Submitted by सुप्रिया जाधव. on 5 March, 2020 - 06:54
थांबावे तर दरड कधीही कोसळेल ही !
कोसळल्यानंतरची उघडिप आवडेल ही
ऋतुचक्रातिल बदल कदाचित मानवेलही
चिघळू शकते खपली धरल्यानंतरसुद्धा
दुर्लक्षित कर जखम जराशी खाजवेल ही
संकटात हतबल व्हावे अन झोप उडावी
झुळूक मानुन वादळास बघ.... जोजवेलही !
तुझ्याबरोबर तुझ्याप्रमाणे वागुन पाहू ?
लाही-लाही पावसा तुला सोसवेल ही ?
चालावे तर घाटामधला अवघड रस्ता
थांबावे तर दरड कधीही कोसळेल ही !
विस्कटलेली घड़ी बसवणे सोपे नसते
आयुष्यातुन उठल्यानंतर जाणवेलही !
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदरच आहे, पण ही हे सर्वनाम
सुंदरच आहे, पण ही हे सर्वनाम आणि सुद्धा या अर्थाने ही वापरणे (उदा. जाणवेलही) हे जरासे खटकले.
विस्कटलेली घडी बसवणे सोपे
विस्कटलेली घडी बसवणे सोपे नसते......
सुंदरच की!