अरबाज खान फॅन क्लब

Submitted by कटप्पा on 20 February, 2020 - 13:54

अरबाज खान च्या अभिनयावर आणि त्याच्या चित्रपटांवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
तुम्हाला अरबाज का आवडतो , नक्की कोणत्या चित्रपटापासून तुम्ही फॅन झालात वगैरे वगैरे...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डियर जिंदगी धाग्यावर उल्लेख झाला म्हणून इथेही टाकतोय प्रतिसाद .
अरबाज आवडण्याचे आणखी एक कारण - दुय्यम भूमिकेत असतो पण समोरच्याला पूर्ण फुटेज देतो .
त्याच्या स्टारडम चा समोरच्याला त्रास होणार नाही याची तो संपूर्ण खबरदारी घेतो .

अरबाज आवडण्याचे आणखी एक कारण - दुय्यम भूमिकेत असतो पण समोरच्याला पूर्ण फुटेज देतो .
त्याच्या स्टारडम चा समोरच्याला त्रास होणार नाही याची तो संपूर्ण खबरदारी घेतो
>>> लोलच ..

मागच्याच आठवड्यात लेकीला अरबाझ खानचा प्यार किया तो डरना क्या पिक्चर दाखवला. त्यात त्याचा भाऊ सलमान सुद्धा होता.

फॅशन मुव्हीत त्याला चांगला रोल होता... सोबत एक इंटिमेट गाणं पण होतं. अभिनय न का येइना पण ज्या रोल मधे असतो तो खपून जातो.

याचा एक पिक्चर मी संपूर्ण पाहिला आहे,भुताचा आहे म्हणून(हिरोईन भूत असते,अरबाजला म्हणत नाहीये ),स्टोरी बकवासच होती पण मला कुठले पण भुताचे पिक्चर
चालतात बघायला म्हणून हा पण चाललेला,
सुना सुना लमहा लमहा असं एकच छान गाणं होत तेवढं आवडलं होतं

अजून एक आर्यन नावाचा पण पिक्चर होता त्याचा की त्याच्या ग्रुप च नाव आर्यन होतं ते नक्की आठवत नै तो नाही बघितला पण त्यातलं पण एक गाणं चांगलं होतं
हिरोईन स्टेज वर annual day साठी म्हणत असते

सूना सूना.. बेपनाह प्यार है आजा.. श्रेया घोषाल.. कृष्णा कॉटेज.. एकेकाळ रिपीट मोडवर ऐकायचो हे.. मस्त गाणे.

@ आर्यन - या पिक्चरमध्ये सोहेल खान होता ना? अरबाझ सुद्धा होता का?
अजून एक सोहेल खानचा मैने दिल तुझ को दिया (बहुतेक) या नावाचा पिक्चर होता. त्यात त्याच्या ग्रूपचे नाव आर्यन्स होते. संजय दत्त होता त्यात.

कृष्णा कॉटेज व आर्यन दोन्ही मध्ये सोहेल खान होता.

आर्यन मधले गाणे म्हणजे "थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी". संगीतकार : डब्बू मलिक ( हा अन्नुचा भाऊ व अरमान मलिकचा बाप).

आर्यन मधले गाणे म्हणजे "थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी".
>>>>

हे गाणे मैने दिल तुझको दिया मध्ये आहे. आर्यन हे त्यांच्या ग्रूपचे नाव होते. आर्यन चित्रपट वेगळा. त्यात ती स्नेहा उल्लाल आहे. तो पाहिला नाही मी. डुप्लिकेट ऐश्वर्या या एवढ्या भांडवलावस असलेल्या हिरोईनला बघावेसेच वाटत नाही.

पण हे गाणे मस्त आहे. हल्ली अशी मेलोडीयस गाणी अभावानेच बनतात

कृष्णा कॉटेज आणि आर्यन्स, दोन्ही सिनेमात सोहेल खान होता, अरबाझ नाही.>>>> Happy अरेच्चा, हे तर नवीनच समजले

अरबाझचा दरार नाही पाहीला का? अग्नीसाक्षी सारखी इस्टोरी. जुही, ऋषी आणी अरबाझ ( नानाच्या भूमीकेत_) गाणी छान होती दरारची.

https://www.youtube.com/watch?v=eie3_rfg33I

सलमान पेक्षा मी अरबाझला १० पटीने पसंती देईन.

