प्रगती म्हणजे नक्की काय?

Submitted by जाईजुई on 21 April, 2009 - 11:02

मला नेहमीच हा प्रश्ण पडत आलाय की प्रगती म्हणजे नक्की काय?

आपला देश विशाल आहे, वेगवेगळे जनसमूह येथे प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. आपल्या देशातील साधनसंपत्ती क्षणाक्षणाला संपते आहे. प्रदुषण भयंकर वाढते आहे.

अशावेळी खेड्यापाड्यात मोठमोठाले (प्रदुषण पसरवणारे) उद्योग सुरु करणे आवश्यक आहे का? आदीवासींना संगणकाचे ज्ञान देणे आवश्यक आहे का? एकादा आदिवासी, भटक्या विमुक्त जमातीतली व्यक्ती डॉक्टर होते, तिची प्रगती होते, पण ती व्यक्ती पुन्हा परत आपल्या मूळांकडे जाते का? शहरातली मूले पर्यावरणशास्त्र, शेतकी वै. विषयात जाणीवपूर्वक प्राविण्य संपादन करुन खेड्यांकडे वळतात का?

आपल्या प्रगतीच्या प्रयत्नातून निसर्गाचे संतुलन आपण बिघडवत आहोत. आणि हे केवळ भारतासाठी मर्यादित नाहिये.

मला वाटते की लोकांचा ओघ दुर्गम प्रदेशातून शहरांकडे वळवण्यापेक्षा, शहरातल्या लोकांना खेड्याकडे वळवले पाहिजे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्ण, आरोग्याचे प्रश्ण, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे, त्यासाठी आवश्यक संशोधन करणे म्हणजे प्रगती.

तुम्हाला काय वाटते? आपण योग्य मार्गावर आहोत?

उत्तर देण्यापूर्वी हे जरुर पहा -
http://www.youtube.com/watch?v=TQmz6Rbpnu0&feature=related

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<ओघ दुर्गम प्रदेशातून शहरांकडे वळवण्यापेक्षा, शहरातल्या लोकांना खेड्याकडे वळवले पाहिज<<>>
हे बरोबर आहे. <<पिण्याच्या पाण्याचे प्रश्ण, आरोग्याचे प्रश्ण>> हे शहरात जास्त कारण तिथेच प्रदूषण जास्त, नि लोकसंख्या कमालीच्या बाहेर जास्त. ते लोक शहरात उपजीविकेसाठी येतात, कारण त्यांना इतरत्र कामे मिळत नाहीत, कारण शहरापासून दूर जर कामाचे ठिकाण हलवले तर तिथे जाणे येणे कठीण. रस्ते होताहेत पण कमी रस्ते असल्याने गर्दी जास्त. जर कामाची ठिकाणेच उचलून दूर खेड्यापाड्यात नेली तर लोकांना शहरात यावे लागणार नाही. पण सध्याची शहरातली आम जनता तिथे जाणार कशी? अमेरिकेतल्यासारखे सर्वांच्या जवळ मोटरी नाहीत की तसे रस्तेहि नाहीत.

तर माझ्या मते जसे अमेरिकेने 'चार वर्षात ४१००० मैल लांबीचे रस्ते बांधले' (असे म्हणतात) तसे भारताने बांधले तर कामाची ठिकाणे खेड्यापाड्यात नेता येतील, लोकांना शहरात जावे लागणार नाही, तेहि खेड्यात वस्ति करून राहू शकतील प्रथम शहरातील प्रदूषण इ. प्रश्न सुटतील. खेड्यांचा विकास करताना आधीच पर्यावरणाचा विचार केला तर तिथेहि लोकसंख्या वाढली तरी प्रश्न वाढणार नाहीत.

तसेच प्रदूषण कमी करणे, आरोग्य संवर्धन या साठी भारतात संशोधन होणे आवश्यक आहे. सगळे आपले उठून पाश्चात्य देशात जातात, शोध लावतात, सुधारणा करतात, मग त्यांना भारतातच हे का करता येत नाही? १.५ मिलियन डॉ. देऊन कुणा ऑस्ट्र्लियम किंवा इंग्लिश क्रिकेट खेळाडूला आणण्यापेक्षा ते पैसे कुणा संशोधन संस्थेला दिले तर? कोण सांगणार पैसेवाल्यांना? किती पैसे कुठे खर्च करावेत? सगळीकडे फक्त स्वार्थ बघायचा ही वृत्ति कमी झाली पाहिजे. इथे मी आवर्जून लिहू इच्छितो की भारतात तसे अजूनहि अनेक लोक आहेत, श्री. बाबा आमटे, डॉ. बंग जे नि:स्वार्थपणे लोकसेवा करतात, पण संशोधनाच्या बाबतीत काही ऐकू येत नाही.
भारतात तसे होत नाही. अमेरिकेतहि आजकाल तसे होत नाही, पण अगदी अलिकडे अलिकडे पर्यंत त्यांना देशाची जास्त काळजी होती. अजूनहि कुणि इथे पैसे कमी पडतात म्हणून उठून चीन, भारत, अफ्रिका येथे जात नाहीत, इथे बसूनच काही काही करतात. स्वतःला अक्कल कमी पडली तर इतर देशातून पैसे देऊन लोक आणतात! आपण फक्त क्रिकेटर्स नि चीअर्लीडर्स वर नि बॉलिवूडवर पैसे खर्च करतो!! ते आधी कमी झाले पाहिजे.

