सनकी ( भाग १५)

Submitted by Swamini Chougule on 2 March, 2020 - 11:42

रिचा खरं तर मनातून शिवीनला गमावण्याच्या विचाराने घाबरली होती. तिनेच हात पाय गाळले तर कसं होणार आणि कायाला ही तिला तोंड देणे भाग होते. म्हणून ती खंबीरपणे उभी होती. ती ही मनातून शिवीनच्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. पण तिला कुठे तरी विश्वास होता की त्याला काही होणार नाही.

ती पोलीस स्टेशनमध्ये पोहचली तर तिच्या आधीच तिथे एस.एस व एक चाळीशी ओलांडलेले गृहस्थ हजर होते. कमिशनर ही तेथे आले होते.

रिचाने एस.एसची तो पर्सनल डिटेक्टिव्ह आहे व त्याला तिने अपॉइंट का केले होते. याची जुजबी माहिती दिली. कायाचे आई-वडील ही तेथे आले होते. सुधीरला सेल मधून दोन पोलीस घेऊन आले. काया मात्र खूपच आक्रमक झाली होती. त्यामुळे तिला ऑफिसमध्ये आणले गेले नाही.

कमिशनर साहेबांनी सगळ्याला बसायला सांगितले.सुधीर मात्र उभाच होता. रिचा बोलू लागली एस.एस काय माहिती मिळाली तुम्हाला काया बद्दल माझ्या बरोबर ती सगळ्यांनाच सांगा.त्यांनी एक फाईल टेबलवर ठेवली व एस.एस बोलू लागले.

एस.एस,“मी दिल्लीला कायाच्या केस संदर्भातच गेलो होतो.काया तेथे चार वर्षे या डॉक्टर कुलकर्णी यांच्या मेंटल असाइलम मध्ये होती.ती तिथे का होती कायाला असे काय झाले होते? या सगळ्या गोष्टींचा उहापोह डॉक्टर कुलकर्णी करतील. डॉक्टर कुलकर्णी प्लीज.” अस म्हणून तो खाली बसला व डॉ कुलकर्णी बोलू लागले

डॉ कुलकर्णी,“ काया माझी पेशंट आहे. तिला तिचे आई-वडील पुण्यातून माझ्याकडे घेऊन आले होते. (कायाच्या वडीलांकडे पाहत ते म्हणाले.)am I right Mr jaysing? (कायाच्या वडीलांनी नुसती होकारार्थी मान हलवली)

तर काया ही कॉलेज मध्ये असल्यापासून हलूसनेशनची मानसिक रूग्ण आहे. हलूसनेशन म्हणजे मतिभ्रम.ज्यांना हा मानसिक रोग असतो. त्याचा मेंदू भ्रम आणि सत्य या मध्ये भेद करू शकत नाही. परिणामी ते ज्या गोष्टींची कल्पना करतात त्या त्यांना खऱ्या वाटतात. बऱ्याचदा असे मानसिक रूग्ण दिवास्वप्ने पाहतात व तिच खरी मानून जगतात.

काया ही तशीच हेलुसणेशनची शिकार आहे. ती कॉलेजमध्ये शिकायला गेली. शिवीन व रिचा ही त्याच कॉलेजमध्ये होते. शिवीनचे राजबिंडे रूप त्याच बोलणं चालणं त्याच प्रत्येक इव्हेन्ट मध्ये ऍक्टिव्ह असणं हे सर्व पाहून ती त्याच्यावर भाळली.शिवीन तिचा क्रश होता. पण त्या क्रशचे त्या आवडीचे रूपांतर तिच्या एकतर्फी प्रेमात झाले. शिवीनला याची पुसटशी कल्पना ही नव्हती. I think अजून ही नसावी. कारण शिवीन व कायाचे विश्व पूर्णपणे वेगळे होते. तो एका मोठ्या घरातला हाय सोसायटीचा मुलगा. त्याच्या मागे त्याच्या हॅन्डसम लूक मुळे अनेक मुली लागणे साहजिकच होते. काया मात्र मध्यमवर्गीय मुलगी होती. दोघांचे मित्र मैत्रिणी वेगळे त्यामुळे शिवीन व कायाचा लांब लांब पर्यंत संबंध नव्हता. पण काया त्याच्या प्रेमात अखंड बुडली होती.