सलमान पेक्षा मी अरबाझला १० पटीने पसंती देईन.
>>>
मी सुद्धा. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र आलेत, प्यार किया तो डरना क्या किंवा हेल्लो बरदर्स वगैरे तेव्हा तेव्हा अरबाझसमोर सलमान पाणीकम वाटत आला आहे.
पण दुर्दैवाने पैसे मात्र सलमान १०० पटींनी कमावतो. बिचारा अरबाझ चेहर्‍यात मार खातो.

आर्यन होतं ते नक्की आठवत नै तो नाही बघितला पण त्यातलं पण एक गाणं चांगलं होतं
हिरोईन स्टेज वर annual day साठी म्हणत असते

>>>>
सजन घर आना था, सजन घर आये है, पिया मन भाना था , पिया मन भाये है, हर खुशी है अब तुम्हारी, मुझे दे दो गम. जानेमन.

हे गाणं का?

हो ना.भारतात असा चेहरा हिरो म्हणून नाही चालत. रॉजर फेडररवरच बायोपिकचर काढला असता तर हिरो म्हणून चमकला असता

नुसते अरबाजसारखे लूक असल्याने कोणी अरबाझ होत नाही. कॅमेर्‍यासमोर आल्यास फाफलेल फेडररची. प्यार किया तो डरना क्या मध्ये तो अरबाझ एकटाच सलमान आणि त्याच्या मित्रांना लोळवतो. भाईंना वनसाईड धोपटणे हे विश्वसनीय वाटायला तसेच तगडे व्यक्तीमत्व हवे. आणि हो, अरबाझ त्याचा छोटा भाऊ आहे. तरीही त्या पिक्चरमध्ये सलमान त्याला बडे भैय्या बोलताना दाखवलेय यातच आले.

सलमान त्याला बडे भैय्या बोलताना दाखवलेय यातच आले.>>>>>सलमान स्वतःला अजूनही बालवाडीतलाच समजतो.

सलमान स्वतःला अजूनही बालवाडीतलाच समजतो. >>> बालवाडीतला तो कधीच नव्हता. आजही मी आजूबाजूला कित्येक मुलेमुली पाहतो जे त्याच्यावरून जीव ओवाळून टाकतात. हा माणूस कधी म्हातारा होणारच नाही.

आमच्यासारखे पावणेसहा फूटाच्या आत असलेले लोकंही कमालीचे हँडसम दिसू शकतात हा आत्मविश्वास त्याने आम्हाला दिला.

नाही जाई ते गाणं नाही
आर्यन मधले गाणे म्हणजे "थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी".हो हो हेच ते गाणे
Happy

ए काहीही बोलु नको, तो शॉलिड्ड म्हातारा दिसतो. ए के हनगल पण तरुण दिसले असते एवढा म्हातारा दिसतो. चिरतरुण अमिताभ आहे रे, सल्ल्या नाही.

अमिताभ कुठून आला मध्येच? एकाचे कौतुक करताना दुसर्‍याशी तुलना करायलाच हवी का?
अमिताभने ५०-५५ वयाच्या आसपास मृत्युदाता, इन्सानियत असे चित्रपट केलेले. तर बडे मिया छोटे मिया मध्ये गोविंदाच्या जीवावर तगलेला.
त्यामुळे त्याने सरळ आता आपले वय झाले म्हणत सेकंड इनिंग सुरू केली.
तेच सलमान ५०-५५ वयातही सोलो हिरो म्हणून २००-३०० करोडचे पिक्चर देतो.
हे अमिताभचे नाव घेतले म्हणून अन्यथा तुलना करायची गरज मला भासत नाही. सलमान आजही छावाच आहे.

Pages