पण खेड्यांमध्ये नैसर्गिक उद्योग सुरु नाही का करु शकणार आपण? शेतीवाडीवर नाही का काही करता येणार? सगळ्यांनीच औद्योगिकरणात सहभागी व्हायलाच हव का?

पैसे फुकट घालवण्याबद्दल अगदी मान्य! पण किती आमटे आणि बंग आपण घडवू शकलोय आतापर्यंत?

खेड्यांची प्रगती व्हायला पाहीजे हे बरोबर. गांधीजीपण हेच म्हणाले होते (५० वर्षांपूर्वी). पण तसे नेतॄत्व मिळत नाही. शहरापेक्षा घाणेरड राजकारण तर खेड्यात चालत. आपल्या राजकारण्यांना खेड्याचा विचार असता तर २०-२० तास तिथली वीज घालवली नसती. त्याआधी शहरातील जाहीरात फलक, नीऑन साईनस् ही बंद केली असती.

>>१.५ मिलियन डॉ. देऊन कुणा ऑस्ट्र्लियम किंवा इंग्लिश क्रिकेट खेळाडूला आणण्यापेक्षा ते पैसे कुणा संशोधन संस्थेला दिले तर...
हा जरा उगाचच 'डायलॉग' वाटतोय... येवढे पैशे त्यांना दिले म्हणजे त्याहुन जास्त आपल्या लोकांनी कमवले असणार! लोकं असही म्हणतात की, "ISROनी येवढा खर्च करुन चंद्रावर यान पाठवायची काय गरज होती, तो पैसा गरीबांसाठी वापरायचा" ... याला तुम्ही काय म्हणाल?

वॉव.
--

पण खेड्यांमध्ये नैसर्गिक उद्योग सुरु नाही का करु शकणार आपण? शेतीवाडीवर नाही का काही करता येणार? सगळ्यांनीच औद्योगिकरणात सहभागी व्हायलाच हव का? >>>>

कारण आपला टॉप डाउन अ‍ॅप्रोच आहे म्हणून. 'बॉटम अप' असताना अनेक आक्रमणांनंतरही भारत स्वयंपूर्ण होता हे सत्य आहे. आणि त्या 'बॉटम अप' आपल्या जातीव्यवस्थेने खूप महत्वाचे कार्य केले होते.

सध्या जात बंदी तर झाली आहे, पण त्या सर्व व्यवसायांची वाट लागली, चांभार, चांभारकी सोडून, शहरात राहण्यासाठी आले व रोजगार म्हणून दगड फोडायच्या कामावर लागले. बांधकाम करु लागले. इ इ. पण तेच जर आहे तो व्यवसाय निट केला असता, वा दुसर्‍या लोकांनी नंतर सुधारीत चांभारकी केली असती तर चित्र बदलले असते पण आपले सर्व काम हे जातीनिहाय आधारीत असल्यामुळे ब्राम्हणाला चांभार, माळी व्हावे वाटले आले नाही, पण माळ्याला ब्राम्हण व्हावे वाटले, आपल्या स्वतःच्या उद्योगाला जातीव्यवस्थेत कमी स्थान असल्यामुळे, तो त्या कामात- उद्योगात कमीपणा मानु लागला. त्यातून असमतोल निर्माण झाला व खेड्यातील अर्थव्यवस्था बिघडली. लोक शहराकडे धावू लागले. भारतच खेंड्याचा समूह असल्यामुळे अर्थव्यवस्थाच कोलमडली. त्यातून पहिल्या ५० वर्षात आपण मोठे उद्योगधंदे स्थापणच केले नाहीत. अपवादाला मोजून ५० त्याकाळात स्थापण कंपन्या असतील, पण लोकसंख्या किती आणि उद्योग किती असे चित्र २००० पर्यंत होते, अजुनही आहेच.