या जगात अनेक लोक एकतर्फी प्रेम करतात. पण जेंव्हा ती व्यक्ती आपल्याला मिळणार नाही हे कळल्यावर साठ टक्के लोक ती व्यक्ती आपल्या लायकीची नाही असे समजून आयुष्यात पुढे निघून जातात. आडोतीस टक्के लोक सोज्वळपणे मान्य करतात की आपण त्या व्यक्तीच्या लायकीचे नाही पण राहिलेले दोन टक्के लोक मान्य करायला तयार नसतात की ती व्यक्ती आपली कधीच होणार नाही.मग त्यातून कधी ते विकृत होतात तर कधी काया सारखे मानसिक रूग्ण होतात.

कायाने मग तिचे काल्पनिक विश्व तयार केले .त्यात ती शिवीनला इमॅजिन करू लागली. तिच्या कल्पनेतील शिवीन तिला हवं तसं वागायचा. दोन वर्षे ती अशीच शिवीनच्या काल्पनिक प्रेमात जगत राहिली. त्याच्याशी बोलू लागली. समोर कोणी नाही पण आपली मुलगी वेड्यासारखी कोणाशी तरी बोलतेय हे जेंव्हा तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आले तेंव्हा ते तिला माझ्याकडे दिल्लीत घेऊन आले कारण तिथेच कुठे तिला नेले असते तर सगळ्या लोकांना कळले असते की कायाला वेड लागलं.म्हणून ते तिला माझ्याकडे घेऊन आले.

काया माझ्या मेंटल असाइलम मध्ये तब्बल चार वर्षे होती. मग हळूहळू ती नॉर्मल होऊ लागली एकटीच शिवीन समोर आहे असे समजून बडबडने बंद झाले. कारण माझ्या इलाजामुळे तिला तो दिसणे बंद झाला. म्हणून मग मी तिला परत घरी पाठवून दिले.

मी तिला आत्ताच भेटून आलो. ती बरी झाली हा माझा कयास चुकीचा होता.शेवटी मी डॉक्टर असलो तरी माणूसच आहे व कोणाच्या डोक्यात,मनात काय चालले आहे ते मी ही नाही ओळखू शकत. माणसाचे मन पूर्ण वाचण्याचे तंत्र अजून तरी मेडिकल सायन्सने शोधलेले नाही.

माणसाचे मन हे एखाद्या शांत व तितक्याच गूढ तलावा सारखे असते. तलाव जसा वरून शांत दिसतो पण त्याच्या आत खोलवर अनेक मासे,जीवजंतू विहार करत असतात पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत तसेच माणूस वरून शांत दिसत असला तरी त्याच्या मनात विचारांची अनेक आंदोलने उठत असतात. पण ते आपल्याला नाही कळत. तसेच कायाच्या बाबतीत माझी ही गफलत झाली. काया नॉर्मल वागू लागली म्हणून मी तिला सोडले पण शिवीन तिला दिसायचा बंद झाला त्याचा अर्थ तिने शिवीनने मला फसवले त्याने माझ्याशी प्रेमाचे नाटक करून मला धोका दिला असा काढला. मग पुन्हा ती नवीन भ्रमात नवीन विश्वात जगू लागली.

योग -योगाने म्हणा किंवा शिवीनच्या दुर्दैवाने खरच एक दिवस ती शिवीनच्या संपर्कात आली व पुढचे हे सगळे घडले. काया भ्रमिष्ट आहे पण ती खूप चलाख व हुशार ही आहे. तिला माणसांच्या मनाशी खेळणे चांगले जमते. म्हणूनच तिने तिच्या या खेळात सुधीरला मोहरा बनवून त्याचा वापर केला.

पण याची शिक्षा मात्र निरपराध शिवीनला व रिचाला मिळाली.शिवीन हकनाक या सगळ्यात भरडला गेला.”हे सगळं बोलून डॉ कुलकर्णी यांनी एक मोठा निःश्वास सोडला.

इतका वेळ शांत असलेला सुधीर मात्र आता बोलू लागला.

सुधीर,“हे सगळं खोटं आहे. कायाला वेड ठरवण्याचा हा डाव आहे.( कायाच्या वडीलांना पाहत)अंकल जर यांनी तुमच्यावर दबाव आणला असेल तर तुम्ही घाबरू नका. शिवीन ज्या अवस्थेत आहे ना he deserve that! ”अस तो त्वेषाने बोलत होता.

