Submitted by mess-age on 21 April, 2009 - 00:39
सूर्याच्या मांसल त्वचेवर दिवसांच्या सुया टोच
अंधाराची मेणबत्ती पेटव.
सगळी आत्मचरित्रे दोनदा वाच.
एकदा स्तुती, दुसर्यांदा कंटाळा.
खोट्या चपलेत खोटे पाय घाल.
खोटं खोटं फिरुन ये.
मोकळ्या हवेशी झोंब.
दचकून उठ.
कविता लिहीण्याचं नाटक कर.
न जमल्यास
एक पत्र लिही.
फाडून टाक. पुन्हा लिही.
नंतर
गिचमिड्या सहीच्या दोरीत
चेहरा ओवीत बस
माझा, अंधाराचा किंवा
आपल्या संबंधांचा.
- संदेश ढगे
गुलमोहर:
शेअर करा
झक्कास
झक्कास
>>कविता लिहीण्याचं नाटक कर.
न जमल्यास
एक पत्र लिही.
फाडून टा>>>>
छान. मुकुंद
छान.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com