आता खेडे स्वंयपूर्ण करु शकत नाही ही स्तिथी आहे. त्यामुळे औद्योगीकरनाला पर्याय नाही. पण ते खेड्यांचा हिताचे झाले, जसे मास अ‍ॅग्रीकल्चर, शेतीमालावरचे प्रक्रिया उद्योग, अजुन बरेच काही हे जर खेड्यात, किंवा तालुक्याचा जागी सुरु झाले तर असमतोल कमी होइल. ह्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, नाही असे नाही, जसे DIC, MIDC वगैरे. कारणे काही असोत पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही हेच सत्य आहे.

तुझा प्रश्न इतका मोठा आहे की निव्वळ चार ओळी खरडुन संपवता येणार नाही. Happy

( ह्यावरुन मी जातीयवादी आहे असा निष्कर्ष काढला तर आपले हार्दिक अभिनंदन.)

<<पण खेड्यांमध्ये नैसर्गिक उद्योग सुरु नाही का करु शकणार आपण? शेतीवाडीवर नाही का काही करता येणार?>>
त्यालाहि पैसे लागतात. ते कोण घालणार?
<<हा जरा उगाचच 'डायलॉग' वाटतोय... येवढे पैशे त्यांना दिले म्हणजे त्याहुन जास्त आपल्या लोकांनी कमवले असणार! लोकं असही म्हणतात की, "ISROनी येवढा खर्च करुन चंद्रावर यान पाठवायची काय गरज होती, तो पैसा गरीबांसाठी वापरायचा" ... याला तुम्ही काय म्हणाल?>>
अर्थातच जास्त कमावले आहेत, ते गेले कुठे? नि इस्रो नि सुद्धा खर्च केला तो पैसे होते म्हणूनच ना? इस्रो च्या खर्चातून काही वैज्ञानिक प्रगति होऊ शकते, क्रिकेट खेळून काय मिळते? नि त्याची संशोधनाशी कशी तुलना करता?

खरे तर पूर्वी एका खेड्यात बारा बलुतेदार असत. खेड्याला जे काही लागेल, अन्न, वस्त्र, शेतीची साधने, दागिने, करमणूक इ. सर्व कामे खेड्यातल्याच लोकांकडून पूर्ण होत असत. अगदी एका खेड्यात कशाची कमी पडली तर दुसर्‍या खेड्याकडे बघायची वेळ होती. पण हे सगळे कसे बदलले, शहरे का झाली, जातींमधे उच्च नीच भाव का आला, माहित नाही, पण तेंव्हापासूनच अधोगतीला सुरुवात झाली.

चांभार, चांभारकी सोडून, शहरात राहण्यासाठी आले व रोजगार म्हणून दगड फोडायच्या कामावर लागले. बांधकाम करु लागले. इ इ. पण तेच जर आहे तो व्यवसाय निट केला असता, वा दुसर्‍या लोकांनी नंतर सुधारीत चांभारकी केली असती तर चित्र बदलले असते >> कदाचित कामाचा योग्य मोबदला मिळाला असता तर काही लोकांनी केलेही असते तसे. मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेले/अनुभवलेले नाही पण अवचटांच्या एका पुस्तकात बलुतेदारीचे विदारक दृश्य अजुन चालु असल्याचे दिसते. त्यांनी त्या पुस्तकात बलुतेदारी बंद होऊनही अजुनही समाजातील काही घटकांची तथाकथित उच्चवर्णियांकडुन पिळवणुक चालु ठेवल्याचे दृश्य दिसते. ते पुस्तक तसे १०-२० वर्षं जुने असेल पण त्या परिस्थितीत खुप फरक पडला असेल असे वाटत नाही. चुभुद्याघ्या.

<<पण तेच जर आहे तो व्यवसाय निट केला असता, वा दुसर्‍या लोकांनी नंतर सुधारीत चांभारकी केली असती तर चित्र बदलले असते >>

अनुमोदन. जेंव्हा मनुष्य आहे ते अधिक चांगले कसे करता येईल, याचा विचार करतो, तेंव्हा सर्वांचाच फायदा होतो. दुर्दैवाने आपल्याकडे असे कधी कुणि केल्याचे ऐकिवात नाही. आजकाल जरा जरा प्रगति होऊ लागली आहे असे म्हणतात, पण फार तुरळक. त्या सुधारणा सर्वव्यापी होऊन सर्वांचे जीवन सुधारायला अनेक वर्षे लागतील नि पाश्चात्यांकडून आपल्याला त्या कदाचित् आधीच मिळतील, मग आपण का कष्ट करा?

