थांबावे तर दरड कधीही कोसळेल ही !

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 March, 2020 - 06:54

थांबावे तर दरड कधीही कोसळेल ही !

कोसळल्यानंतरची उघडिप आवडेल ही
ऋतुचक्रातिल बदल कदाचित मानवेलही

चिघळू शकते खपली धरल्यानंतरसुद्धा
दुर्लक्षित कर जखम जराशी खाजवेल ही

संकटात हतबल व्हावे अन झोप उडावी
झुळूक मानुन वादळास बघ.... जोजवेलही !

तुझ्याबरोबर तुझ्याप्रमाणे वागुन पाहू ?
लाही-लाही पावसा तुला सोसवेल ही ?

चालावे तर घाटामधला अवघड रस्ता
थांबावे तर दरड कधीही कोसळेल ही !

विस्कटलेली घड़ी बसवणे सोपे नसते
आयुष्यातुन उठल्यानंतर जाणवेलही !

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users