मायबोलीने खरडफळा सुरू करावा का?

Submitted by Srd on 17 March, 2020 - 02:55

आता करोना वायरसचा विळखा जगातल्या प्रत्येकालाच धरू पाहात आहे. लोक वाटसप ग्रुप किंवा फेसबुक माध्यमांत चर्चा करत आहेत. अशावेळी मायबोलीवर आपलं मत मांडणं, शंका विचारणं यासाठी तरी संपादकांनी/मालकांनी खरडफळा चालू करावा असं मला वाटतं.
इतर काही कारणामुळेही मोठा लेख पाडता येत नाही अशा गोष्टींसाठी खरडफळा आवश्यक आहे.
तुम्हाला काय वाटतं?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो तिकडं सुध्दा गाडी आपोआप राजकारण विषयावर जाईल. भरत, उदय आणि कंपनीच्या हाती आयतं कोलित दिल्यासारखे होईल. नाहीय तेच ब्रं आहे.

मायबोलीने खरडफळा सुरू करावा का?
>><<

तुम्ही पुढाकार घेऊन एक वाहाता धागा सुरु करा व त्या धाग्याचे नाव "खरडफळा" असे ठेवा. इतर सदस्यांना एकाद्या विषयावर प्रतिक्रिया कुठे देऊ असा प्रश्न पडतो, तो प्रश्न असा एकादा धागा सुरु केलात तर पडणार नाही.

खरडफळ्याला विषय असा नसतो. कुणी काहीही विचारू शकतं, सांगू शकतं दोन चार ओळीत. त्या पोस्टी/खरडी एकमेकांशी संबंधिय असाव्याय असं नसतं. जर का एखाद्या गोष्टीवर बरेच जण मतं देऊ लागले तर कुणी धागा काढेलच. पण स्वैरपणा हेच खरडफळ्याचं सामर्थ्य आहे. तो कुणा एकाचा धागा नसल्याने मागे पडण्याचा धोका नसतो.

खरडफळ्यावरचे लेखन फक्त सभासदांनाच लॉगिन केल्यावर दिसतं. बाहेरच्यांना दिसत नाही.

तो कुणा एकाचा धागा नसल्याने मागे पडण्याचा धोका नसतो.
>><<

तसे असेल तर प्रशासकांच्या वि.पू.त विनंती करा.
ते देतील एक खरडफळा बनवून.

तो कुणा एकाचा धागा नसल्याने मागे पडण्याचा धोका नसतो. >>>>
ओके. म्हणजे ऍडमिन / वेमाच करू शकतात हे काम

बरोबर मानव. खफ हे फीचर आहे. धागा नाही. म्हणजे लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला मेनुमध्ये खफ चे बटन दिसते. ते क्लिक केले असता तुम्ही लहान सहान प्रश्न / हाय हलो/ तब्येत पाणी काय वाट्टेल ते पोस्ट करु शकता. म्हणजे गप्पांचा वाहता धागाच पण धागा नाही. फीचर.
________________
मला खफ आवडेल. स्ट्राँगली रेकमेंड.

काही प्रश्न ―

१) खफ वाहता असेल तर त्या गोष्टीचा गैरफायदा घेत बेताल आयडी काहीही (indecent / slang language) बोलत राहील तर अश्या परिस्थितीत सरसकट सर्वाना तिकडे मनमोकळे वावरणे जमेल का ?

२) हयाउलट जर वाहता नसेल तर त्याचा उपयोग एखाद्या चर्चेबद्दलची मुद्दे शोधायला नक्कीच होईल पण २००० प्रतिसादांत ते नेमके मुद्दे शोधायचे कुठे ? हां नवीन येणाऱ्यासाठी यक्षप्रश्न असेल !!

३) वरील दोन्हीं शक्यतामध्ये हां एक धागा म्हणून कोणीही काढला तर नक्की काय असा मोठ्ठा फरक पडेल की खफचा मूळ हेतु बाधित होईल ?

४) खुप महीने (कदाचित गेल्या वर्षी) ही सुचवणी धागाकर्त्याने प्रशासकाना केलेली असताना आणि त्यावर खफ सुरु होणे अशी अपेक्षित कार्यवाही घडलेली नसताना पुन्हा पुन्हा स्वतःचा मुद्दा रेटण्यामागील नक्की उद्देश काय ?

५) प्रत्येकाला व्यक्ति स्वातंत्र्य असावे हे जसे मान्य असते त्याच न्यायाने मग मायबोली मालक आणि चालक ह्यांनाही ते आहेच ना ! मग इतर साइटवर एखादी सुविधा आहे म्हणून ती इथेही हवीच असा आग्रह का ?

नमस्कार,
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

--
MIsal Pav.Com
--
खरडफळ्याचा उद्देश साधरण असा असतो.

उडत नाही. अनेक महिन्यांपासून तिथं खरडी वाचता येतात. खात्री करून घ्या.
नवीन Submitted by परशुराम परांजपे on 17 March, 2020 - 20:43
>><<

तो अपवाद झाला.
आता प्रशासक तरी कुठे कुठे पुरे पडणार ! त्यांना त्यांची कामे देखील आहेतच.

मुद्दा रेटण्याचा उद्देश काय
Submitted by अज्ञानी on 1
--
आताच्या करोना संदर्भात तसं वाटलं म्हणून. नाही सुरू झाला तर मालकांना याची आवश्यकता नाही हे धरले आहे.

खरडफळ्याला विषय असा नसतो. कुणी काहीही विचारू शकतं, सांगू शकतं दोन चार ओळीत. त्या पोस्टी/खरडी एकमेकांशी संबंधिय असाव्याय असं नसतं. >>> हे असं असलं तरी मी दोन चार ओळी लिहिल्यावर आक्षेप घेतील काहीजण.

>>>हे असं असलं तरी मी दोन चार ओळी लिहिल्यावर आक्षेप घेतील काहीजण.
नवीन Submitted by बोकलत on 17 M >>>>>
--
तुमच्या लेखनाशी/व्यक्त केलेल्या मताला विरोध मांडणे ठीक. पण केवळ 'बोकलत' ( किंवा आणखी कुणी) नावडत्या आईडीने लिहिलं म्हणून विरोध करणे पटणारे नाही. आणि ते धागा अथवा खरडफळ्यालाही लागू आहेच ना!

@ बोकलत
हे असं असलं तरी मी दोन चार ओळी लिहिल्यावर आक्षेप घेतील काहीजण.

अशा लोकांना आपल्या मनातून हद्दपार करून टाकायचं.

त्यांनी कितीही ट्रॉल केला तरी त्याला उत्तरच द्यायचं नाही.

फारच झालं तर "आप कौन बहनजी" म्हणून कचरा करायचा.

मी करतो ना "व्यत्यय" "दांभिक झमले"ना तसं.

त्यांची फार तडफड होते आणि आपण मजा पाहत बसायचं (त्यांचा अगदी किती मुद्देसूद वाद असला तरी)