न्याय मिळाला!

Submitted by Asu on 20 March, 2020 - 03:24

न्याय मिळाला!

दुष्ट नराधम फाशी गेले
न्याय मिळाला निर्भयाला
मरणांतीही तळमळणारा
आत्मा आज मुक्त जाहला

लांडग्यासम लचके तोडुनि
मिटक्या मारून किती छळले
होता शिक्षा फाशीची
मरणाचे त्यां भय कळले

न्यायासाठी फिरती वणवण
अन्यायी हे दुष्ट दुर्जन
अन्यायाचा करता कावा
स्मरावे त्यांनी त्यांचे वर्तन

विनंती इतुकी न्यायदेवते
विनाविलंबित न्याय व्हावा
दोषी ठरता निर्णय देता
अंमल शिक्षेचा त्वरे करावा

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.20.03.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults