अरबाज खान फॅन क्लब

Submitted by कटप्पा on 20 February, 2020 - 13:54

अरबाज खान च्या अभिनयावर आणि त्याच्या चित्रपटांवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
तुम्हाला अरबाज का आवडतो , नक्की कोणत्या चित्रपटापासून तुम्ही फॅन झालात वगैरे वगैरे...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Well played ऋन्मेष भाऊ! तुमच्याशी वाद घालायला मजा येते खरी..

धन्यवाद अजिंक्यराव,
पण मी हे काही मुद्याला मुद्दा म्हणून लिहिले नसून तसे मी आधीपासूनच समजतो. माझ्या मायबोलीवरील स्वत:बद्दलच्या माहिती रकान्यातही हे लिहिले आहे की मी स्वतःला गरीबांचा शाहरूख खान आणि मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी समजतो Happy
जिथे कुठे मी ॲक्टीव्ह असतो तिथे शाहरूख खान असल्याच्या थाटातच वावरतो. कारण मला या सुपर्रस्टार लोकांचा जगण्याचा एक ॲटीट्यूड आवडतो, की जगभरातले लोकं आपल्याबद्दल काय बोलतात याचा ते फार विचार करत नाहीत. जेव्हा करतात तेव्हा सुपर्रस्टार राहात नाहीत Happy

मुळ प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. हा अरबाज खान कोण ? कोणीतरी त्याचा फोटो डकवा इथे म्हणजे हा कोण महाभाग आहे ते तरी कळेल.

malaika_arbaaz_0.jpeg

अरे ये अरबाज को नही जानते ! वल्ला ! वल्ला ! ये वही अरबाज है, जो दबंग सल्लु के भाई है, मलाईका के एक्स पती है, सलिम खान के बेटे है, किसी जमानेके हिरो है !

ललित प्रभाकर या अत्यंत गोड आणि हुशार अभिनेत्याला, शिव ठाकुर ह्याच्या रांगेत नेउन बसवल्याबद्द्ल तीव्र निषेध .
अरबाज सलमान खानला लकी आहे, तर तो दुसरा भाउ नाव नाही आठवत अनलकी . त्या दुसर्‍या बरोबर सगळे सिनेमे डुबलेत त्याचे.

शक्य नाही... दारूचा धागा नसता काढला त्याने...
>>>>>

धन्यवाद या विश्वासाबद्दल.
आपली ही कॉमेण्ट बायकोला दाखवतो.
पुढच्यावेळी वडाला चवदा फेरया मारेल ती..

आता माझा नंबर,
बोकलत = ऋ?

शक्य नाही... दारूचा धागा नसता काढला त्याने...

Submitted by च्रप्स on 24 February, 2020 - 18:59
>>>>
त्याला काहीही शक्य आहे. लोकांना कामाला लावण्यात आणि मजा बघण्यात पटाईत आहे तो.

मला वेळ मिळाला की एक धागा काढून माझे डुआयडी डिक्लेअर करतो. तेवढ्यासाठी उगाच फॅमिलीस्टार अर्रबाझ खानचा धागा भरकटवू नका. त्यापेक्षा माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. कुठल्या चित्रपटात शाहरूख खान आणि अरबाझ खान या दोघांनी काम केले आहे?

स्वप्निल जोशी म्हणजे....झपाटलेला बाहुला (लक्ष्याच्या पिक्चर मधला) ओम फट स्वाहा का काय ते वाला.

अनिश्का अधेना कर्रेक्ट !
ॲक्चुअली मला वाटलेले काल चित्रपटात अरबज खान होता. त्यानुसार पोस्ट टाकली. मग चेक केले तर विवेक ओबेरॉय जॉन देवगण वगैरे मंडळी होती. मग शोधूया म्हटले आता काहीतरी.. तर तुम्हीच ते शोधले. धन्यवाद Happy

अरबाझ खान फॅन क्लब वर जेम्तेम एक फोटो अजबाझ चा बाकि जास्त चर्चा स्वप्नील जोशीची!! वाह रे ऋन्मेऽऽष.. मानला तुला!

आणि स्वप्नील जोशी बद्दल बोलायचं तर तो भरताच्या वांग्यासारखा दिसतो.. खाली जाड आणि वर निमुळता ;). आणि ओव्हर अ‍ॅक्टींग प्रचंड करतो त्यामुळे कधीच आवडला नाही.

धन्यवाद चौकट राजा.

स्वप्निलच्या दिसण्यावर नो कॉमेंटस! प्रत्येकाचे सौण्दर्याचे निकष वेगळे असतात. म्हणून सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली तर ऐश्वर्या राय जेमतेम मिस वर्ल्ड झाली.

अभिनयाचे म्हणाल तर स्वप्निल-शहारुख यांच्या अभिनयाला ठराविक चौकटीतले मापदंड लाऊन तोलू नका. त्यांची स्टाईल त्यांचा अभिनय आहे. ज्यांना ती स्टाईल आवडत नाही अश्या मूठभर लोकांना ती ओवरॲक्टींग वाटणे स्वभाविक आहे. पण परातभर लोकं त्यांच्या याच अदाकारीचे चाहते आहेत हे मी कोणाला विसरू देणार नाही Happy

कुठे गेले सगळे अरबाज चे फॅन्स . एव्हाना त्याच्या हेअर कट च्या अपडेट वर वाचकांच्या उड्या पडायला पाहिजे होत्या .

Pages