रिचा मात्र शिवीन विरुद्ध सुधीरचे बोलणे सहन करू शकली नाही.ती जागेवरून उठली व सुधीरची कॉलर पकडून बोलू लागली.

रिचा,“no he doesn’t deserve that.तुझी काया दि वेडी झाली त्याच्यासाठी ! यात त्याचा काहीच दोष नाही समजलं तुला,जर मा‍झ्या शिवीनला काही झालं तर मी तुला आणि तुझ्या त्या कायाला ही सोडणार नाही लक्षात ठेव”ती दात ओठ खात सुधीरच्या कॉलरला धरून हलवत बोलत होती. दोन लेडी कॉस्टबल ने रिचाला धरले व बाजूला केले.

कमिशनर साहेबांनी तिला खुर्चीवर बसवले व पाणी दिले. तिला शांत केले. मग पुन्हा डॉ कुलकर्णी बोलू लागले.

डॉ कुलकर्णी,“ बरं सुधीर आम्ही म्हणतो ते खोट व कायाने तुला जे काही सांगितले ते खरे मानून चालू. काया व शिवीनचे अफेर होते मग तिचा व शिवीनचा एकत्र प्रेमी युगाला सारखा एखादा फोटो तिने तुला कधी दाखवला का?”

सुधीर,“नाही. काया दि दिल्लीत होती हे तिने मला सांगितले पण ती तिथे जॉब करत होती.”

डॉ कुलकर्णी,“कुठे?”

सुधीर,“ दिया फॅशन हाऊस मध्ये”

डॉ कुलकर्णी,“अस कोणता ही फॅशन हाऊस दिल्लीत अस्तित्वात नाही.माझं खोट वाटत असेल तर कमिशनर साहेब त्या संगणकावर सर्च करा दिल्लीतील फॅशन हाऊसची लिस्ट!”

कमिशनर साहेबांनी लगेच सर्च करून पाहीले.दिल्लीतील फॅशन हाऊसच्या लिस्ट मध्ये कुठेच दिया फॅशन हाऊस दिसत नव्हते. ते सुधीरला दाखवले. सुधीर मात्र हे पाहून आवक झाला.

डॉ.कुलकर्णी,“काही आश्चर्य नाही कायाची आणखीन एक कल्पना! बरं सुधीर कायाला शिवीनने प्रपोज तर केलंच असेन ना? मग प्रेमाची आठवण म्हणून एखादी रिंग किंवा गिफ्ट तिला शिवीनने दिलेच असेल ना?कधी तुला कायाने सांगितले किंवा दाखवले आहे ते गिफ्ट किंवा रिंग?”ते शांतपणे सुधीरकडे चौकशी करत होते.

सुधीर,“हो शिवीनने प्रपोज केलेले कायाने सांगितले होते पण रिंग किंवा गिफ्ट त्याने कधी दिले नाही असे कायाला मी विचारल्यावर तिने मला सांगितले.”आता मात्र सुधीर साशंकपणे बोलत होता.

डॉ.कुलकर्णी,“असे असणार कारण कायाची ती कल्पना होती. शिवीन बरोबरची अशा कल्पनांत काल्पनिक व्यक्ती कधीच ऍक्टिव्ह नसते. ती फक्त पॅसिव्हीली आपल्या बरोबर आहे असे रूग्ण इमॅजिन करत असतात तेच कायाने केले.”

सुधीरचा कायावर असलेला दृढ विश्वास आता मात्र डळमळीत होऊ लागला पण त्याचा डॉक्टरवर अजून ही विश्वास बसत नव्हता. म्हणून त्याने अजून एक शंका उपस्थित केली.

सुधीर,“मग कायाला शिवीन भेटायला दिल्लीला जात होता?”तो साशंकपणे म्हणाला आता त्याच्या बोलण्यात तो विश्वास राहिला नव्हता.

डॉ.कुलकर्णी,“ही कायाची फाईल त्यात कायाचे असाईलम मधील फोटो व तिला भेटायला आलेल्या व्हिजिटर्सची लिस्ट ही आहे त्यात शिवीन ठाकूरच नाव आहे का तूच पहा?त्यांनी फाईल सुधीर पुढे ठेवली.

