Submitted by सुप्रिया जाधव. on 12 March, 2020 - 09:58
स्मृतींमधे त्याच्या रमलेली
वेल थिरकते घमघमलेली
सांज बिलगते काळोखाला
अभिसारीका जणु श्रमलेली
राख समजून नकोस चिवडू
आग असू शकते शमलेली
तिन्हीसांज का उदास हसते ?
माय असावी का दमलेली ?
चित्र केवढे जिवंत झाले
धूळ झटकली मी जमलेली
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
अहाहा!! सुंदर.
अहाहा!! सुंदर.
सुंदर!
सुंदर!
मनापासून आभारी आहे
मनापासून आभारी आहे
एक गझल मस्त जमलेली
एक गझल मस्त जमलेली
तिन्ही सांज का उदास हसते?
तिन्ही सांज का उदास हसते?
माय असावी का दमलेली?
भावते बघा!