.
ही अगदी साधीसोपी एगलेस पॅन केकेची रेसिपी आहे.

* बेकिँग सोडा आणि बेकिँग पावडर या दोघांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे दोन्ही वापरले जाते.
* जर या मिश्रणामध्ये बेकिँग सोडा ऐवजी एक अंडे फेटून घातले तर तो पॅनकेक ही चविष्ट लागतो.
* हे केक जर मधाबरोबर खाल्ले तर ३ मध्यम आकाराचे चमचे साखर सुध्दा पुरे होते. अजुन एक असे की, तुम्ही किती गोड खाता यानुसार मिश्रण तयार झाले की, थोडं हातावर घेऊन टेस्ट करून घ्या. गोडाचे प्रत्येक घरातील प्रमाण कमी-अधीक असते.
IMG_20200323_104656.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिद्धी, पाकृ. वाचल्यापासून करायचे घोळत होते डोक्यात... आज केलेच! खुप मस्त सोनेरी झाले आणि चविष्ट. मी थोडी साखर वाढवली आणि इसेन्स नसल्याने वेलची पूड घातली.तसेच खाताना घरात काकवी होती त्याबरोबर खाल्ले केक. मस्त लागतात काकवी बरोबरही.

मस्त पाकृ. इथे दिल्याबद्द्ल धन्यवाद!

अदिजो च्या कृतीनेही करुन बघेन आता!

निलाक्षी धन्यवाद.
मस्त लागतात काकवी बरोबरही मी सुद्ध्या ट्राय केल आहे.

मोहिनी१२३, अनामिका - मस्त दिसतोय पॅनकेक. मिश्रण जास्त घट्ट असेल आणि जरा जास्त न पसरवता, तिथल्या तिथेच पॅनमध्ये केक घातला की छान फुगीर होतो. धन्यवाद.

किती किती शोधून काढला हा धागा.
प्रतिसाद द्यायचा होता म्हणून Happy
ही कृती वाचून मी खूप वेळा हा नाश्ता करते. गव्हाचे पीठ आणि गूळ घालून करते. वरून साजूक तूप घालून मुले आवडीने खातात.
कृती साठी धन्यवाद. .

मस्त दिसत आहेत, सोनेरी.
गोड नाही पण एखादे मसालेदार व्हर्जन नक्की करुन बघणार अश्या रेसिपीने.

Pages