कान्हा अभयअरण्य अनुभव\ माहिती हवी आहे

Submitted by नानुअण्णा on 5 February, 2020 - 12:23

कान्हा अभय अरण्य एप्रिल मध्ये भेट देण्याचा विचार आहे, काही सूचना, माहिती, अनुभव असतील कृपया प्रतिसाद द्या .
पुण्याहून ग्रुप, टूर बरोबर जाणार आहे .

Group content visibility: 
Use group defaults

कान्हा अभय अरण्याला बर्‍याच वर्षांपुर्वी भेट दिली होती. आत्ताची परिस्थिती माहीत नाही. पण त्या वेळीमात्र खुप छान अनुभव मिळाला आम्हाला. आम्हि देखिल एका गृप बरोबर गेलो होतो. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या सुचना म्हणजे, भडक रंगाच्या कपड्यांचा वापर टाळायचा. साधारण निसर्गाच्या जवळ जाईल अश्या रंगाचे कपडे वापरायचे. सफारीला जाताना पुरेसे खाद्यपदार्थ आणि पाणि जवळ ठेवायचे. कारण आत गेल्यावर तिथे फार काही पदार्थ मिळत नाहीत आणि जे मिळतात ते फारच महाग असतात. तुम्ही एप्रिल मधे जाणार आहात म्हणजे ऊन चांगलेच असणार त्यामुळे उन्हापासून संरक्षण होईल पण उकड्णारही नाही अशे पेहराव करा. सफारित फिरत असताना मोठ मोठ्याने बोलणे टाळा आणि तुमचा गाईड काय सांगतो हे नीट लक्ष देऊन ऐका.
सकाळची सफारी साठी खुप लवकर रांगेत उभे रहावे लागते. कारण जितका लवकर तुमचा जंगलात जाण्यास नंबर लागेल तितके चांगले. सकाळी सकाळी बर्‍याच खुणा मिळतात पावलांच्या. नंतर त्या मिटून जातात.
केवळ वाघच बघायचा आहे असे ठरवून जाऊ नका. ईतरही खुप सुंदर पक्षी आणि प्राणी बघायला मिळतात.
जेवणाच्या बाबतित आम्हाला आलेला अनुभव म्हणजे त्यावेळी आम्हाला शाकाहारी पादार्थांमधे नुसते बटाते आणि फ्लॉवर यांचेच पदार्थ मिळायचे. आता सुधारणा झाली असेल तर माहित नाही. पण त्या वेळी आम्ही उपमा सुद्धा कांद्यांऐवजी बट्याटाचा खल्ल्ला होता.
शक्यतो घरून बरेच दिवस टिकणारे असे काही पदार्थ बनवून बरोबर ठेवा. त्याच्या जाताना आणि येताना नक्कीच ऊपयोग होतो.
जास्तीत जास्त सफार्‍या करण्याचा प्रयत्न करा दर वेळी वेगळा अनुभव मिळतो.

मुळात सफारीचं बुकिंग आहे का? ती नावानिशी असावी लागतात
ग्रुप तर्फे जाणार असाल तर ते लोक बुकिंग कसं जमवणार त्याची चौकशी आधी करून घ्या
नाहीतर सफारी बुकिंग शिवाय काही फायदा नाही