मी मला भास वाटतो आता

Submitted by nilesh.shelote on 20 March, 2020 - 06:20

मी मला भास वाटतो आता
की मला मीच टाळतो आता

फारसे बोलणे बरे नाही
पथ्य मी छान पाळतो आता

दोष ना लावला जरी काही
मी तुझा रोख जाणतो आता

भावना साचता कधी डोळा
घोर जीवास लागतो आता

आठवांच्या निलेश डागण्या
ना तसा फार त्रासतो आता

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- लज्जिता (गालगा गालगा लगागागा)

Group content visibility: 
Use group defaults