पण चांभारकीत सुधारणा या पेक्षा <<घटकांची तथाकथित उच्चवर्णियांकडुन पिळवणुक चालु ठेवल्याच<<>> या गोष्टी कशा सुधारतील? लोकांमधे देशभक्ति, देशासाठी काही करावे या भावना कश्या जागवाव्या? अमेरिकेने तर सगळ्या जगाकडून सगळे काही चोरले, विकत घेतले नि ते समर्थ देश होऊन बसले. त्यासाठी देशभक्ति, देशाचा विचार लागतो, स्वार्थ जरा कमी करावा लागतो, क्रिकेट, बॉलिवूड किती महत्वाचे नि इतर काय करणे महत्वाचे हे समजले पाहिजे.

हो नात्या, तुझे बरोबर आहे. बहुतांश राज्यात अशी पिळवनूक आजही आहे. पण ती आधीपासूनच होती असे मला वाटत नाही. कारण बलुतेदारी पद्धत आपल्याकडे भारत जन्माला आला तेंव्हापासून चालली, विदाउट फेल. परकिय आक्रमनं आली पण नंतर त्या परकियांनी येथलीच पद्धत स्विकारली. मोगलांनी, लोदीने आपलीच पद्धत स्विकारली. इंग्रज सोडुन, व त्यांचापासूनच स्वंयपूर्ण खेडी नाहीशी व्हायला सुरुवात झाली.

मग पिळवनूक आधीपासून असली असती तर २००० वर्षे चालली नसती. आता लोक म्हणत आहेत की आमची पिळवनूक २-३००० वर्षांपासून होत आहे, पण त्यात तथ्य नाही. हे गेल्या २-३०० वर्षांपासून चालू आहे. ते बंद व्हायलाच हवे ह्यात दुमत नाहीच.

कामाचा योग्य मोबदला ही स्थलकालसापेक्ष आहे हे ही विसरुन चालणार नाही. पिळवनूक चालू राहीली, ठेवल्या गेली, दुय्यम दर्जा हे खरे तर नको. पण दुर्दैवाने हे कुठल्याही समाजव्यवस्थेत आहे. अगदी अमेरिकन पद्धतीत पण. साम्यवादी, भांडवलशाही ह्या पद्धतीचेही तोटे आहेतच. व ते दिसून येत आहेत.

मध्ये पंचायत राज ही संकल्पणा परत आली होती. तिचे आताचे स्वरुप आपण पाहतच आहोत. काहीतरी आमुलाग्र बद्ल भारतात आणायला हवेत.

जुईच्या प्यारा परत वाचल्यावर असे दिसते की तिला फक्त भारताविषयी बोलायचे न्हवते, तर एकुनच जगाविषयी. आणि त्यासंदर्भात एक मुद्दा असा की अमेरिकेत खेडी स्वंयपूर्ण आहेत तरीही प्रॉब्लेम आहेच. Happy

जाजु, अशा विषयावर बीबी काढल्याबद्दल धन्यवाद....

>> त्यासाठी देशभक्ति, देशाचा विचार लागतो, स्वार्थ जरा कमी करावा लागतो, क्रिकेट, बॉलिवूड किती महत्वाचे नि इतर काय करणे महत्वाचे हे समजले पाहिजे>>>>
झक्की, अनुमोदन...

सगळीकडे स्वार्थ बोकाळल्याने प्रगतीपेक्षा अधोगती होत आहे आणि लोकाना वाटतय आपण प्रगती करतोय!
काही ठराविक लोकांचे प्रमाण सोडले तर बाकिच्याना आपण समाजाचे / देशाचे काही देणं लागतो, हेच पटत नाही.
बारा बलुतेदारांनी समृद्ध असलेली खेडी आता अस्तित्वासाठी झगडत आहेत. सावकार, शेत मालाचे दलाल, लोभी व्यापारी यांनी त्यांचे जीवन पिळवटून टाकले आहे.
पूर्वी एका गावाला काही कमी पडले, अस्मानी संकट आले तर राजा (सध्याचे राजकारणी/नेते/प्रशासन) प्रजेच्या रक्षणासाठी धन्-धान्य पुरवायचा, अस्मानी संकट आले नी धान्य नसेल तर व्याप्यारांनी भाव वाढवून जनतेला लुबाडूनये म्हणून स्वतःची कोठारे खाली करायचा, व्याप्यार्‍यांवर अंकूश ठेवायचा... सध्याचे राजकारणी/नेते/प्रशासन याउलट व्यापार्‍यांचे नी त्यातून स्वतःचे हीत साधताना दिसत आहेत.

