तिला कविता आवडत नाही...

Submitted by MallinathK on 21 April, 2009 - 04:09

कट्ट्यावर गप्पा मारताना सहज विषय निघाला की माझ्या (होणार्‍या) बायकोचं शिक्षण इंग्रजी मिडियमचं, म्हणुन कट्ट्यावरच्या लोकांनी माझी मस्त खेचली ! त्यातुन थोडंसं लिहलं....

(सौमीत्र यांची माफी मागुन....)

तिला कविता आवडत नाही, त्याला कविता सुचते,
शब्द दाटुन आल्यावर ती त्याच्या तावडीत सापडते.
मी तिला आवडतो, पण कविता आवडत नाही,
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.
कविता म्हणजे शद्ब, कविता म्हणजे व्यर्थ,
कविता म्हणजे हळव्या भावना, कविता म्हणजे हळवेच अर्थ.
कविता डोके खराब करते, कविता वैतागवाडी,
कविता म्हणजे झुळुक, कविता म्हणजे भिजलेली झाडी.
कविता म्हणजे रटाळलेली वाक्ये, कविता म्हणजे शिक्षा उगाच,
कविता मध्ये रमुन, मन जाउन बसतं स्वप्नांत.
दर वेळेस कविता करतो, दर वेळेस असं होतं,
कवितेवरुन भाडंण होऊन, लोकांन मधे हसं होतं.
कविता आवडत नसली तरी तो तिला आवडतो,
कवितेसकट आवडावा म्हणुन तो ही झगडतो.
हसुन मग ती येते, भिजत राहते शब्दांत.
त्याच तिचं भांडण असं ओल्यचिंब प्रेमात.

-- मल्लिनाथ

गुलमोहर: 

झाक जमलय मल्ल्या......
तिला एकवलीस का नाही ?

----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

लय भारी मल्ल्या.... पण आयडिया दिल्याबद्दल माझे आभार मानायला हवेत Proud

माझे आभार मानायला हवेत >> मन्या आयडीया माझी होती Proud
कविता म्हणजे भिजलेली झाडी...ऐवजी भिजलेली साडी असे वाचले मी.. Wink

बाकी मस्त जम्या है ..:)

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

>>शब्द दाटुन आल्यावर ती त्याच्या तावडीत सापडते.
खरतरं शब्द दाटुन आल्यावर तावडीतून सुटेल ना Proud

मी पण आधी साडी वाचले Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

कविता म्हणजे भिजलेली झाडी...ऐवजी भिजलेली साडी असे वाचले मी>>>
केद्या ...! Lol

>>मन्या आयडीया माझी होती
कशी काय रे... मी तर लगेच २ कडवी पण टाकली होती कट्ट्यावर्... हां आता मल्ल्याने ती बदलली...
कवी ला विचार..

....कवितेशिवाय त्याला काही गमत नाही>> यावर तिने १ रिप्लाय पण मारला होता Happy

पण जाऊदे, मल्ल्यासाठी काहीही Proud

मल्ल्या छान जमली आहे....
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....

मस्त जमल्ये.... Happy

कविता म्हणजे भिजलेली झाडी...ऐवजी भिजलेली साडी असे वाचले मी..

केद्या Biggrin
(बाकी भर उन्हात भिजलेलं काहीही जिवाला "गारवा" देतं नाही ? - मृगजळ रे ! दुसरं काही नाही !)

मल्ली, छान रे ! विडंबनाशिवाय नुसती कविता म्हणूनही छान आहे !
---------------------------------------------------
कृपया ईथे भेट द्या - http://www.maayboli.com/node/7308
http://www.maayboli.com/node/7309

>>ऐवजी भिजलेली साडी
हे कट्टेकरांकडुन अपेक्षितच होते मित्रांनो.... Wink

प्रतिसाद बद्दल मनःपुर्वक धन्यवाद !

-----------------------
नियतीशी आज पुन्हा गाठ होती,
त्याने कापलेली माझी मानही ताठ होती.
सगे सोयर्‍यांचा रुसवा न मजला,
नियतीनेच इथे फिरवली पाठ होती.

कवितेसकट आवडावा
हा तर मोठा कांगावा
ओल्याचिंब त्या प्रेमाचा
मग गोडवा कां गावा ||

छान ! आवडली आपल्याला "कट्ट्या'र कविता !!

आवडली.
कविता आवडत नसली तरी तो तिला आवडतो,
कवितेसकट आवडावा म्हणुन तो ही झगडतो. >>> Happy

    ***
    दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
    पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

    सही रे सही!! हे तर फार छान विडम्बन आहे.......'गारवा"ची अख्खी cassete आठवली...मस्तच
    फुलराणी

    सही,.... Happy

    वैनीसायेबास्नी म्हनावं कविता आवडून घ्या की आता ..;)
    ..................
    दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा...
    राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा... Sad
    कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो.... Lol

    मस्त आहे रे मल्ल्या