श्री नरेंद्र मोदी करणार सोशलमाध्यमांना टाटा बाय बाय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 March, 2020 - 11:37

भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठा निर्णय घेणार आहेत.

मोदी सोशलसाईटवरून अखेरचा निरोप घेणार आहेत.

मोदीजी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील अकाऊंट बंद करणार आहेत.

याची माहिती लवकरच देण्यात येईल असेही मोदींनी सांगितले आहे.

फेसबूक पेटून ऊठले आहे. पण मला वेगळाच संशय येत आहे....

कदाचित ते रिलायन्सला सोबत घेऊन स्वत:ची सोशलसाईट काढू शकतात. डबल्यू डबल्यू डबल्यू मोदी डॉट कॉम... तसे झाले तर आधी भक्त, पाठोपाठ द्वेष्टे, आणि नंतर पॉपकॉर्नप्रमी सारेच तिथे वळतील. मोदी फेसबूक व्हॉटसप ट्विटर ईन्स्टाचे दुकान एकहाती बंद करतील. त्यांचा ऑर्कुट करतील.. देव न करो पण अर्धी मायबोलीही थंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना व्हाईरस आधी या संकटाचा सामना करण्यास सज्ज राहणे गरजेचे.

जनहितार्थ जारी

धागा गंभीर आहे !
पण वातावरणातील तणाव हलका करायला अध्येमध्ये हलकेफुलके विनोदी प्रतिसाद देऊ शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय महिला दिनानिमित्त फक्त एक दिवस काही निवडक महिला त्यांचं सोशल मिडीया हँडल ऑपरेट करणार आहेत.

नाही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय महिला दिनानिमित्त फक्त एक दिवस काही निवडक महिला त्यांचं सोशल मिडीया हँडल ऑपरेट करणार आहेत.

नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 3 March, 2020 - 22:10
>>>
मी या विषयावर ऋ यांचा धागा अपेक्षित करत होतो. आला रे आला.
ऋ भाई तुम तुम्हारा मा बो हॅडल किसी को ऑपरेट करने दे सकते हो.
Happy

बिपीनचंद्र, मी वाचले त्या बातमीत सोडणार असे लिहिले होते.महिलांचा उल्लेखही नव्हता.

पाफा कल्पना छान आहे. पण माझे प्रोफाईल एक दिवसासाठी चालवेल अशी महिला कुठून आणू Happy

सई ता. ह्यांना विनंती करा
>>>
ती माझ्या विनंतीला मान देत असती तर..... डोळ्यात बदाम बदम बदाम बदम बदाम....
जोक्स द अपार्ट ती फार मोठी सेलिब्रेटी आहे. तिला मोदींचे अकाऊण्ट चालवायचे आमंत्रण असेल. माझा नंबर कुठे लागतोय तिथे Sad

अर्चना सरकार विल बी बेस्ट ऑप्शन!
नवीन Submitted by अज्ञातवासी on 4 March, 2020 - 08:43
>>>

मी या पोस्टची वाटच बघत होतो.
पण ती आपल्याकडून येणे हा सुखद धक्का आहे Happy

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या घोषणेमुळं मंगळवारी दिवसभर देशभरात चर्चेला उधाण आले होते. त्यांच्या संभाव्य निर्णयाच्या बाजूनं व विरोधात मत व्यक्त होत होती. मात्र, मोदींनी स्वत:च नवं ट्विट करून खुलासा केल्यानंतर सगळे काही शांत झाले. या सर्व घडामोडींवर शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'नं (Saamana Editorial) आज भाष्य केलंय.