आता खेडोपाडी लोकशिक्षण देऊन शेतीचे उत्पन्न कसे जास्तीत जास्त वाढवता येईल हे पहाणे गरजेचे आहे...इस्त्राईल सारखा छोटा देश जर इतके उत्पन्न घेऊ शकतो तर आपण का नाही?
हे राजकारणी जी परदेशवारी करतात ती काय पब मध्ये जाऊन पोरींवर पैसे उधळायला का? तो पण जनतेचा!!!

परदेशवारी करून इथे येताना काहीतरी ज्ञान आणा म्हणाव...

>> शहरापेक्षा घाणेरड राजकारण तर खेड्यात चालत
अनुमोदन... मला आठवत, थोड्या दिवसापूर्वीच एका खेड्यावर बातमी आली होती, वीज निर्मितीसाठी... तिथल्या निरक्षर स्थानिक लोकाना सरपंचाने हे सांगून विरोध करायला लावला की, जर वीजेसाठी पाणी वापरले तर त्या पाण्यातली सगळी पॉवर निघून जाऊन ते पाणी शेतीसाठी निरुपयोगी होईल...

>>१.५ मिलियन डॉ. देऊन कुणा ऑस्ट्र्लियम किंवा इंग्लिश क्रिकेट खेळाडूला आणण्यापेक्षा ते पैसे कुणा संशोधन संस्थेला दिले तर >>
किती बरे झाले असते... हे लोक स्वतः पैसे मिळवणार, त्यातून व्यापार करणार, हजरो लोकांचा वेळ सामने बघण्यात खर्ची घालणार, आणि त्यामुळे एकंदर कामाची क्षमता कमी होणार...
हे लोक जे सामन्यासाठी संरक्षण मागतात ते आपले सरकार फुकट कशाला पुरवते..पोलिस फाल्तू गोष्टीसाठी तैनात... त्यापेक्षा या धनदांडग्यांकडून सामना संरक्षणासाठी घ्या ना पैसे नी ते वापरा चांगल्या कामाला...

वरील चर्चा मला बरोबर समजली असेल तर माझे मत आहे की प्रश्न फक्त दुय्यम दर्जाचा नाहीये.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल होत की 'जगामधे कुठल्याही समाजात मजले असण स्वाभाविक आहे.पण भारतात पायर्‍याच नाहीत.फक्त जन्मावरुनच तुमचा मजला ठरतो.' जन्मावर आधारीत व्यवसाय पध्दत चुक आहे.त्याचबरोबर एखाद्या व्यवसायाला कनिष्ठ ,निकृष्ठ समजणही चुक आहे. तिच्यामुळे खेड्यातल्या लोकांना दुय्यम वागणुक मिळत होती.त्यामुळे त्यांनी खेडी सोडुन शहरांचा रस्ता धरला.आता प्रश्न सोडवायचा असेल तर लोकांची उच्चनीचतेची भावना बदलण अत्यावश्यक आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

इथे नुसत्या जातीव्यवस्थेचा प्रश्ण नाहिये मला अभिप्रेत.

गावातला महार पुण्यात येऊन झाडूच मारणार असेल तर काय प्रगती झाली? वीज उद्योग कोकणात नेले तेंव्हा "इको सिस्टीम" संतुलीत ठेवण्यासाठी काय नियोजन केलं?

आपण खेडोपाडी वीज पोहोचवायची म्हणून झटतो, पण शहारांमध्ये, खेड्यांमध्ये ती वाचवायला शिकवतो का?

इस्त्राईलचे उदाहरण योग्य आहे! असे प्रयत्न आपण करतो का?

खरतरं प्रगती म्हणजे काय??
जैविक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, सांपत्तिक, मानसिक??
प्रत्येकाला अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा असणे साहजिक आहे पण आहोत त्यापेक्षा चांगले असणे म्हणजे प्रगती का?? की अमुक एका बाबतीत अमक्यासारखे असणे म्हणजे प्रगती? पण मग त्या तमक्याचे स्वतःची काय नी किती लागलीय ते माहीत नसणे का?

am I so abstract?

