कूटकविता/कविता कोडे : एकही अक्षर...

Submitted by शंतनू on 6 March, 2020 - 04:08

खालील कोडे सोडवता आले तर पहा:

एकाएकी कुठून कैशी
कल्लोळातुन उमटे ऐशी
हीन स्वरांची शुभ्र रेष ती

अजाणत्या त्या विहरी वेली
क्षत्रपतीच्या कुरणावरुनी
रविकुहरातील बनुनी छाया

सरसावुनी मग येई रावा
मरुभूमीकणघृत रगडाया
जराजीर्ण त्या जरासंध-सम
लचके समस्त एकवटाया

नाद जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा
ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा

(२०१० मध्ये इतरत्र प्रकाशित)

Group content visibility: 
Use group defaults

Khalun varti vachaychi ahe kavita...naad jodun mhnje kay kalale nahi.... Varchi post vachun kalale...ek hi akahar samjle nahi....hech uttar ahe Wink

अधर म्हणजे ओठ.
तुम्हाला अधो दिशेने म्हणायचे आहे बहुधा.
बाकी कोडे कसे सोडवायचे त्याची सोपी हिंट द्या.

पहिल्या कडव्याविषयी प्रथम वाटले की भर वादळात कडकडाट करून वीज चमकली असे असेल . पण पुढे याचा काहीच संबंध लागला नाही . नंतर मरुभूमिकण घृत म्हणजे तेल असा अर्थ लावून बघण्याची खटपट केली. शेवटी कळले की मला एकही अक्षर समजले नाही!

जरा ओढून ताणून केल्यामुळे कै-च्या-कै झाली आहे कविता, पण अनेकांनी ओळखली आहे.

सामो, अधर चा एक अर्थ खालची दिशा असाही होतो. अधराय दिशे अनंताय नमः असे म्हणतात.

मागे मी उपक्रम आणि मनोगतावर टाकली होती, तेथे फार भयानक प्रतिसाद आले होते. कुणीतरी 'मरुभूमी' आणि घृत - इथे तुपासदृश म्हणून तेल असा अर्थ घेऊन, तो खनिज तेल विकणारा वाळवंटी प्रदेश - मध्यपूर्व आहे, असा अर्थ लावला होता. शिवाय तिथे रावा, म्हणजे हिरवा पोपट हा हिरव्या निशाणाचे प्रतीक असून तेथे आक्रमण करू इच्छिणाऱ्या अमेरिकेची बाजू घेणारी ही भांडवलवादी कविता आहे असाही अर्थ काढला होता!

>>>>>सामो, अधर चा एक अर्थ खालची दिशा असाही होतो. अधराय दिशे अनंताय नमः असे म्हणतात.>>>> धन्यवाद शंतनु.

कविता लिहिताना मूळ अर्थ - पावसाची चाहूल लागताना घडणारे बदल हा गृहीत धरला होता. वीज चमकणे, वाऱ्याची झुळूक येणे, त्यावर वेली डुलणे, हिरवा रंग तरारून उठणे वगैरे अपेक्षित होते, परंतु मुद्दाम विचित्र शब्द वापरायच्या ओघात प्रयत्ने वाळूचे तेल रगडण्याऐवजी तूप रगडले गेले. वेली विहरी (विहरतात) ह्या अनेकांना विहिरी वाटल्या. असो! गम्मत म्हणून इथे टाकली.

प्रत्येक ओळ उलटी वाचायची का ?
Submitted by सूक्ष्मजीव on 1 April, 2020 - 15:19 >>>>>>>> नको नको, आता लिहा-वाचायला शिकायच्या निमीत्ताने मुक्काम वाढवू नका बुवा. 'सूक्ष्मजीवांनी' आता आवरते घ्यायचेय !! म्हणजे स्थूल जिवांना कामा-धंद्याला लागता येईल. Happy

@ शंतनू -- मला वाटले, पहिले कडवे राग-संगीताशी संबंधित, दुसरे काही कृष्णविवर वगैरे, तिसरे प्रयत्ने वाळूचे कणशी संबंधित, आणि चौथे आम्ही लिहायचेय असेच असंबंद्ध...... हे भलतेच निघाले......नाद जोडुनी च्या जागी नाद सोडुनी हवे होते.......
अवनी भासे लेकुरवाळी
जूनच फांदया नवी नव्हाळी
नटल्या वेली सजली झाडे
येता ऋतुराज, घालिती सडे
ऊन साजरे वात भिरभिरे
द्याया साथ सुगंध विहरे