>> खरंतर ‘सोशल मीडिया’ हा तर भाजपचा पंचप्राणच! २०१४ चा लोकसभा रणसंग्राम भाजपने सोशल मीडियावर सायबर युद्ध करूनच जिंकला. गोबेल्स नीतीचा वापर त्या वेळी झाला व काँग्रेस राजकीय पटलावरून अदृश्य झाली. पण भाजपच्या सायबर फौजेचे सेनापती नरेंद्र मोदी हेच मैदान सोडून निघून जात आहेत, असा संदेश पंतप्रधानांच्या कालच्या ट्विटमुळे गेला किंवा तो जाणीवपूर्वक तसा जाऊ दिला गेला. त्यावरून चर्चेचे घमासान सुरू झाल्यानंतरही लगेच खुलासा न करता चर्वितचर्वणाचा प्रयोग रंगू दिला गेला. नाट्य पुरेसे रंगले आहे हे ध्यानात आल्यानंतर नवा क्लायमॅक्स पुढे करून धक्का देण्याचे तंत्र खुबीने वापरले गेले.

>> आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत कुशलतेने करण्यात मोदी पटाईत आहेत. साडेपाच कोटींपेक्षा जास्त लोक मोदी यांना ट्विटरवर ‘फॉलो’ करतात. मोदींचे फेसबुक पान पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचते. इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून मोदी रोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात. आता हे सर्वकाही सोडण्याचा निर्णय मोदी घेतीलच कसा? कारण सोशल मीडियाचा वापर म्हणजे नशापाणी नसले तरी त्याची एक धुंदी आणि अंमल असतोच. ती धुंदी इतक्या सहजासहजी सुटणे कठीणच.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sen...

सगळा पब्लिसिटी स्टंट आहे बाकी नाही नाही. मायबोलीवर पण आहेत ना काही महाभाग. सोडून जातो सोडून जातो करतात आणि वर्षभर रडत भेकत इथेच पडून असतात.

परिसे गे सुनेबाई |*
*नको वेचू दूध दही ||१*
*आवा चालीली पंढरपुरा |*
*वेसींपासुन आली घरा ||२*

*ऐके गोष्टी सादर बाळे |*
*करि जतन फुटके पाळे ||३*
*माझा हातींचा कलवडू |*
*मज वाचुनी नको फोडूं ||४*
*वळवटक्षिरींचे लिंपन |*
*नको फोंडू मजवाचून ||५*
*उखळ मुसळ जाते |*
*माझे मनं गुंतले तेथे ||६*
*भिक्षुंक आल्या घरा |*
*सांग गेली पंढरपुरा ||७*
*भक्षी परिमित आहारु |*
*नको फारसी वरों सारू ||८*
*सुन म्हणे बहुत निके |*
*तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९*
*सासुबाई स्वहित जोडा |*
*सर्वमागील आशा सोडा ||१०*
*सुनमुखीचे वचन कानी |*
*ऐकोनी सासु विवंची मनी ||११*
*सवतीचे चाळे खोटे |*
*म्या जावेसे इला वाटे ||१२*
*आता कासया यात्रे जाऊ |*
*काय जाऊन तेथें पाहू ||१३*
*मुले लेकरे घर दार |*
*माझे येथेंचि पंढरपूर ||१४*
*तुका म्हणे ऐसे जन |*
*गोवियेलें मायेंकरून ||१५*

( आवा पंढरपूरला जायला निघते, पण मग गाय , दूध , झाडे ह्यांचे काय होणार , आपल्या माघारी सून सगळे हडप करील का, ह्या भीतीने ती तिथेच रहाते)

मोदी फेसबूक व्हॉटसप ट्विटर ईन्स्टाचे दुकान एकहाती बंद करतील.

>>>

कदाचित हे धाग्याशी संबंधित नसेल. पण भारताला एका 'स्वदेशी' सोशल मीडियाची गरज आहेच. आपला सगळा डेटा / सोशल मीडियावर आपण देतो ती माहिती कुठे कशी वापरली जाते याबाबत आपण (विशेषतः भारतीय) फारच अज्ञ आहोत. अश्या वेळी आपल्या देशातील लोकांची जास्तीत जास्त माहिती देशातच राहायची असेल तर देशी सोशल मीडियाला पर्याय नाही.