<<तिथल्या निरक्षर स्थानिक लोकाना सरपंचाने हे सांगून विरोध करायला लावला की, जर वीजेसाठी पाणी वापरले तर त्या पाण्यातली सगळी पॉवर निघून जाऊन ते पाणी शेतीसाठी निरुपयोगी होईल...>>

१९७० च्या दशकातील आणिबाणी नंतर जेंव्हा निवडणुकी झाल्या तेंव्हा काँग्रेसने प्रचार केला 'आम्ही धरणे बांधून वीज आणली.' त्याविरुद्धच्या पक्षांनी भर कॉनॉट प्लेसमधे दुपारी वरील प्रमाणे विधाने केली. विरोधी पक्षाचे दुर्दैव की तिथले लोक शिकलेले होते, त्यांनी दगड, अंडी, चपला मारून त्या वक्त्याला पळवून लावले.
माझ्या मते देशप्रम, शिक्षण, पैशाचा देशासाठी जास्त उपयोग, करमणुकीसाठी कमी या क्षेत्रत प्रथम प्रगति हवी. आजकाल सगळी मुले क्रिकेट खेळणे किंवा सारेगमप वर जाण्याची धडपड करणे या ऐवजी अभ्यासाकडे जास्त लक्ष देतील तर बरे.

एखाद्या समाजाला लागालेल्या चुकिच्या सवयी अथवा समाजातील दोष नष्ट होण्यास अनेक पिढ्या, शेकडो वर्ष जातात. अमेरिकन समाजाला रुण काढून सण साजरे करायची सवय लागल्याने आज तेथिल अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. अमेरिकन समाज ह्या सवयी काही दशकात बदलेल का?
मग भारतीय समाजात अचानक बदल व्हावेत ही अपेक्शा का? बदल नक्कीच होत आहेत. पण ते हळुहळु होत आहेत.

सोहो, मला काळजी सुधरण्याची नाहिये, तर प्रगतीच्या नावाखाली वाईट सवई लागण्याची आहे! Sad

चांगला विषय आहे... जुनाच आहे पण बहुदा नविन चर्चा होईल असे वाटते. (हिंदू मुसलमान किंव्वा राजकारण अशा नेहेमीच्या अंगाने ही चर्चा नाही गेली तर नवल)
झक्की स्वतः ipl बघून मग त्यांना शिव्या द्यायच्या हे काही बरोबर नाही.. Happy
केदार म्हणतो तसे फार मोठा विषय आहे, एक अक्खी नविन मा.बो. उघडावी लागेल.... टॉप डाऊन चा मुद्दा अगदी योग्य मांडला आहे. भारतात त्यातही जे टॉप ला आहेत ते अजून टॉप ला जातायत, डाऊन वाले डाऊनच जातायत असली काही तरी भलतीच डेव्हलपमेंट चालू आहे.

आणि पैसा कमाईचं काय घेवून बसलात? हा पहा लेख. माझ्या रंगीबेरंगी वर लिंक दिली होती, पुन्हा देतो.. ईतका काळा पैसा बाहेर पडून आहे तो परत आणला तरी कितीतरी विकास कामांमधे लावता येईल.
असो.
http://election.rediff.com/inter/2009/apr/20/loksabhapolls-in-five-years...

आणि मला वाटतं विषय भारतापुरता असल्याने अमेरीकेचा संदर्भ वा तुलना टाळावी. आपल्या बुडावर बसायला किंव्वा पडायला कधी शिकणार आपण? सारखे गोर्‍यांचे बूड मधे घालून काय उपयोग?
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

<<झक्की स्वतः ipl बघून मग त्यांना शिव्या द्यायच्या हे काही बरोबर नाही.. >>
मी काही कुणाला व्यक्तिशः शिव्या देत नाहीये. हा विषय निघाल्यावर काय वाटले ते लिहीले. मला वाटते, भारताबद्दल मी काही लिहीले की त्याला वैयक्तिक टीका समजायचे, असे करणारे बरेच लोक इथे आहेत. असोत. मला काय सांगायचे ते सांगितले. मी माझ्या आयुष्यातल्या सर्व जबाबदार्‍या पार पाडून निवृत्त होऊन बसलो आहे. सगळेच तर तसे झाले नाहीत ना? ज्यांचे आयुष्य नुकतेच सुरु होत आहे, त्यांनी काय करावे, असे मला जे वाटते ते लिहीले.

का जे भारतासाठी काही करताहेत त्यांनीच इथे लिहावे असे तुम्हाला वाटते? मग तसे नियंत्रकांना सांगा, तुम्ही म्हणाल त्यांनाच इथे लिहायला परवानगी आहे, असे.

पुढच्या वेळेपासून तुम्ही ज्या चर्चेत भाग घेता, तिथे तुम्हाला विचारल्याशिवाय येणार नाही.