सुधीर,“रेकॉर्ड मॅनेज करणे खूप सोपे आहे”तो फाईलकडे अविश्वासाने पाहत म्हणाला.

रिचा,“एक मिनिट डॉक्टर,काया कॉलेज मधून डिग्री घेऊन बाहेर पडली की लगेच तुमच्या असाईलम मध्ये दाखल झाली ना?”

डॉ.कुलकर्णी,“ हो 2009 मध्ये.”

काया,“मग शिवीन कायाला भेटायला कसा जाणार कारण तो 2009 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट साठी अमेरिकेत होता आणि त्याचे त्याच्या डॅड बरोबर भांडण झाल्या मुळे तो भारतात दोन वर्षे आलाच नाही.मी व आंटी त्याच्या वाढदिवस साजरा करायला दोन वर्षे अमेरिकेत गेलो होतो.” ती बोलली.

सुधीर,“शिवीन भारतात आलाच नाही कशा वरून?”

कमिशनर,“बरं सुधीर तुझा रिचावर विश्वास नाही डॉक्टर कुलकर्णी वर विश्वास नाही पण माझ्यावर तर आहे.आपल्या भारतीय इमिग्रेशन खात्यावर तर विश्वास आहे ना. मी इमिग्रेशनला फोन लावतो व आता लगेच शिवीनच्या २००९ मधील भारतात येण्या-जाण्याचे रेकॉर्ड फॅक्स करून मागवतो.”त्यांनी लगेच इमिग्रेशन ऑफिस मध्ये फोन करून त्याच्या अधिकारांचा वापर करून शिवीनचे २००९ मधील भारतात येण्या-जाण्याचे रेकॉर्ड फॅक्स करवून घेतले.

पाच मिनिटात फॅक्स आला. तो कमिशनरनी स्वतः पाहीला व सुधीरला दाखवला.तर खरंच शिवीन २००९ मध्ये अमेरिकेत गेल्याची नोंद होती व डायरेक्ट२०१२ला भारतात आल्याची नोंद होती. हे पाहून मात्र सुधीर जागीच बसला. इतका वेळ जे काही या सगळ्यांनी काया विषयी सांगितले ते खरे आहे हे सुधीरला कळून चुकले.

सगळे शांत होते.तेव्हढ्यात रिचाचा फोन वाजला. फोन तिच्या वडीलांचा होता.

रिचाचे वडील,“रिचा लवकर हॉस्पिटलमध्ये ये शिवीन...” ते बोलता बोलता थांबले.

रिचा,“ काय झालं डॅड शिवीनला.मी आलेच” अस म्हणून तिने फोन ठेवला.व ती बोलू लागली.

“मला वाटतंय माझं काम झाले आहे. शिवीन निर्दोष आहे हे सिद्ध झालाय मी निघते.”

अस म्हणून रिचा कोणाच्या ही उत्तराची वाट न पाहता गेली ही. सुधीर मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अपराधी भावनेने पाहत तिथेच सुन्न होऊन बसला होता.

काया शिवीनवर एकतर्फी प्रेम करत होती व त्यातच ती मतिभ्रम म्हणजेच हेलुसनेशन सारख्या मानसिक आजाराला बळी पडली होती. तिने केलेले शिवीन वरील सगळे आरोप खोटे निघले.रिचाचा शिवीन वरील विश्वास सार्थ ठरला. पण शिवीन मृत्यूशी झुंज जिंकू शकेल? रिचाच्या वडिलांनी इतक्या तातडीने का बोलावले असेल? शिवीनच्या बाबतीत काही वाईट तर घडले नसेल?शिवीन मृत्यूला हरवू शकेल?

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@आसा,
धन्यवाद
कारण तो कायाचा साथीदार होता आणि पुढे जाऊन तो कायाच्या सांगण्यावरून काही ही करू शकत होता म्हणून काया ही मानसिक रुग्ण आहे हे त्याला पटवून देणे गरजेचे होतआणि ही संस्पेन्स स्टोरी आहे स्टोरी वाचत गेल्यावर होईल की उलगडा सगळ्या गोष्टींचा ते मी आताच सगळं कसं सांगणार ना!

@मनिम्याऊ
धन्यवाद, पुढील भाग लवकरच