पण भारताला एका 'स्वदेशी' सोशल मीडियाची गरज आहेच. आपला सगळा डेटा / सोशल मीडियावर आपण देतो ती माहिती कुठे कशी वापरली जाते याबाबत आपण (विशेषतः भारतीय) फारच अज्ञ आहोत. >> अगदि बरोबर... अन त्याच तयारीत कदाचित असतील मोदी. Happy

अगदि बरोबर... अन त्याच तयारीत कदाचित असतील मोदी. >>>> Rofl मोदींच्या अंधभक्तीचा असा नमुना बघायला मिळाला, धन्य जाहलो

श्री नरेंद्र मोदी करणार सोशलमाध्यमांना टाटा बाय बाय !
--

मित्रा,
पंतप्रधान श्री मोदींनी तुझ्याबरोबर छोटासा प्रॅंन्क केला होता.
आता कॅमेर्‍याकडे बघून एकदा "हाय" म्हण बघू ! Happy

मित्रा,
पंतप्रधान श्री मोदींनी तुझ्याबरोबर छोटासा प्रॅंन्क केला होता.
>>>

हा प्रांन्क माझा मायबोलीवरच करून झालाय.
मोदींनी माझीच स्टाईल कॉपी केली आहे Happy

वाचन वाढवा
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 4 March, 2020 - 09:44

>>>>>

माझ्या वाचनानुसार मोदींनी सोशलसाईट सोडायचीच घोषणा केली होती.
आता त्यानंतर त्यांनी नवा स्टंट केला ते वेगळे. माझे कामधंदे सोडून त्यांची प्रत्येक घडामोड तर मी टिपू शकत नाही ना?

पण भारताला एका 'स्वदेशी' सोशल मीडियाची गरज आहेच. आपला सगळा डेटा / सोशल मीडियावर आपण देतो ती माहिती कुठे कशी वापरली जाते याबाबत आपण (विशेषतः भारतीय) फारच अज्ञ आहोत
>>>

हे असे झाले तर फारच ऊत्तम.
पण त्यातही शंका आहे.
ती स्वदेशी कंपनी रिलायन्स असली तर आगीतून फुफाट्यात नाही का जाणार?
कि विजय मल्या वा नीरव मोदी हे फ्रॉड असले तरी स्वदेशी फ्रॉड होते या आनंदात जगायचे..

काय झाले ?

स्वदेशी फेसबुक आले का ??

<< पोस्ट धाग्याशी संबंधित नाही.
तरी टाकायला माझा धागा निवडल्याबद्दल आभार >>

--------- संबंध नाही?
तो फोटो सोशल मिडिआ वर व्हायरल झाला आहे... " श्री नरेंद्र मोदी करणार सोशलमाध्यमांना टाटा बाय बाय " असा बाय बाय करण्याच्या अनेक कारणांपैकी वरिल फोटो ( हे केवळ उदा आहे... अशी हजारो उदा मिळतील ) किंवा नको असलेल्या बातम्या व्हायरल होणे हे पण एक कारण आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, यांवर अगोदरच असलेला दबाव कायम ठेवणे हा पण ब्यापारी दृष्टीकोन आहे... जेणेकरुन त्यांनी आय टी सेलच्या कामांकडे दुर्लक्ष करावे.

थम्स डाऊन या प्रकाराला घाबरले आहेत असा एक कयास आहे. काही तासांत दहा लाखाचे थम्स (अर्थात डाऊन) मिळालेत. प्रसिद्धीच्या चा झोत कमी होणे होतो आहे हे जनतेस कळाले तर उतरती कळा झपाट्याने लागेल...
पुन्हा असे दहा लाखाचे थम्स डाऊन नकोच नको. त्यापेक्षा... झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवायची. ब्यापारी दिमाग आहे.