आपल्या भारतात, प्रगती होतच नाहिये असे नाही. पण दिशा आणि वेग चुकतोय.
शेती उत्पादन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा होउ शकतो. पण त्यात फारसे काहि होताना दिसत नाही. जेवढे पाणी आणि जेवढे श्रम आपण खर्च करतोय, त्या प्रमाणात उत्पन्न नाही. या क्षेत्रात होणारी प्रगति, गावपातळीवरच राहिलीय. एका गावाने एखादा प्रकल्प यशस्वी केला तर तो सर्व गावात होताना दिसत नाही. पाण्याचे व्यवस्थापन आपल्याला अजुन जमले नाही. कुठलिही पाणीपुरवठा योजना वेळेत पुरी होउ शकत नाही. या योजनांवर काम करणार्‍यांत अजिबात सेवाभाव नाही. माझी तुंबडी कशी भरेल याचाच विचार होतोय. योजना कशी वेळेत पुर्ण होईल याचा विचार नाही.
दूरदर्शन, दूरभाष या क्षेत्रात प्रगति आहे पण तिचा उपयोग जर कपुर बाईच्या, ५०० वर्षे मागे नेणार्‍या सिरियल्स बघण्यासाठी होणार असेल तर !!!
वाह्तूक क्षेत्रात प्रगति झालीय, पण ती सार्वजनिक व्यवस्थेत नाही तर खाजगी गाड्यात, पण त्या अनुषंगाने रस्ते, वाहतुक शिस्त मात्र आपल्याकडे नाही.

मला तर वाटते कि आज आदर्श नेते उरलेले नाहीत. जी माणसे धडाडीने काम करताहेत त्याना मनुष्यबळ कमी पडतेय. तरुण वर्गात शक्ती आहे, पण त्याना मार्गदर्शन नाही. एका विशिष्ठ तीर्थक्षेत्री मुंबईतून हजारो तरुण पायी जाताना बघतो, त्यावेळी वाटते, कि जर एवढे बळ आणि त्याना एवढा वेळ आहे तर करण्यासारखे विधायक कामच नाही का ? जे दैवत ते पूजतात, त्याला आहोत तिथून मनोभावे नमस्कार केला तर पोचणार नाही का ?
आणिबाणी नंतर जनता पक्षाने आमच्या पिढीच्या सर्व आशांचे मातेरे केले. आजही त्यातून आम्ही बाहेर पडलेलो नाही. माझ्या आईच्या खेडेगावात, ६० वर्षांपूर्वी संपर्काची अपुरी साधने असुनही, देशभक्तीची भावना जागृत होती. लोक एका धेयाने प्रेरित होते, पण आज आपल्या मनात हि भावना नाही. इस्राईल ने हि भावना जागवली होती. जगभरातल्या ज्यू लोकाना आवाहन केले. तसे आपल्याकडे होत नाही.

जाजु, विषयाबद्दल अभिनंदन.
प्रगती चा विचार एकांगी करताच येत नाही. त्याच्या अनेक बाजू असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक इ.इ. या सर्व बाजू एकमेकींना प्रत्येक वेळी प्रेरक ठरतील असे नसते. एखादी प्रगती वेगळ्या दृष्टिने पाहता हानिकारक वाटते आणि तिथेच अडचण सुरु होते. Industrial Revolution नंतर युरोपात प्रचंड प्रगती झाली परंतु निसर्ग व आरोग्याच्या दृष्टिने ही प्रगती हानिकारक ठरली. भारतातही माहिती तंत्रज्ञान (IT, BPO) क्षेत्रात झालेल्या भरीव प्रगतीनंतर सामाजिक क्षेत्रावर त्याचे काही दुष्परिणाम (मानसिक ताणतणावात वाढ, घटस्फोटांची वाढती संख्या) झालेच. काहीजणांना यातील तोटे/दुष्परिणाम महत्त्वाचे वाटतात(उदा. मेधा पाटकर) तर काहींना यातील फायदे महत्त्वाचे वाटतात(उदा. गुजरात सरकार).
मला सर्वसमावेशक प्रगती हा मुद्दा कालबाह्य वाटतो. कोणतीही प्रगती, विकास आपल्याबरोबरच फायद्यांबरोबरच तोटेही घेऊन येतो. त्यातील जास्त फायद्यांचे पर्याय स्वीकारणे हे आपल्या हातात असते. त्यामुळे प्रगती म्हणजे काय याचे उत्तर अत्यंत व्यक्तिसापेक्ष असते.

मी तो व्हीडीओ काही दिवसांपूर्वीच पाहिला. त्या मुलीचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. पण समोर सर्व गेंड्याच्या कातडीचे लोक असताना काय उपयोग????

