कृतज्ञता

Submitted by Happyanand on 1 March, 2020 - 02:27

काळोखाचे भयाण साम्राज्य पसरले होते. दुर कुठे तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता . सगळे शहर झोपेच्या अधीन झाले होते. कुठे गरीब मजुर झोपड्यांमध्ये विसावले होते, कुठे मध्यमवर्गीय चाळी इमारती मध्ये झोपेला साद घालत होते, अतिश्रीमंत लोकांच्या पब मध्ये पार्ट्या चालू होत्या.
शहराच्या पूर्वेला मजुरांची वस्ती होती. त्या कोपऱ्यावरच्या झोपडीत दगडोबा नुसताच पाणी पिवून निजला होता. गेले दोन दिस नुसताच नाक्यावर जात होता पण काम काही मिळत नव्हते . जेमतेम शिकलेला तो घरांना रंगकाम करायचा , पण आता सगळेच यांत्रिकी झाल्यामुळे त्याला आणि त्याच्यासारख्या कित्येक कारागिरांना काम मिळणे बंद झाले होते. तरी तो आपला आला दिवस तसाच ढकलत होता.
पण आज काही त्याला झोप च येत नव्हती. नुसतीच इकेतिकडे तो कुस बदलत होता. पोटात भुकेच डोंब उठले होते. डिसेंबर चा महिना असल्याने थंडी बरीच होती. आतली पोटाची भूक बाहेरची थंडी त्याला कासावीस करत होती.
पूनव जवळ आली होती. बाहेर चांगले चांदणे पडले होते पण लक्ख प्रकशात ही रात्र बरीच भयाण भासत होती.
तो पहाटे पर्यंत असाच कुस बदलत राहिला. बादलीभर पाणी अंगावर ओतुन घेऊन तो तरातरा चालत नाक्यावर चालत गेला... काम मिळण्याच्या आशेनं तो जरा लवकर च आला होता. जरास उजडू लागले होते, शहरातील काही प्रतिष्ठित कामगार वर्ग काही शाळा कॉलेजातील मुले बसेस मधुन जाता येता दिसत होती. त्यांना पाहून त्याला कौतुक वाटत होते. तसा हाताखाली काम करून तो चांगला रंगकाम करायला शिकला होता पण शाळा शिकलो असतो तर जरा हफिसात रुबाबात कामाला गेलो असतो असा विचार काही क्षण त्याच्या मनात येऊन गेला. पण शाळा शिकवायला पैसे होतेच कुठे बापा कडे माय तर लहानपणीच गेली होती. बाप पण चार वर्षांपूर्वी गेला. मरेपर्यंत लग्न कर म्हणून बापाने रट लावली होती पण लग्न करायला पैका तर नव्हताच पण इथे आपलेच खायचे वांधे त्यात एक वाटेकरी या विचाराने त्याने लग्न केले नाही...
आज तरी काही काम मिळुन पोटाची भूक भागेल या आशेने तो आज लवकर आला होता पण आता दहा वाजले तरी काम मिळाले नव्हते.
तसा तो गरीब असला तरी दानत होती त्याच्यात कधी कामाचे पैसे जास्त मिळाले की मजूर लोक व्यासनात दारूत घालवायची पण तो मात्र त्या पैशातून स्वतः साठी थोडे काही बाही खायला घेऊन बाकीच्या पैशातून त्या लहान मुलाच्या अनाथालयात शिधा नेवुन द्यायचा.
पण गेले कित्येक दिवस त्यालाच दोन दिवसा आड काम मिळत होते .. ह्या वेळी तर आठवडा झाला तरी त्याला काम मिळाले नव्हते उरले सुरले होते त्यात दोन तीन दिवस घालवले होते पण आता मात्र पोटाला अन्नाचा कण नव्हता.
एव्हाना 12 वाजत आले होते नाक्यावरली गर्दी ओसरली होती.
तो तसाच आपला निराश होवुन घराकडे निघाला . वस्ती कडे वळण्याआधी एक दत्त मंदिर होते आज दत्त जयंती मुले तिथे भला मोठा कार्यक्रम होता. जेवणाच्या पंगती उठत होत्या. भुकेने व्याकुळ तो तिथे जावून बसला. भात, बुंदी , शाक भाजी पुरी तो गपा गपा खात होता दोन दिवसाची भुक आता कुठे तृप्त झाली होती. जेवून हाथ धुवायला उठला तितक्यात त्याला पाठीवर हाथ जाणवला. मागे कधी काम केलेला एक माणूस होता तो त्याने त्याला गावाकडचे घर रंगवयच काम दिले आणि अडवान्स म्हणुन २००० रुपये बी दिले. पत्ता सांगुन दोन दिवसांनी यायला सांगितले.
कधीच देवळात न गेलेला तो आज मात्र त्या दत्ता च्या मूर्ती पुढे उभा होता.
प्रत्येक जण देवाला भजत होता, कुणी काही देवुन काही मागत होता.
पण देवावर विश्वास नसून आज तो मात्र हाथ जोडुन कृतज्ञता व्यक्त करत होता....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!

सुपर्ब !! मन चंगा तो पडोसमें गंगा ! दगडोबाने अनाथ मुलांना केलेली मदत देवाने मान्य केलीय. एक हाथसे दे दो और दुसरे हाथसे ले लो. मला अशा पॉझीटिव्ह कथा प्रचंड आवडतात.