थम्स डाऊन या प्रकाराला घाबरले आहेत असा एक कयास आहे. काही तासांत दहा लाखाचे थम्स (अर्थात डाऊन) मिळालेत
आहे हे जनतेस कळाले तर उतरती कळा झपाट्याने लागेल...>>>

ते दहा लाख थम्स डाऊन जनतेनेच दिले असणार ना? मग ज्यांनी दिले त्यांना माहीत नसणार का की आपण दिलेत ते? आणि प्रसिद्धीचा झोत तर ते स्वतःवर कायम ठेऊ शकतात की, शेवटी सरकार त्यांचे आहे आणि जी काय आयटी सेल असलीच तर, तीही त्यांचीच आहे. . मग त्यांना काय कमी प्रसिद्धीची??

लोकप्रियता व प्रसिद्धीचा झोत ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला नक्की काय म्हणायचे हे आधी ठरवा. 'प्रसिद्धीच्या चा झोत कमी होणे होतो' या वाक्याचा अर्थ संत्रे सोलून लिहा हो, नाहीतर कॉपी पेस्ट तरी नीट करा.

दहा लाखाचे थम्स् डाऊन हा काय प्रकार आहे?

ते वर रिलायन्सचे बाळ आणि कटप्पाचा याच्याशी काय संबंध आहे?

संत्रे मोसंबी केळे जरा सारेच सोलाल का कोणीतरी?

संबंध असतो. राजकीय धाग्यावर कशाचाही कशाशीही संबंध असतो.

उदा. तू बाल्कनीत उभा आहेस. आणि तुझ्या वरच्या बाल्कनीत कोणी झाडांना पाणी घालत आहेत, थोडं पाणी बाहेर उडालं आणि हवेने चार थेंब तुझ्या वर आले.

याचा नेहरू आणि मोदींशी दोघांशीही संबंध असु शकतो.

समजा तुझ्यासोबत अ आणि ब या दोन व्यक्ती उभ्या आहेत. अ काँग्रेस द्वेष्टी आहे आणि ब मोदी द्वेष्टी. या दोघांच्या प्रतिक्रिया काय असतील:

समजा तुझ्या सोबत अ आहे:
अ: हम् वर भाजीपाला पण लावलाय वाटतं बाल्कनीत.
तू: माहीत नाही, असेलही.
अ: लावणारच. बाल्कनीत भाजीपाला लावणार त्याचं पीक शेतीचं पीक म्हणुन दाखवणार, बाल्कनीत भाजीचं उत्पन्न दाखवणार दहा करोड आणि काळ्याचे पांढरे पैसे करून घेणार. सगळी नेहरूंची कृपा बरं का!
तू: यात नेहरूंचा काय संबंध?
अ: काय संबंध? अरे कोणी केले हे कायदे? तुझ्या लाडक्या काँगेसनेच ना! स्वतःची तिजोरी भरण्यासाठी, त्या सगळ्यांचे हेच धंदे चालतात, तू काय वेड पांघरून पेडगावला चाललायस? आणि अजूनही गरिबी हटाव नारा आहे यांचा सत्तर वर्षे काय केलं मग?... वगैरे वगैरे... पुढे फटाक्यांना सुरुवात.

समजा तुझ्या सोबत ब आहे.
ब: हम् वर भाजीपाला पण लावलाय वाटतं बाल्कनीत.
तू: माहीत नाही, असेलही.
ब: लावणारच. तू ही लाव रे बाबा, वाटल्यास टेरेसवर पण लावा सोसायटीचा मिळुन.
तू: हम् तुला आवड दिसतेय बागायतीची.
ब: आवड नाही रे बाबा पण आता झक मारून करावंच लागणार आहे हे आपल्याला! तुमच्या मोदींच्या कृपेने.
तू: मोदींच्या कृपेने?
ब: अरे आणलाय ना तो कृषी कायदा. कोणाच्या फायद्यासाठी आणला हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. तुलाही माहीत आहे, वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. हे लोक सगळे मार्केट त्याब्यात घेणार, साठेबाजी करून ठेवणार, निर्यात करणार आणि वाट्टेल त्या भावात इथे विकणार. परवडणार आहे का ते आपल्याला? गरीबी हटाव नाही तर गरीब हटाव सरकार आहे हे...... वगैरे वगैरे..... पुढे फटाक्यांना सुरवात.

Pages