कोणाच्या प्रगतीबद्द्ल मतं मांडायची आहेत? व्यक्तिची प्रगती का देशाची प्रगती? मी, माझं कुटुंब एवढ्यापुरताच विचार करत राहिलं तर प्रगती मर्यादितच रहाते न? माझ्याबरोबर मी दुसर्‍यांनापण वर यायला मदत करेन असा विचार जर प्रत्येकाने केला तरच देशाची प्रगती होऊ शकते.

मी स्वतःच्या घरात थुंकत नाही पण रस्त्यावर मात्र थुंकतो. परत विचार स्वतःपुरता. स्वतःच्या घरापुरता. सामाजीक बांधिलकी नाहीच.

ज्यांना परवडणं शक्य आहे त्यांनी आपल्या मुलांबरोबर आणखी एका मुलाला ( ज्याचे आईवडिल आडाणी आहेत किंवा जे आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत) शिकवण्याची जबाबदारी उचलली तर नक्कीच देशाची निरक्षरता सुधारली जाईल.

साध्या साध्या गोष्टी - कार पूल, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणं, नवं मॉडेल आलं म्हणून सेल फोन बदलणं ( घरात जुन्या सेल फोन्सची घाण तयार करणं). अपल्याकडे लँडफिलसाठी जागेची केवढी कमतरता आहे अशावेळी reusable गोष्टी हि गरज आहे देशाची हे जरी समजून प्रत्येकजण वागलं तरी environmental impact कमी व्हायला मदत होईल.

देशाचं नेतृत्व चांगल्या माणसाकडे जाण्यासाठी मतदान करणं ही तर आपली जबाबदारी आहे.

अतिशय सुंदर विषय आणि जवळ जवळ विषयाला धरून चर्चा, सुदृढ!
जायले, अभिनंदन. मी फक्तं वाचत रहाणार आहे.

झक्की,
माझ्या ipl च्या प्रतिक्रीयेवरून एव्हड टोकाचं अनुमान कसं काय काढलत बुवा..? Happy इथे येणे न येणे वा लिहीणे यावर एक admin खेरीज कुणी परवानगी/बंधने लादू शकत नाही हे तुम्हालाही माहित आहे.
तेव्हा आता रुसवे फुगवे सोडा अन असे मैदानात या पाहू..
(काय राव भल्याचा जमानाच नाही राहिला) Happy
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

हा पहा, आपल्या प्रगतीचा (?) नविन प्रकार -

http://loksatta.com/lokprabha/20090501/cover.htm

अशी आपली लोकशाही, ध्येयासक्ती आणि बदल घडवण्याची खरी तळमळ!

जाईजुई मी आत्ता त्या लेखांची लिंक द्यायलाच आले होते...

येथील बरीच चर्चा पाहुन विषय बाजुला पडतोय असे वाटते.
चर्चे दरम्यान टिका खुप होतेय असे वाटते.

माझ्या मते "प्रगती म्हणजे स्वःत ची स्वःत बरोबरची स्पर्धा!"
मग ती वैयक्तिक, गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची, देशाची, समजाची अगर वैचारीक वगैरे वगैरे असो.
कोणतीही गोष्ट परिपुर्ण नसते. त्याच्या कमतरेत सुधारणा झाली म्हणजे प्रगती झाली असे मी मानतो.
प्रगतीचा दर कमी-जास्त असु शकतो. "अमक्यासारखे असणे म्हणजे प्रगती का?"
या मनकवडां च्या प्रश्नाचे उत्तर आहे "प्रगती नव्हे हेवा."
प्रगत बाबींच्या पाउलावर पाऊल ठेऊन प्रगती करणे चांगले, पण हव्यास करुन आपले नुकसान करुन घेऊ नये.
आणि सर्वात महत्वाचे " एकमेका सहाय्य करु अवघे घेवु सुपंथ!"
भाऊ चर्चा चालुच ठेवा!
क्रमश:

प्रगती बद्द्ल कोणाला अजुन काही सांगता येईल?
कुठे गेले सगळे?
बौध्दीक विषयावर बोला कि?

<<<<<<<<<<<<प्रगती बद्द्ल कोणाला अजुन काही सांगता येईल?>>>>>>>>>>>>>.
नाहि हो मी तीला कधी पाहिल पण नाही आणि ओळखत सुध्दा नाही. Wink

------------------------
------------------------
कोण बरोबर---- वाद.
काय बरोबर---- चर्चा.

मनन झाले कि सांगा म्हणाव. Happy

जाईजुई
एल्.एल्.बी का?
मग काही सल्ला मिळेल?

Pages