एक तुकडा धूप का...

Submitted by जयश्री साळुंके on 20 March, 2020 - 12:43

चित्रपसृष्टीत स्त्री प्रधान चित्रपटांची आत्ता कुठे व्यवस्थित सुरुवात झालीय. म्हणजे आधी पण काही चित्रपट येऊन गेले ज्यात स्त्री भूमिका ही प्रमुख होती, मदर इंडिया, कहाणी, मर्दानी इत्यादी... पण ह्या सगळ्या चित्रपटात कुठे तरी non fiction बघायला मिळतात. यात असलेल्या महिला ह्या खरचं आयुष्यात आहेत की नाही इथून प्रश्न पडतात. पण सध्या नवीन आलेल्या "थप्पड" आणि "छपाक" मध्ये रोजच्या जगण्यातल्या बायका बघायला मिळाल्या...
मालती च्या चेहऱ्यावरचं acid असूद्या की अम्रिता च्या चेहऱ्यावर पडणारा थप्पड, दोघींचा संघर्ष फक्त दोनच गोष्टीसाठी ते म्हणजे "आदर" आणि "आनंद".
"Just a slap, पर नहीं मार सकता"
"Acid की बिक्री पे रोक होनी चाहिए"
असे दोन मुद्दे ह्या दोन चित्रपटात दाखवले गेले आहेत. पण फक्त दोनच त्रास आहेत का? अजुन बाकीचे त्रास देखील आहेत ना, म्हणजे जन्माला येण्यापूर्वीच तपासणी करून घरच्या लोकांनी तिचा जीव घेणं, जन्माला आल्याबरोबर कचरा कुंडीत सापडलेले लहानगे जीव, शाळा - कॉलेज - ऑफिस - रस्ता सगळी कडे पसरलेले so called रोमिओ, हुंडाबळी, बलात्कार, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या दरम्यान बोचणारी नजर आणि होणारे ओंगळवाणे स्पर्श...

एक ना अनेक कित्येक गोष्टींना ती सामोरी जात असते. ह्या सर्व मुद्यांवर चर्चा खूप होतात, तिच्या कपड्यांपासून ते तिने दिलेल्या "signals" पर्यंत चर्चा होते. पण ठोस असं काही समोर येत नाही. आज आठ वर्षांनी "त्या" नराधमांना शिक्षा मिळाली पण ह्या आठ वर्षात जे इतर जीव बळी पडले त्यांचं काय??

आज फक्त एकच, खाली प्रतिक्रियांमध्ये असं काही सुचवा ज्याने बदल घडून येण्याची शक्यता आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरुषी विचारसरणी बदलावी लागेल ज्याची सुरवात मुलांना स्पेशल ट्रीटमेंट देणे थांबवा आणि मुलींना जास्त सशक्त आणि समाजात वावरताना घ्यायची काळजी शिकवावी लागेल..मुलांना मुलींचा आदर करण्याची सवय घरातल्या मोठ्या माणसापासून शिकावी लागेल. पुरुषी इगो बाजूला ठेवावा लागेल

जयश्री ताई वास्तु या कथेचे पुढचे भाग लवकर टाका मायबोलीवर

आम्ही वाचक आपल्या वास्तु या कथेच्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहोत .

आपण पुढील भाग मायबोली वर लवकरात लवकर टाकाल अशी अपेक्षा करते .