मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती २

Submitted by आसा. on 3 March, 2020 - 12:12

अगोदरच्या धाग्याने २००० प्रतिसादांची मर्यादा ओलंडली आहे. तरी तुम्हाला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

अगोदरचे धागे

https://www.maayboli.com/node/2738

https://www.maayboli.com/node/51027

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amazon echo ची "सामने ये कौन आया " मस्त आहे.
ते आजोबा छान नाचतात , खुर्चीत बसल्या बसल्या

बहुधा मास्टर कार्डची जाहिरात आहे - पी व्ही सिंधूला मॉलमध्ये, पेट्रोल पंपवर 'यू टॅप फॉर अस, वुई टॅप फॉर यू' म्हणत माणसं तिच्यासाठी स्वत:च्या कार्डवरून पेमेंट करतात... ती जाहिरात टोटली गंडलेली आहे. तो त्या माणसांचा चोंबडेपणा वाटतो, खासकरून तिच्याकडे स्वतःचं कार्ड असतानाही

मंगलम कापूरची ऍड पण छान आहे. संध्यकाळी दुकानात पूजा करताना अचानक देवच कापूर मागायला येतो तर नोकराने दिलेली कापराची डब्बी फेकून तिजोरीतून मालक मंगलम कापूर देतो। तो देव छान हँडसम आहे।

5 star ची जाहिरात डोक्यात गेली.
मुलगा निगरगट्टपणे चॉकलेट खात उभा राहतो , आजी स्वतःच काठी घ्यायला उठते आणि वरून पडलेल्या ढिगार्यापासून वाचते !
ही नशिबाची क्रुपा आहे , मुलाच्या निष्क्रीयपणाची नाही!

मला अ‍ॅक्सिस बँकेची प्रेग्नंट वुमन बघून बँक परत उघडतात ती अ‍ॅड आवडते. त्यातला वॉचमन रुबाबदार आहे, मॅनेजर हँडसम विथ क्युट स्माईल आहे आणि ती वुमन फार गोड आहे.

बहुधा मास्टर कार्डची जाहिरात आहे - पी व्ही सिंधूला मॉलमध्ये, पेट्रोल पंपवर 'यू टॅप फॉर अस, वुई टॅप फॉर यू' म्हणत माणसं तिच्यासाठी स्वत:च्या कार्डवरून पेमेंट करतात... ती जाहिरात टोटली गंडलेली आहे. तो त्या माणसांचा चोंबडेपणा वाटतो, खासकरून तिच्याकडे स्वतःचं कार्ड असतानाही
Submitted by ललिता-प्रीति on 11 March, 2020 - 08:01

Master नाही, VISA card ची जाहिरात आहे ती. https://www.youtube.com/watch?v=osVqk-YxHzQ

अवांतर : मला जेव्हा माझे नवीन credit कार्ड मिळाले (VISA) तेव्हा मी torch वापरून त्यातील RFID चीप शोधून काढली (जी या tap payment साठी आवश्यक असते) आणि punch machine ने होल पाडून काढून टाकली. कोणत्याही प्रकारे verification न करता रु. २०००/- पर्यंतचे payment ही संकल्पना नाही पटत!!! कधी कार्ड हरवलेच तर ते माझ्या लक्षात येऊन block करेपर्यंत २००० - २००० करत ८-१० हजारांना चुना लागायचा!!!
Credit Card.png

आजकाल त्या चला हवा येऊ द्या टाईप कार्यक्रमात मध्येच ते कलाकार इंटिग्रेशन म्हणून स्पॉन्सर ची जाहिरात करतात. अतिशय डोक्यात जातो हा प्रकार.