धूळ झटकली मी जमलेली

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 March, 2020 - 09:58

स्मृतींमधे त्याच्या रमलेली
वेल थिरकते घमघमलेली

सांज बिलगते काळोखाला
अभिसारीका जणु श्रमलेली

राख समजून नकोस चिवडू
आग असू शकते शमलेली

तिन्हीसांज का उदास हसते ?
माय असावी का दमलेली ?

चित्र केवढे जिवंत झाले
धूळ झटकली मी जमलेली

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users