प्रेमाचा उत्सव

Submitted by Asu on 14 February, 2020 - 03:03

प्रेमाचा उत्सव
(व्हॅलेंटाईन डे)

प्रेम-उत्सव आज सजला
धरती म्हणाली सूर्याला
जगी द्वेषाचा अंधार विसरू
चल, प्रेमाचा प्रकाश पसरू

गुलाब सुंदर फुलले किती
प्रीतीचा धुंद गंध पसरती
काटे क्षणभर आपण विसरू
चल, प्रेमाचा प्रकाश पसरू

निर्झर निर्मळ गाणे गाती
प्रेमाचा खळखळ संदेश देती
पाषाणांचा या विरोध विसरू
चल, प्रेमाचा प्रकाश पसरू

रात्र येऊ दे, कशास भिती
दिवस जगणे आपुल्या हाती
अटळ जे ते आपण विसरू
चल, प्रेमाचा प्रकाश पसरू

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.14.02.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults